शंका आणि उत्तरे

लोकसत्ता ‘ब्लॉग बेंचर्स’ – थोडक्यात महत्त्वाचे

  • ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ या संकेतस्थळावर दर आठवड्याच्या शुक्रवारी ‘आठवड्याचे संपादकीय’ या शिर्षकाखाली एक लेख प्रसिध्द केला जाईल.
  • लेखावर प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी लेखाच्या शेवटी असलेल्या ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली असलेल्या ‘तुमची प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी येथे लॉग इन करा.’ या शिर्षकावर क्लिक करून तुमचे लॉग इन करून तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता.
  • सदर लेखावर विद्यार्थी शुक्रवार ते गुरूवार म्हणजेच पुढील सात दिवस या लेखावर आपल्या सवडीप्रमाणे ५००-७०० शब्दांत लेखावरील किंवा त्या विषयावरील त्यांची प्रतिक्रिया (ब्लॉग) नोंदवू शकतात.
  • प्रत्येक विद्यार्थ्याला दर आठवड्याला प्रसिध्द होणा-या लेखावर फक्त एकदाच प्रतिक्रिया देता येईल.
  • लेखावरील प्रतिक्रियाच केवळ स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या किंवा अवांतर विषयावर लिहिलेल्या प्रतिक्रिया स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
  • ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना अपूर्ण माहिती भरली आहे, ते विद्यार्थी संकेतस्थळावर त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इतर माहिती भरू शकतात तसेच स्वत:चा फोटो आणि महाविद्यालयाचे ओळखपत्रही अपडेट करू शकतात.
  • ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ईमेलवर संपर्क साधावा. 

 

स्पर्धेसंबंधीचे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं.

प्रश्न – या स्‍पर्धेची संपूर्ण माहिती कुठे उपलब्‍ध आहे.
उत्‍तर – स्‍पर्धेची संपूर्ण माहिती ‘लोकसत्‍ता’ वर्तमानपत्रात तसेच https://www.loksatta.com/blogbenchers/ या संकेतस्‍थळावर मिळेल.

प्रश्न – स्‍पर्धेत कुणाला सहभागी होता येईल.
उत्‍तर – १६ ते २५ वयोगटातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धेत सहभागी होता येईल. नोंदणी करण्‍यासाठी महाविद्यालयाचे अथवा विद्यापीठाचे ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे.

प्रश्न – स्‍पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना यात सहभागी होता येईल का
उत्‍तर – महाविद्यालयात शिकत नसेलेल्‍या व वयोमर्यादेत पात्र नसलेल्‍या स्‍पर्धेकाला सहभागी होता येणार नाही.

प्रश्न – सहभागी होण्‍यासाठी नोंदणी शुल्‍क आहे का
उत्‍तर – नाही.

प्रश्न – नोंदणी कशी करावी
उत्‍तर – या स्‍पर्धेची नोंदणी केवळ ऑनलाइनच करता येणार आहे. नोंदणी अर्ज https://www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. नोंदणी करण्‍यासाठी संकेतस्‍थळावर देण्‍यात आलेला नोंदणी अर्ज पूर्ण भरणे आवश्‍यक आहे.

प्रश्न – नोंदणी करताना ‘युजरनेम’ विचारले आहे याचा अर्थ काय
उत्‍तर – नोंदणी करताना तुम्‍ही नमूद केलेल्‍या युजरनेम आणि पासवर्डच्‍याच मदतीने तुम्‍हाला संकेतस्‍थळावर लॉगइन करता येईल. तुम्‍ही नोंदणीकृत स्‍पर्धक असल्‍याशिवाय तुम्‍हाला कुठल्‍याही ब्‍लॉगवर मत नोंदविता येणार नाही.

प्रश्न – नोंदणी केल्‍यावर दर आठवड्याला लिहणे बंधनकारक आहे का
उत्‍तर – नाही. तुम्‍ही तुमच्‍या आवडीच्‍या विषयावर मत नोंदवू शकता.

प्रश्न – मराठीत टायपिंग कसे करावे
उत्‍तर – तुम्‍ही मराठी टायपिंगसाठी युनिकोड वापरू शकता. या संकेतस्‍थळावर इंग्रजीतून मराठीत टाइप करण्‍याची सोय आहे. उदा. तुम्‍ही ‘loksatta’ असे इंग्रजीत लिहल्‍यास ते तुम्‍हाला ‘लोकसत्‍ता’ असे दिसेल.

प्रश्न – शब्‍दमर्यादा किती
उत्‍तर – ५०० ते ७०० शब्‍द.

प्रश्न – लिखाण मेल करायचे आहे का नसेल तर कुठे लिहायचे
उत्‍तर – मेल केलेले लिखाण ग्राह्य धरले जाणार नाही. स्‍पर्धकांना दर आवड्याला दिलेल्‍या लेखाच्‍या खालीच दिलेल्‍या मत चौकटीत (कमेंट बॉक्‍स) मत नोंदवायचे आहे. मत नोंदवताना लॉगइन करणे आवश्‍यक आहे.

प्रश्न – ब्‍लॉगची निवड झाल्‍यास आम्‍हाला कसे कळेल
उत्‍तर – विजेत्‍यांची नावे ‘लोकसत्‍ता’मध्‍ये तसेच https://www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्‍थळावर जाहीर करण्‍यात येतील.

प्रश्न – एकदा विजेता ठरल्‍यावर पुन्‍हा स्‍पर्धेत सहभागी होता येईल का
उत्‍तर – होय.

प्रश्न – स्‍पर्धेबाबत शंका असल्‍यास कुणाशी संपर्क साधायचा
उत्‍तर – https://www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्‍थळावर संपर्क या मथळ्याखाली विभागवार संपर्क क्रमांक आणि पत्‍ते देण्‍यात आले आहेत.