26 November 2020

News Flash

BLOG : ‘सॉरी बाबू!’ पुन्हा व्हायरल

जाणून घ्या काय आहे कारण

जय पाटील
गेल्या काही महिन्यांपासून ‘सॉरी बाबू!’ हे उद्गार भलतेच चर्चेत आहेत. त्यावर बरंच चर्वितचर्वण झाल्यानंतर आज पुन्हा हे शब्द ट्विटरवर ट्रेण्ड झाले. त्याला निमित्त होते वास्तु सजावटकार अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारल्याचे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मृतदेह पाहिल्यानंतर रिया चक्रवर्तीने ‘सॉरी बाबू’ असे उद्गार काढल्याचे वृत्त टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित झाले आणि मग या शब्दांमागे दडलेला अर्थ शोधण्यासाठी अनेक डोकी कामाला लागली. त्यात आघाडीवर असलेल्यांपैकी एक होते रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी. ‘रिया का सॉरी म्हणाली, तिला अपराधी वाटावं असं काय होतं,’ असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. तोच तोच मुद्दा पुन्हा पुन्हा अतिआक्रमकपणे मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे नेटकऱ्यांनी अनेक उपरोधिक मीम्सच्या माध्यमातून त्यांची खिल्लीही उडवली होती.

आज मुंबई उच्च न्यायालयाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अंतरिम जामीन नाकारल्यानंतर याच उद्गारच वापर करून ट्विटराइट्सने अनेक मीम्स व्हायरल केली. मुंबई उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्याचे वृत्त प्रसारित होताच ट्विटरवर सॉरी बाबू हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. ‘मुंबई उच्च न्यायाल अर्णबला म्हणाले, सॉरी बाबू’ ‘अर्णब : गोदी पापा प्लीज बचा लो. बहुत मार पड रही है. पंतप्रधान : आय एम सॉरी बाबू’ अशी ट्विट्स अनेकांनी केली.

काहींनी रिया चक्रवर्तीचे छायाचित्र वापरून ‘रोझेस आर रेड, व्हॉयलेट्स आर ब्लू. लेट्स स्मॅश द पॅट्रियार्की मी अँड यू’ असे मीम्स पोस्ट केले. कोणी ‘न्यायदानावर सत्ताधारी प्रभाव टाकू शकत नाहीत, हे मुंबई उच्च न्यायालयाने सिद्ध केलं आहे,’ ‘सॉरी बाबू… थँक यू हायकोर्ट… अर्णब योग्य जागी आहेत,’ अशी ट्विट्स केली. कोणी याचा संबंध रिपब्लिक वाहिनीच्या एक्झिट पोलशी जोडला. ‘अर्णब काही दिवस तुरुंगात काय राहिला, रिपब्लिक टीव्हीने बिहार विधानसभा निवडणुकीत राजदप्रणित आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे भाकित केले. अर्णब यांचा हा सॉरी बाबू म्हणण्याचा मार्ग आहे का?’ अशी उपरोधिक पृच्छा केली. कोणी सलमान खान काळविटाची शिकार करत असल्याचे चित्र वापरून सलमान म्हणजे उच्च न्यायालय आणि काळविट म्हणजे अर्णब गोस्वामी असल्याचे दाखवणारी मीम्स केली. थोडक्यात सॉरी बाबूवरून अर्णब यांनी केलेला गहजब आता त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र निर्माण झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 5:08 pm

Web Title: blog on sorry babu goes viral again scj 81
Next Stories
1 त्याने केले स्वत:शीच लग्न
2 BLOG : अजातशत्रूंची झुंज संपुष्टात
3 BLOG : ‘स्त्री’ कोणाला म्हणायचं ?
Just Now!
X