13 August 2020

News Flash

…अन् चंद्रावरुन आलेल्या त्या तिघांना २१ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं

तिघांपैकी एका अंतराळवीरानेच शेअर केला फोटो

बझ अ‍ॅल्ड्रीन यांनी शेअर केलेला फोटो (फोटो सौजन्य: twitter/TheRealBuzz)

अमित जोशी

सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक देशातील सरकारने लोकांना घरीच अलगीकरणमध्ये (क्वारंटाइन) राहण्याचे आवाहन केलं आहे. भारतामध्येही १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने आपल्यापैकी अनेकजण होम क्वारंटाइन झाले आहेत. मात्र हे होम क्वारंटाइन प्रकरण आपल्याला नवं असलं तरी याआधी असा प्रयोग करुन अंतराळसंशोधन क्षेत्रामध्ये झाला आहे. यासंदर्भातील आठवण ज्या अंतराळवीरांबरोबर हा प्रयोग झाला त्यापैकी एक असणाऱ्या बझ अ‍ॅल्ड्रीन या अंतराळवीरानेच शेअर केला आहे.

नक्की काय घडलं होतं? का?

अपोलो ११ मोहिमेनंतर चंद्रावरून परत आलेल्या तीन चांद्रवीरांनी चक्क तीन आठवडे हे लूनार रिसिव्हींग लॅबोरेट्रीमध्ये व्यतीत केले होते. याच कारण अर्थात आपल्याला मजेशीर वाटेल पण चंद्रावरून परत आलेले चांद्रवीर हे चंद्रावरून किंवा अवकाशातून काही अज्ञात विषाणू/जीवाणू पृथ्वीवर घेऊन आले असतील, अशी भीती नासाला होती. त्यामुळेच त्यांनी या अंतराळवीरांना अलगीकरणामध्ये ठेवलं होतं. तेव्हा या चांद्रवीरांचे अलगीकरण करण्यात आलं होतं. यासाठी या चांद्रवीरांना लूनार रिसिव्हींग लॅबोरेट्रीमध्ये या एका वैशिष्ट्यपूर्ण कुपीमध्ये चक्क तीन आठवडे ठेवण्यात आलं. तिथे त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या, त्यांच्या स्पेससूटची तपासणी करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत वेगळे जीवाणू, विषाणू नसल्याची खात्री झाल्यानंतरच चांद्रवीरांची प्रकृती ही ठणठणीत असल्याचं स्पष्ट झाल्यावरच या चांद्रवीरांना तीन आठवड्यानंतर माणसांमध्ये आणण्यात आलं.
या ३ आठवड्यात चांद्रवीरांनी चांद्र मोहिमेचा अहवाल तयार करणं, याबाबत चर्चा करणे अशा अनेक गोष्टी केल्या. सध्याच्य लॉकडाउन आणि क्वारंटाइनच्या पार्श्वभूमीवर चंद्रावर पाय ठेवणारी दुसरी व्यक्ती बझ अ‍ॅल्ड्रिन यांनी ही आठवण फोटोसह शेयर केली आहे.

काय म्हणाले आहेत बझ अ‍ॅल्ड्रिन आपल्या ट्विटमध्ये?

“तुम्ही तुमचा क्वारंटाइनचा वेळ कसा घालवत आहात? अपोलो ११ मोहिमेनंतर मी माझ्या सहकाऱ्यांसहीत तीन आठवड्यांचा वेळ एका सुरक्षित इमारतीमध्ये घालवला होता. या तीन आठवड्यांमध्ये आम्ही मोहिमेबद्दलचा अहवाल बनवणं, चर्चा करणं आणि व्यायाम करणं अशा साऱ्या गोष्टी केल्या. आता तुम्ही मला सांगा तुम्ही कोवीड-१९ पासून सुरक्षित कसे राहत आहात,” असं ट्विट बझ यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या क्वारंटाइनच्या काळात काढलेला हा फोटोही पोस्ट केला आहे.

त्यामुळेच उदाहरणावरुनच आपल्याला असं म्हणता येईल की विषाणूंपासून वाचायचं असेल तर आपल्याला काही दिवस होम क्वारंटाइन राहण्याशिवाय पर्याय नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 4:51 pm

Web Title: coronavirus three austronuts were quarantine for 2 days after apollo 11 mission scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 BLOG : क्लासरूम्स ते ग्लास रूम्स – शिक्षणातील सुधारणा
2 BLOG : ई-पेपरला करोनाचे वरदान
3 Blog: एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचं मुंबईकरांसाठी पत्र
Just Now!
X