08 August 2020

News Flash

क्वारंटाइन वाढदिवस… अन् अदृश्य देवदूत!

करोना कधी तुम्हाला चकवा देईल हे कुणालाही छातीठोकपणे सांगता येत नव्हतं...

– मनोज भोयर

आधीही आणि या हॉटेलमध्ये सुद्धा वेळ कसा घालवायचा एकट्यात याच उत्तर मी शोधलं होत.लॉकडाऊनच्या काळात मित्रानी नेटफ्लिक्सवर उपलब्ध उत्तम चित्रपट आणि वेबसिरीजबद्दल भरपूर माहिती मला पाठवून दिली होती. शिवाय माझे काही राहून गेलेले चित्रपट, काही चांगले व्हिडिओज होतेच. सकाळी भावगीते, अभंग, गझल आणि गाणी यातून माझं बऱ्यापैकी मनोरंजन होत होत. बातम्यांच्या जगात मी पुन्हा परत आलो होतो कारण सोबतीला इथे टिव्ही होता. त्यातून जगाचा आणि देशाचा वेध घेणं सोपं झालं होत. काही चित्रपट आणि वाइल्ड लाईफवर आधारित मालिकामध्ये वेळ जात होता. काही महत्वाच्या नोंदी सुद्धा मोबाईलवरच्या नोट पॅडवर आणि ऑडिओ रेकॉर्ड करून घेत होतो. चिंतन मनन करण्यातही विचारांना एक वेगळी खोली येत होती. संगीतासोबत योगा, ध्यान आणि बैठे व्यायाम मन शांत आणि प्रवाही ठेवण्यासाठी इथेही खूपच उपयोगी पडत होत. उलट इथे येताच असल्यामुळे त्याची जास्त मजा येत होती.

इथेच झाला माझा वाढदिवस साजरा
१ मे रोजी माझा ४५ वा अनोखा वाढदिवसही इथेच साजरा केला. तसा तो एकट्यात साजरा केला असं म्हणता येणार नाही कारण कॅडबरीचं चॉकलेट आदल्या रात्री बरोबर बारा वाजता हातात पडलं. बहुदा हॉटेलवाल्याना माझ्या कोणा मित्राने अगोदरच माहिती देऊन ठेवली असावी. कारण शुभेच्छा देण्यासाठी मित्रांचे अनेक फोन, मेसेजेस येतच होते. फक्त त्यांना माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हती आणि ती मी दिलीही नाही. अगदी आईबाबानांही याची कल्पना येणार नाही याची तेव्हाही पुरेपूर काळजी घेतली .

पूर्वीपेक्षा आयुष्य खूपच सकारात्मक झालं होत. व्यतिमत्वात काही आमूलाग्र बदल होत असल्याचं जाणवत होत. हळहळू माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह येणार याबद्दल माझी खात्री होत होती. पण कोरोना कधी तुम्हाला चकवा देईल हे कुणालाही छातीठोकपणे सांगता येत नव्हतं.

मुक्कामाचे अगदी शेवटचे दिवस
याच हॉटेलात ५३ पत्रकारांपैकी तीन चार पत्रकारांचा पॉझिटिव्ह आल्यामुळे मुक्काम वाढला होता. त्यातले दोन माझ्या संपर्कात होते. आम्ही एकमेकांना धीर देत होतो. पत्रकार मित्र बरा होऊन घरी निघून गेला. जाताना माझा खूप आत्मविश्वास त्याने वाढवला. उरला त्या दोघातून एक कॅमेरामन मित्र. त्याची तापाची लक्षणं काही बरी होत नव्हती. मी त्याची समजूत काढत होतो, त्याच मनोबल वाढवत होतो. पत्रकार मित्राच्या ओळखीने काही फळ मिळाली त्यातली काही आणि माझे जेष्ठ राजकारणी मित्र अतुल भातखळकर यांनी पाठवून दिलेले ड्रायफ्रूट्स त्यालाही पाठवून दिलीत. गरम पाण्यासोबत रोज घेत असलेली हळद च्यवनप्राश सुद्धा त्यांनीच पाठवून दिल होतं, हा सुद्धा एक चमत्कार इथे घडला होता.

काही कुणाला पाठवायचं किंवा मागवायचं म्हणजे असा ठिकाणी मोठीच पंचाईत व्हायची. स्टाफ कमी आणि तोही जीव धोक्यात घालून काम करत होता. त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावे…

दारावरची बेल वाजली आणि कायम बंद असलेले दार आपण उघडायला गेलो तर तोपर्यंत तो देवदूत अदृश्य होऊन जायचा आणि ते योग्यही होत. करोनाबाधित माणसाचा संपर्क असाच टाळण्याची आवश्यकता होती.

याच काळात सदाबहार चित्रपट अभिनेते ऋषी कपूर आणि अस्सल अभिनेता इरफान खान या दोघांचंही कॅन्सरच्या दीर्घ आजारानं पाठोपाठ निधन झालं. त्यांचे चाहते त्यांचं अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकले नाहीत. माझ्यासकट सर्वांनीच टीव्हीच्या पडद्यावर त्यांना अखेरचा निरोप दिला. गझलसम्राट जगजीत सिंग यांच्या अंत्यसंस्काराला चंदनवाडी स्मशानभूमीत मी आवर्जून गेलो होतो. त्याची आठवण झाली कारण ऋषी कपूर यांच्यावर देखील तिथेच अंत्यसंस्कार झाले होते.

४ मे रोजी दुपारी ४ वाजता पुन्हा माझी कोरोना टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट ६ मे रोजी सकाळी येणार होता. मधल्या दिवसात ऑफिसमधल्या कोरोना पॉझिटिव्ह सहकाऱ्यांशी बोलत होतो. काय काळजी घ्यावी याचे डोज स्वतःहूनच देत होतो. योगा आणि प्राणायमचे व्हिडिओज काहींना पाठवत होतो. काही लवकर बरे झाले काही माझ्या सोबतीला मात्र वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी घेत होते.

(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)

भाग १ –  BLOG : …आणि मला ताप आला!

भाग २ – BLOG: …संशयितांच्या रांगेतलं कुटुंब, अन् रिपोर्टची धाकधुक

भाग ३ – Blog : करोना पॉझिटिव्ह वॉर्डात जगलो…

भाग ४ – BLOG: पुन्हा टेस्ट पॉझिटिव्ह आणि घबराट

भाग ५ – अ‍ॅम्ब्युलन्स… भयाण शांतता अन् स्तब्ध झालेली मुंबई!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 9:00 am

Web Title: covid 19 positive patient experience in mumbai hospital pkd 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronology: गेल्या वर्षी ४००० कोटींचा टप्पा गाठणारे बॉलिवूड करोनामुळे शांत
2 Blog : जादूगार अशोक सराफ
3 BLOG : तुम्ही हत्तीचा नाही, माणुसकीचा खून केलात !
Just Now!
X