– गणेश दत्ताराम रघुवीर

तोफांच्या निर्मिती पासून तोफांचे महत्व हे जगभरात बाराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत महत्वपूर्ण होते. लष्करीदृष्ट्या महत्वाचे असलेल्या या तोफ शस्त्राची युद्धात फार मोठीच कामगिरी  होती. तोफांचा प्रवाह आणि संचार हळूहळू जगभरातील युद्धात होत गेला. पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणत तोफा तयार केल्या होत्या त्यांची सत्ता जिथे जिथे होती तिथे त्यांनी तोफ कारखाने तयार केले. भारत देशात पंधराव्या शतकापूर्वी  तथा महाराष्ट्रात पंधरा ते सोळाव्या शतकात तोफा आल्या त्या पोर्तुगीजांची राजवट असलेल्या मुंबई या ठिकाणी. पोर्तुगीज आणि इंग्रजांचे साष्टी बेटावर आपले वर्चस्व सतराव्या शतकाच्या अखेर पर्यंत भारत स्वतंत्र होई पर्यंत होते.

तोफ:-.स.पु.चौथ्या शतकात तटबंदीचा विध्वस्त करण्यासाठी आणि तटबंदीच्या आतील लोकांवर मारा करण्यासाठी भारी धनुष्य व गलोल याचा उपयोग केला जाई. भारतीय आणि ग्रीक इतिहासात या विषयी पुष्कळ उल्लेख आहेत. हीच यंत्रे तोफानाची पूर्वरूपे होत. स्फोटक दारुगोळ्याचा शोध इ.स. सातव्या आठव्या शतकात प्रथम चीनमध्ये लागला. ताव्हेन्ये या फ्रेंच प्रवाशाच्या नोंदीप्रमाणे आसाममधून चीनमध्ये दारूगोळ्याचे द्यान गेले असे दिसते. तत्कालीन चीनी बौद्ध प्रवाशाच्या वर्णांत असे उल्लेख आढळ नाहीत. अकराव्या बाराव्या शतकात परकियांच्या आक्रमानामले जाट,जिप्सी किंवा रोमानी युरोप खंडाकडे गेले. त्याच्या करवी तोफ आणि तोफदारू युरोपात ञात झाली असेही एक मत आहे अर्वाचीन काळातील शास्त्रीय प्रगतीमुळे तोफांच्या बनवटीत खूपच बदल झाले. विविध प्रकारचे तोफगोळे व त्यानुरूप तोफांच्या नळ्या वान्विल्या जातात. तोफगोळे व प्रक्षेपणास्त्र एकाच नळीतून उडविता येते.

भौगोलिक दृष्ट्या मुंबई पाहता मुंबई सात बेटांनी तयार झाली आहे. सात हि बेट हि चारही बाजूने समुद्राने वेढलेली आहेत. मुंबई कडील गुंफा उत्तरेकडील साष्टी बेटात खोदल्या गेल्या आहेत. पण मुंबईचे किल्ले दक्षिणेकडील बेटांवर आरूढ आहेत. हा फरक बरेच काही सांगून जातो काळ बदलला व त्याबरोबर सत्तेचे केंद्रे उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकले आता फत्त भय होते ते आरमारी आक्रमणाचे बेटांच्या भौगोलिक संरक्षणाच्या व तत्कालीन रणनीतीच्या गरजा आखून दिल्या. त्यानुसार सतराव्या- अठराव्या शतकात मुंबईत किल्ले उभे राहिले आज काही किल्ले जरी नामशेष झालेले आहेत तरी उरलेले काही किल्ले कसे बसे तग धरून उभे आहेत. बहुतेक किल्ले १७ व्या व १८ व्या शतकातील आहेत. पण माजगाव किल्ला, शिवडी किल्ला, शिवकिल्ला व माहीम किल्ला यांचे उल्लेख १६ व्या शतकात आढळतात.

मुंबई मधील किल्ले – वरळी, माहिम, बांद्रा, काळा किल्ला(धरावी किल्ला), रीवा किल्ला, शिवडी किल्ला, माजगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज, बॉम्बे फोर्ट यापैकी डोंगरी, माजगाव व बॉम्बे फोर्ट कॅसल आता अस्तित्वात नाहीत. उरलेले आठ कसे बसे आज उभे आहेत. मुंबईच्या सात बेटांमध्ये अंतर्गत जलमार्ग नगण्य होते. माहीमची दलदल वनस्पती कचरा वैगरेने खाड्या भरलेल्या असत. माहीम खाडीच्या मुखावर प्रमुख व्यापारी व सत्ता केंद्र असल्यामुले पूर्वीपासून या खाडीला महत्व प्राप्त झाले हि खाडी मुंबई बेटाचे प्रवेशद्वार होती. सर्वाधिक किल्ले या खाडीच्या मुखावर बांधण्यात आले होते. बांद्रा व वरळी हे खाडीच्या मुखावर बांधण्यात आले आहेत. उत्तरेकडून येणारा दुसरा मार्ग हा ठाण्याच्या खाडीतून (उल्हासनदी) असा असे. दक्षिणेकडून व नैतृत्व्य कडून हे प्रवेशद्वार होते आणि आजही आहे. आक्रमणाचे लक्ष पूर्व किनारा असे कारण सत्ता व संपत्तीची केंद्रे तेथे होती. हे चित्र लक्षात घेतल्यास किल्यांची स्थाने कशी व का निवडली गेली याचा उलगडा होतो.

मुंबईत तोफांचे आगमन – त्याकाळात मुंबई मधील असलेल्या बेटांच्या संरक्षणासाठी तट बांधले गेले होते. या तटबंदीच्या सहाय्याने शत्रूवर लांब पाल्याचा मारा करण्यासाठी तोफा  ठेवण्यात येत असत. तटबंदीयुक्त तोफखाने सोबतच तोफा या पोर्तुगाल मधून मुंबईमध्ये आणण्यात आल्या. मुंबई मधील बेटांवर बांधण्यात आलेल्या किल्ल्यांवर तसेच जलवाहतूक आरमार यावर हि तोफांचा वापर झाला युद्ध काळातील सर्वात मोठे शस्त्र म्हणून तोफ वापरण्यास सुरवात झाली.

 1. गेट वे ऑफ इंडिया जवळ जमिनीत गाडलेले २ तोफा

मुंबई मधील प्रसिद्ध ठिकाण गेट वे ऑफ इंडिया इथे सतराव्या शतकातील अंदाजे ८ फुट लांब अश्या दोन तोफा आहेत. या तोफा गेट वे च्या मुख्य गेट कडे जमिनीत गाडलेले आहेत. जमिनीत अंदाजे ३.५ फुट खाली तोफेचे तोंड गाडलेले आहेत. आणि ४.५ येवडा मागचा भाग वर आहे.

ऐतिहासिक दृष्ट्या पहाता या तोफा पोर्तुगीज बनावटीच्या असून मुंबई मध्ये समुद्रमार्गे येणाऱ्या जहाजांवर किंवा समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूवर आक्रमणा विरुद्ध लढाईसाठी सज्ज होते.

गेट वे ऑफ इंडिया जवळच्या परिसरात सध्या नेवल डॉक यार्ड लाईन गेट आहे तेथे  बॉम्बे कॅसल फोर्ट होता. मुंबई च्या सुरक्षितेसाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. गेट वे ऑफ इंडिया हि वास्तू विसाव्या शतकात बांधले मुंबई मधील महत्वाचे स्मारक आहे किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या स्वागता साठी बांधण्यात आले. याचे बांधकाम हे  इंडो सरसैनिक शैली मध्ये ३१ मार्च १९११  या गेट च्या बांधकामाची सुरवात झाली तर सन १९२४ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले.

सन २०१९ सद्य स्थितीत हि वासू राज्य पुरातत्व विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत असून या वस्तूला लागुनच या दोन तोफा जमिनीत गाडलेले आहेत. तोफांवर वर्षानुवर्ष क रंगकाम केल्यामुळे तोफांनाच्या धातूची जंग लागून झीज होत आहे. इथे पर्यटकांना फिरवण्यासाठी असणारे बोटी या तोफांवर दोर अडकवून उभ्या केल्या जातात.

सह्याद्री प्रतिष्ठान यांनी या तोफा जमिनीतून काढून संवर्धन करण्या संदर्भात  राज्य पुरातत्व विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केले असता  या कडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे.   ऐतहासिक वास्तूचे जतन व्हावे हीच मागणी आम्ही करत आहोत

२.क्रॉस मैदान येथील दोन तोफा – 

मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असललेल्या क्रॉस मैदान इथे दोन तोफा कित्तेक वर्षापासून धूळ खात पडत आहेत.  यातील एक तोफ हि सीकॉस्टल प्रकारची आहे तर एक पोर्तुगीज बनावटीची आहे. सीकॉस्टल तोफ हि (लांबी ६.३ फुट उंची ३.१ फुट व्यास २.५ फुट) वजन अंदाजे १ टन एवढी वजनी आहे. तोफेवर १८६५ असे वर्ष लिहले आहेत. तर मिश्र धातू स्वरूपाचा गोल शिक्का आहे. या तोफेचे कान हे ब्लॉक पद्धतीचे आहेत. तर तोफेचे मागची बाजूला गोल अन्कर आहे. सद्य काही समाजकंटकांनी तोफेच्या तोंड हे सिमेंट टाकून बंद केले आहे. हि तोफ समुद्र तटावर वापरण्यात येत होती.

-दुसरी तोफ हि आणि दुसरी तोफ पोर्तुगीज बनावटीची असून त्याची (६.५ फुट उंची १.८ फुट व्यास १.५ फुट व्यास) एवढी असून या तोफेचे कान (तोफ अडकवण्याची जागा,मजबुती) आणि  तोफेच्या मागची बाजू हे चोरट्यांनी कट करून चोरी केले आहेत.

-ऐतिहासक दृष्ट्या पाहता इ.स. ११४० ते १२४१ दरम्यान माहीम बेटावर राणा प्रताप बिंबाने मोठा मजबूत दगडी किल्ला बांधला. इ.स. १३४८ मध्ये येथे मोघलांनी काही काल ताबा घेतला व १५३४ मध्ये मोगलांनंतर पोर्तुगीजांनी या बेटांवर आपली सत्ता स्थापन करून येथील बेटांवर किल्ले बांधले.इ.स.१६६५ मध्ये पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई बेट हे आंदन म्हणून दिले तेव्हा आधी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी नंतर इंग्लडच्या राणीचे राज्य सुरु झाले.

-इ.स.१७१५ मध्ये नियुक्ती झालेल्या चार्ल्स बून या गव्हर्नरने मुंबईच्या विस्तारलेल्या शहराभोवती उंच, रुंद व भक्कम भिंती बांधून त्याला किल्ल्याचे स्वरूप आणले. मुंबई किल्ल्याला चर्चगेट,बाझार गेट,फोर्ट बोरा बझार असे गेट होते. या किल्ल्याच्या लष्करी सुरक्षेसाठी किल्ल्यावर तोफा होत्या.

– सन २०१९ मध्ये हा परिसर ओल्ड कस्टम हाउस मुंबई यांच्या ताब्यात असून इथे क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानाच्या कडेला काही अनधिकृत झोपड्या असून तिथे गर्दुल्ले यांचा वावर आहे. सीकॉस्टल कॅनन प्रकारच्या आणखी तीन तोफा या परिसरात होते अशी माहिती काही स्थानिक सांगतात. या दोन तोफा हि चोरी होण्याची दाट शक्यता आहे.

-सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या निदर्शनास या दोन तोफा आल्या या तोफांचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य पुरातत्व विभागाकडे मागणी केली असून त्यांनी ओल्ड कस्टम हाउस यांना पुरातत्व विभागाने पत्र दिले परंतु ओल्ड कस्टम यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. या तोफा पुरातत्व विभाच्या कार्यालय आणि शिवडी किल्ल्यावर ठेवण्यात यावे अशी मागणी केली असून त्यांना हलवण्याची जबाबदारी घेतली आहे.

३.क्रोफेड मार्केट आणि झवेरी बाजार  येथील ५ जमिनीत गाडलेल्या तोफा

मंबई मधील क्रॉफर्ड मार्केट आणि झवेरी बाजार  या गजबलेल्या ठिकाणी  जमिनीत उलट्या गाडलेल्या तोफा आहेत. या तोफा मार्केट मध्ये असून यांची स्थिती तर वाईटच आहे. एक तोफ तर चक्क एका हॉटेलचा भिंतीत गाडलेली आहे त्या तोफेचे नशीब कि त्या भिंतीला हॉटेल मालकाने प्लास्टर केले नाही नाहीतर हि तोफ इथे आहे हे समजन अवघड झाल असत. हि तोफ फक तीन फुट एवढी जमिनीच्या वर आहे. तोफेच्या मागचा भाग आहे. तर समोर असलेल्या पानपट्टी दुकानाच्या भिंतीजवळ तर दुसरी घड्याळाच्या शॉप जवळ आहे. मुळात या तोफा अंदाजे ७ ते ८ फुट एवढ्या लांबीच्या असून याचा व्यास हा १.५ फुट एवढा आहे.  या सतराव्या शतकातील आहेत. असे लक्षात येते. या तोफांवर manifactur stamp  असून तो काळाच्या ओघात पुसट होऊन झिजला आहे. झवेरी बाजार येथील गणेश वाडी आणि गटार गल्ली येथील तोफा जमिनीपासून १.५ आणि २.५ एवढ्या वर आहेत.

ऐतिहासिक दृष्ट्या पाहता मुंबई किल्ला याच्या बाझार गेट तसेच कर्णाक बंदर येथील समुद्राला लागून पूर्वी हा भाग असावा या तोफा इथे किल्ल्याच्या संरक्षण दृष्टीने ठेवण्यात आले असावे पुढे किल्ला नष्ट झाल्यावर या दुर्लक्षित झाल्या त्यानंतर या समुद्राच्या खाडीतून जहाजे माछिमारे करणाऱ्या बोटी साठी नांगर लावण्यासाठी उलट्या गाडण्यात आल्या असाव्यात असा तर्क लावता येतो.

सन २०१९ मध्ये या तोफा जमिनीत गाडलेल्या स्थितीत असून या शासनाने पुरातत्त्व विभागाने बाहेर काढून यांचे संवर्धन करावे हि दुर्ग प्रेमींची मागणी आहे. हा परिसर मुंबई ओल्ड कस्टम हाउस यांच्या मालकीचा आहे. या संदर्भात सह्याद्री प्रतिष्ठानने राज्य पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

४.कर्णाक बंदर (मांडवी) येथील ४ तोफा

मुंबई मधील मस्जीत बंदर रेल्वे स्थानका पासून काही अंतरावर कर्णाक बंदर नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी पूर्वी बंदर होते इथे चार तोफा असून यामध्ये दोन तोफा या ६ फुट लांब आणि १ फुट व्यास एवढ्या आहेत. या जमिनीवर आहेत. या तोफा येथील सोसायटीच्या बांधकाम दरम्यान जमिनीत सापडल्या होत्या. तर दोन तोफा या जवळपास ७.५ फुट लांब व्यास २ फुट एवढा आहेत. यापैकी एक तोफ हि जमिनीत गाडलेली असून वेल्डिंग च्या दुकानाच्या भिंतीत आहे या तोफेचा फक एक कान बाहेर आहे बाकी पूर्ण तोफ हि भिंतीत आहे. दुसरी तोफ ४ फुट मागची बाजू जमीनच्या वर असून या तोफेचे मंदिर केले गेले आहे येथील सोसायटी मधील लोक या तोफेची पूजा करतात.

ऐतिह्साहिक दृष्ट्या पाहता हे ठिकाण पूर्वी बंदर होते इथे बाहेरील जहाजे पोर्तुगाल नंतर इंग्रज कालखंडात ये जा करत असत. हे ठिकाण मुंबई मधील सेंट जॉर्ज किल्ला आणि माझगाव (डोंगरी) किल्ला (आता पूर्ण पने नामशेष होऊन सद्य तिथे गार्डन आहे.) हे त्या काळात हे किल्ले महत्वाचे होते आणि किल्ल्यांच्या समुद्र तटांवर तोफा होत्या सतराव्या शतकातील बनावटीच्या या तोफा आहेत..

सद्य स्थितीत हा परिसर मुबई महानगर पालिका यांच्या अख्यारीत येतो. या तोफा सुरक्षितेच्या दृष्टीने राज्य पुरातत्व विभाग यांनी जवळील शिवडी किल्ल्यावर ठेवाव्यात अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने पत्रव्यवहार द्वारे केली असून तेथील मांडवी कोळीवाडा रहिवाशी संघ बी.आय.टी चाळ ,मुंबई ४००००९. यांचा या तोफा हटविण्यास संदर्भात विरोध असून त्यांना या तोफा चाळीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शोभे साठी ठेवायचे आहेत पुरातत्व विभागाने स्थानिकांशी चर्चा करून योग्य मार्ग काढावा हि इच्छा दुर्ग प्रेमींची आहे.

५.लोअर परेल येथील २ तोफा

मुंबई मधील परळ मुंबई-१२ रेल्वे स्थानक पूर्वेला मडके बुवा बस स्टोप जवळील रोहन डेवलोपर प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या परिसरात दोन तोफा जमिनीत उलट्या गाडल्या गेल्या आहेत. शिवडी किल्ल्यापासून ५ किमी अंतराव हे ठिकाण आहे. दोन्ही तोफांची मागची बाजू जमीनवर २.८ आणि ३.४ फुट एवढी वर सून अंदाजे या तोफांची लांबी ७ ते ८ फुट एवढी असून व्यास २.२ फुट एवढा आहे.  रोहन डेवलपर इमारतीच्या भिंतीजवळ तर दुसरी गेट जवळ आहे.

ऐतिहासिक दृष्ट्या शिवडी किल्ल्यावरील तोफ असू शकते शिवडी किल्ल्यामधील खाडीत व्यापारउद्देशाने जहाजे ये जा करत असत. तसेच किल्ल्यावर सुरक्षितेच्या दृष्टीने तोफा होत्या. सतरावा कालखंड या हि तोफांचा आहे. यांची बरीच झीज झाल्याने यावार असलेला बनावतीचा शिक्का स्पष्ट दिसत नाही.

सद्य स्थितीत २०१९ मध्ये हा परिसर मुंबई महानगर पालिका यांच्या अंतर्गत येतो. सह्याद्री प्रतिष्ठानने राज्य पुरातत्व विभागाकडे या तोफा संदर्भात  गेल्या ९ महिन्यापासून पत्रव्यवहार केला असता. अद्यप पुरातत्व विभागाने कोणतेच पाऊले उचलली नसून पत्रास उत्तरही दिले नाही. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट इथे हि बऱ्याच तोफा या जमिनीत उलट्या गाडलेल्या आहेत. या संदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टला त्याचा संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत पत्रे देण्यात आली आहेत.

तोफ संवर्धनातील यश – सह्याद्री प्रतिष्ठानच्या गेल्या एप्रिल २०१८ रोजी शिवडी,मुंबई  येथील रेनोल्ड्स कॉलनी येथे पोर्तुगीज बनावटीच्या २० टन वजनी ७.५ फुट लांबीच्या दोन तोफा अनेक वर्षापासून धूळ खात जमिनीवर पडून होत्या. या तोफा संस्थेच्या पदाधिकारी यांचं निदर्शनास आल्यावर त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत असलेल्या या तोफा संदर्भात राज्य पुरातत्व विभाग आणि पोर्ट ट्रस्टला पत्रव्यवहार केला आणि अखेर पोर्ट ट्रस्टने या दोन तोफांना आपल्या ताब्यात घेऊन त्याचे जतन करण्यासाठी सुरक्षित इंदिरा डॉक येथे ठेवल्या आहेत.

मुंबई परिसरातील जवळपास २५० हून अधिक तोफा असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचा शोध आणि आढावा घेण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान घेत असून सद्या आमच्या निदर्शनास आलेल्या १५ तोफा या जमिनीत उलट्या गाडलेल्या तर काही जमिनीवर धूळ खात दुर्लक्षित आहे. या तोफांचे जवळच्या किल्ल्यांवर ठेवून जतन आणि संवर्धन करता येऊ शकते. राज्य पुरातत्व विभाग हळू हळू सकारत्मक पाऊले उचलायला लागले असून त्यांना ओल्ड कस्टम हाउस आणि मुंबई महानगर पालिका सहकार्य करता नाहीत. हे चित्र सध्या दिसून येत आहे.

महाराष्ट्रतील गडकिल्ले एवढेच ऐतिहासिक या तोफा हि आहेत यांच्या बनावटीला २०० वर्ष होऊन गेले असले तरी “महाराष्ट्र प्राचीन स्मारके” पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियत,१९६० च्या कलम २५ अन्वेय पुरावशेष संवर्धन करता येथे या स्थायी पुरातत्व विभागाला संबंधित परिसर ताब्यात आहे अश्यांशी पत्रद्वारे या तोफा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून या तोफा आपल्या ताब्यात घेता येतात. या साठी सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत वर्षभर राज्य पुरातत्व  विभागाला पत्रे आणि स्मरणपत्रे देण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई पुरातत्व विभागाकडून करण्यात आली नाही हे दुर्दैव्य……….

एक विशेष बाब म्हणजे एन्टीक (पुराण वास्तू) या अंतर्गत सरकारी कार्यालय,पोलीस स्थानके, शाळा,महाविद्यालय,उद्याने,चौक अश्या ठिकाणी तोफा या एन्टीक वास्तू म्हणून दर्शनीय ठिकाणी ठेवण्यात येतात पण त्याचे जतन आणि संवर्धन होत नाही. उलट काही ठिकाणी या तोफांना जंग लागून धूळ खात एखाद्या सिमेंटच्या चौथऱ्यावर आडव्या उभ्या पडलेल्या असतात. हि बाब महाराष्ट्र शासनाने लक्षात घेऊन या ऐतिहासिक वास्तूंचे पुरातत्व निकषाने जतन करून एक संग्रहालय तयार करावे हि विनंती सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

(अध्यक्ष –दुर्ग संवर्धन विभाग,सह्यद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ,सदस्य –इतिहास संशोधन मंडळ मुंबई)