28 January 2021

News Flash

प्रेगन्सीच्या टिप्स देणारं करिना कपूरचं पुस्तक

'करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल' 

–  सुनीता कुलकर्णी

आपल्या दुसऱ्या गरोदरपणाच्या काळात प्रेगन्सीच्या टिप्स देणारं पुस्तक करिना कपूरने लिहिलं असून ते लौकरच प्रकाशित होणार आहे. ‘करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ असं या पुस्तकाचं नाव असून ते पुढच्या वर्षी प्रकाशित होणार आहे. जगरनॉट बुक्स ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. करिना कपूर ही बॉलिवूडमधली व्यक्ती नाही तर ब्रॅण्ड आहे. कपूर खानदानात जन्म, पतौडी घराण्यातील नबाब सैफ अली खान या अभिनेत्याशी लग्न एवढीच तिची ओळख नाही. तिची चित्रपट कारकीर्द लक्षणीय आहेच पण त्याचबरोबर करिना कपूर स्वत फॅशन आयकॉन आहे. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचं चांगल्या अर्थाने मार्केटिंग करत ती कायम चर्चेत असते. इतर अभिनेते, अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकारांपासून पळ काढत असताना करिना मात्र प्रत्येक ठिकाणी छायाचित्रकारांना न टाळता सहज सामोरी जाते.  ‘या आणि माझी कितीही छायाचित्रं घ्या. मला आवडतं कुणीतरी माझी छायाचित्रं काढणं’ असं तिचं म्हणणं असतं.

तिचा पहिला मुलगा तैमूर हा तर जन्मल्यापासून ‘टॉक ऑफ द टाऊन’ आहे. इतर सेलेब्रिटी आपल्या मुलांना माध्यमांपासून दडवण्याचा प्रयत्न करत असतात. करिनाने मात्र तैमूरची छायाचित्र घेण्यास छायाचित्रकारांना कधीही मज्जाव केला नाही. एरवी इतर अभिनेत्री आपली प्रेमप्रकरणं, लग्न, गरोदरपण हे सगळेच टप्पे शक्यतो लपवण्याचा प्रयत्न करत असत. अशा वेळी करिनाने आपल्या आयुष्यातला अशा गोष्टी कधीच लपवल्या नाहीत. तैमूरसाठीचं आणि आता दुसरं गरोदरपणही ती छान मिरवताना दिसते. ते लपवण्याएेवजी उलट तिने प्रेगा न्यूजची जाहिरात केली.

गरोदरपणाच्या काळात, पोट पुढे आलेलं असताना गबाळं दिसण्याची शक्यता लक्षात घेऊन घरात बसण्याएेवजी उलट अशा काळात घालता येतील असे सुंदर कपडे घालून तिने तसा ट्रेण्ड सेट केला. करिना फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. तिने फॅशनच्या टिप्स देणारं एक पुस्तक लिहिलं आहे. तिने टीव्ही चॅनल्ससाठी मुलाखती घेण्याचा कार्यक्रम केला आहे. करिनाच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या तैमूरच्या चौथ्या वाढदिवशी तिने तिच्या दुसऱ्या, प्रेग्नन्सी टिप्स देणाऱ्या पुस्तकाची घोषणा झाली आहे. या पुस्तकात गरोदरपणाची सगळी वैद्यकीय माहिती असेलच, त्याबरोबरच गरोदरपणाच्या काळातला आहार, फिटनेस, नंतर बाळाची काळजी कशी घ्यायची याबाबत करिनाच्या टिप्स असतील. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या पुस्तकाचं मुखपृष्ठदेखील शेअर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 4:19 pm

Web Title: kareena kapoor khan announces her new book pregnancy bible for all moms to be nck 90
Next Stories
1 BLOG : ऋषभ पंत…असून अडचण, नसून खोळंबा !
2 सरत्या वर्षामधले सर्वाधिक ट्वीट झालेले पाच सिनेमे
3 BLOG: करोना सकाळी झोपतो, रात्री सुसाट निघतो
Just Now!
X