– करणकुमार जयवंत पोले

जुनी पुस्तक चाळता चाळता भालचंद्र नेमाड्यांची “कोसला” दिसली. पुर्वी डिग्रीला असताना वाचलेली. पण अनुभव सारखे नव्हते. पहिल्यावेळी वाचतानाचा अनुभव आणि यावेळी वाचतानाचा अनुभव काही वेगळाच होता. पहिल्या वेळी वाचताना आपण कुठलं रटाळ पुस्तक वाचतोय असं वाटतं होतं… तेंव्हा येवढी समज नव्हती किंबहूना आयुष्यातली पहिली कादंबरी असल्यामुळं असेल कदाचित असं. म्हणजे पुस्तक तेचं पण अनुभव मात्र वेगळे. पण यावेळी वाचताना खरा पांडुरंग सांगवीकर मला भेटला. आपल्या घरच्यांच्या जुनकट विचारांची व्येथा मांडणारा आणि त्यांच्याविरोधात बंड करणारा सडेतोड, आपल्या बहिणीच्या मृत्यूची कथा सांगणारा. आत्तापर्यंतच्या मराठी इतिहासातल मरणाच सर्वांत ह्यद्यद्रावक वर्णन सांगून डोळ्यांच्या कडा नकळत भिजवनारा.आपल्या कॉलेजच्या गमतीजमती. हॉस्टेल जिवन, मेसच्या बिलांचे प्रश्न, कॉलेज जिवनाच्या आठवणी जश्या त्या आपल्याच असाव्या अश्या. अनेक रात्री जागून काढनारा आणि रात्रंरात्रं टेकड्या फिरणारा. मुलींच्या आसपासही न भटकनारा तरीही त्यांच्याबद्दल आस्था वाटावी असा हा पांडुरंग सांगवीकर आणि आपण यात काही फरकच वाटतं नाही. स्तब्ध करत जाणारे त्याचे एकटेपण. जसे आपण सद्यपरिस्थितीत आहोत किंवा येरवीही जसे जगतो तसे! कादंबरीहीत तो कुणाबरोबरही मिसळलेला वाटतं नाही किंवा तो कुणाला बरोबर घेऊन चाललेला ही वाटतं नाही. अगदी स्तब्ध निरव शांततेन आपल एकटेपण अधोरेखीत करणारा सच्चा पांतस्थ भासतो! स्वःतभोवती फिरून फिरून रेशम आळी जशी “कोसला” तयार करते तसेच आपणही विचारांचे आभासी धागे तयार करतं असतो. त्या धाग्यांमुळे आपल जीवन उगाच गुंतागुंतीच करू नये तर आपण विणत असलेले धागे हे अमूल्य अश्या रेशीमचे असतात हे आपण ओळखावे आणि अलगद गाठ सुटावी तसे गुंतलेल्या मनाच्या गाठी सोडाव्या! बाकी अभी तो “कोसलाही है हमारा हौसला!!! ”

– करणकुमार जयवंत पोले
रा.वाळकी, ता.औंढा ना. जि.हिंगोली