दिलीप ठाकूर- 

तुम्ही म्हणता ना, हिंदी चित्रपटसृष्टीसारखं गाॅसिप मराठी चित्रपटसृष्टीत नाही का? आजच्या ग्लोबल युगात अर्थात सामाजिक/सांस्कृतिक मोकळ्या ढाकळ्या वातावरणात तर नक्कीच असणार. तर मग ते हिंदी फिल्म इंडस्ट्रीसारखे चघळले का जात नाही? खुद्द मराठी चित्रपटसृष्टीला ते मानवत नाही, पटत अथवा पचत नाही की मराठी स्टार्स आपल्यातील वाटतात, तर मग कशाला कोणाचा कुणाशी टाका भिडलाय, कोण कसे कोणाचे नाव हक्काने/हट्टाने सुचवतो वा अगदी खोडतो असे लिहा. वगैरे वगैरे बरेच काही.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

पण गाॅसिप्स म्हणजे काही फक्त कुचाळक्या नाही. म्हणजे, प्रेम लफडे, संसारातील भांडण, विवाहबाह्यसंबंध वगैरे वगैरे नाही. ते तर असतेच पण मोकळे ढाकळे अथवा बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल करता करता हाॅट अथवा सेक्सी लूक, तसे आकर्षक ग्लॅमरस फोटो सेशन म्हणजे त्याच गाॅसिप्सकडचे सकारात्मक पहिले छान पाऊल होय आणि तुम्ही सोशल मिडियात जर ‘कटाक्ष ‘ टाकला तर तुम्हाला तसे काही नव्हे तर बरेच फोटो दिसतील. विशेष म्हणजे त्यातील आकर्षकता आणि सातत्य कौतुकाचे व कमालीचे आहेच, पण एकूणच सगळे कसे बाॅलीवूड स्टार्सच्या तोडीस तोड आहे. पूर्वी असे काही चंदेरी/सोनेरी आणि नवीन फॅशनच्या ड्रेसमधील अभिनेत्री पाहायच्या तर हिंदी चित्रपटाचा इस्टमनकलर पडदा आणि ग्लाॅसी पेपर्सवरील गाॅसिप्स मॅगझिन यावरच अवलंबून रहावे लागे. मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात अशी मॅगझिन आणली जात नसत. लायब्ररीत गेल्यावर एकादी कादंबरी बदलता बदलता अशा मॅगझिनना चाळले जाई आणि रेखा, झीनत अमान, परवीन बाबी, नितू सिंग यांचे हाॅट लूक फोटो पटकन पाहिले जात. आशा सचदेव, कोमिला विर्क, केटी मिर्झा, श्यामली, शीतल अशांचे बिनधास्त आणि बेधडक फोटो त्याच मॅगझिनच्या सेन्ट्रल पेजचे खास आकर्षण असे ( या नावाच्याही अभिनेत्री होत्या बरं का? त्या पडद्यावर कमी पण अशा मॅगझिनमध्ये जास्त चमकायच्या). मराठी उच्चभ्रू नवश्रीमंत क्लासमध्ये अशी मॅगझिन हुकमी असत. पण ती वाचली कमी जात पण पाहिली जास्त जात. अर्थात, असे ग्लॅमरस फोटो पाहणे म्हणजे एक प्रकारचे जणू वाचनच तर असते, याचे कारण म्हणजे या फोटोतील या अभिनेत्रींचे बोलके एक्स्प्रेशन ( विशेषतः त्यांचे डोळे/नजर/कटाक्ष) आणि कॅमेरासमोरची एकूणच देहबोलीत आत्मविश्वास दिसतोय अथवा वाचता येतोय. आपण कॅमेरात नेमक्या कशा आहोत, अशा बोल्ड फोटोत आपण कशा दिसतोय, इतकेच नव्हे तर इतरांना हेच फोटो कसे दिसतील, त्यांना कसे आवडतील, सोशल मिडियात याच फोटोना कसे भरभर आणि भरभरून लाईक्स मिळतील, एकाद दुसरी वाह्यात काॅमेन्टस सोडली तर आपला उत्साह, उमेद, उर्मी वाढवणारी काॅमेन्टस कशी येईल, फेसबुक/इन्स्टाग्राम/ट्वीटरवर आपले फोटो कसा भरपूर स्कोर करतील या सगळ्यांचा त्यांनी कळत नकळतपणे विचार केला आहे अथवा अनुभवातून करतील हे नक्कीच.

एव्हाना तुम्ही या ब्लॉगसोबतचे ग्लॅमरस हाॅट लूक फोटो नक्कीच पाहिले असणार. सोशल मिडियात हे तसे काॅमन आहे आणि त्यासाठी लागणारी सौंदर्यदृष्टीही आजच्या ग्लोबल युगातील युथमध्ये आहे. फार पूर्वी एकाद्या मराठी अभिनेत्रीचा गाॅसिप्स मॅगझिनमध्ये बोल्ड फोटो दिसला रे दिसला की टीकाकार म्हणत, ही अमेरिका नाही. हे आपले कल्चर नाही. मराठी अभिनेत्रींनी आपली परंपरा, सभ्यता, संस्कृती, मूल्ये विसरु नये वगैरे वगैरे म्हटले जाई. अनाहूत सल्ले देत. एक फोटो आणि वादविवाद चौफेर असा तेव्हा मामला असे. खरं तर अशा आकर्षक ग्लॅमरस फोटोसाठी सुडौलपणा, मानसिक तयारी, प्रसन्न मुद्रा आणि अतिशय महत्वाचे म्हणजे फोटोग्राफरवर विश्वास असे अनेक घटक असतात. या जोडीला आपल्या कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रिणीची खरी प्रतिक्रियाही महत्वाची असते. त्यांनाही विश्वासात घ्यावे लागते.

हिंदी चित्रपटसृष्टीत अशी फोटो सेशन एकूणच करियरचा भाग मानतात. मराठी चित्रपटसृष्टीत तशी व्यावसायिकता आता मुरलीय. त्याची सुरुवात ‘हिप हिप हुर्ये ‘ या चित्रपटात स्मिता गोंदकरने बिकिनी रुपात दर्शन घडवले तेव्हा झाली असे मानले तर त्यात सहजता येण्यास दशकभरचा काळ जावा लागला हेदेखील नाकारता येत नाही. प्रत्येक पुढची पिढी एकाद्या गोष्टीचा सहज आणि नवीन विचार करतेय असे दिसतेय.

पूजा सावंतने कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो सेशनच्या मालिकेतून लक्ष वेधून घेतलेय. तिच्या व्यक्तिमत्वात ठामपणा आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तो हवाच. तोच प्रगतीची दारे उघडतो. रसिका सुनील ‘माझ्या नवराची बायको ‘ या मालिकेने लोकप्रिय झाली असतानाच तिने ती मालिका सोडण्याचे धाडस दाखवले याचाच अर्थ ती इतरांपेक्षा काही वेगळे करेल असा तिच्यात आत्मविश्वास आला आहे असाच होतो. अमेरिकेत जाऊन चित्रपट माध्यम प्रशिक्षण घेऊन परतल्यावरचा तिचा आत्मविश्वास थक्क करून टाकणारा आहे. आणि तोच तिच्या प्रेझेन्टटेबल लूकमध्ये आहे हे फोटोत दिसतेय. ती बाॅलीवूडची स्टार वाटतेय. अमृता खानविलकरने राझी, सत्यमेव जयते, मंगत असे एकेक करत अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारत तिकडचे ग्लॅमरस फोटो सेशनचे कल्चर छान आत्मसात केल्याचे दिसते. त्यासाठी लागणारा ड्रेस सेन्स तिच्यात रुजलाय. प्राजक्ता माळी, मिताली मयेकर, तृप्ती तोरडमल, स्मिता गोंदकर यांचे ग्लॅमरस फोटो सेशन असेच बाॅलिवूडच्या तोडीस तोड आहे. होय नक्कीच आहे असे ठामपणे म्हणता येईल आणि हेच त्यांचे यश आहे. यातून त्यांच्या फॅन्सची संख्या नक्कीच वाढली असेल. आणखीन काही मराठी अभिनेत्रींनी अशा फोटो सेशनमध्ये सहजता आणलीय, सकारात्मक वृत्ती ठेवलीय. सगळीच नावे द्यायची गरज नाही. येथे ‘नावात काय आहे?’ येथे ग्लॅमरस वृत्ती महत्वाची आहे. पण त्यांनी इतक्यावरच थांबू नये म्हणजे काय? तर याच टप्प्यावर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत झेपावायचे असेल तर इंग्रजी मिडियात कव्हरेज मिळवायला हवे. तिकडच्या काही स्टार फोटोग्राफरकडे लॅव्हिश बॅकग्राऊंडवर फोटो सेशन करायला हवे. हे सहजच सुचवतोय बरं. त्या फोटोग्राफरच्या इंन्स्टाग्रामवर आपले आकर्षक फोटो पोस्ट व्हायला हवेत. याचे कारण म्हणजे तेव्हा ते हिंदी चित्रपटसृष्टीत पाहिले जातील. तात्पर्य, आपला एक्सपोझर आपणच वाढवायला हवा. आणि बाॅलीवूडमध्येही आपली स्पेस निर्माण होऊ शकेल असे टॅलेंट आणि ग्लॅमर आपल्यात असेल तर डर का हे का? मराठीत सध्या विविध विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत तसेच ते हिंदीतही आहेत. म्हणजे भरपूर स्कोप आहे आणि अशातच वेबसिरिजचे विश्व खुले झाले आहे, तेथे ‘काही अपवाद करता ‘ मोठ्या प्रमाणात बिनधास्त आणि बेधडक परफाॅर्म लागतोय त्याचा मार्ग आणि गरज याच धडाकेबाज फोटो सेशनमधून जातोय अथवा जाऊ शकतोय…. तात्पर्य, हे फक्त बाॅलिवूडच्या रंगढंगाचे फोटो पोझ नाही तर त्यात अनेक गोष्टी सामावल्यात आणि यालाच तर महत्व आहे आणि याच सगळ्याचे पुढचे पाऊल म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील गाॅसिप्सची रंगवून खुलवून आणि उघडपणे चर्चा असेही कदाचित असू शकते. आपण एकूणच येथपर्यंत येऊ असे तरी कुठे वाटले होते? काळ हा सगळ्या गोष्टींवरचे उत्तर देत असतो आणि ते सकारात्मक असतेच.