जय पाटील
याआधी गटारातील गॅसवर चहा करणाऱ्या व्यक्तीच्या किश्श्यामुळे ट्रोल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पवनचक्कीच्या साहाय्याने हवेतून पाणी आणि ऑक्सिजन वेगळा करण्याच्या सूचनेवरून पुन्हा एकदा ट्रोलर्सचे लक्ष्य ठरले आहेत. ‘मोदींचे वक्तव्य ऐकून टर्बाइनने आत्महत्या केली’, ‘आपण पवनचक्कीत कोविडची लस ओतली तर कदाचित अख्ख्या जगाला कोविडमुक्त करता येईल’, अशा प्रतिक्रियांतून पंतप्रधानांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. ट्विटरवर ‘टर्बाइनटेल्स’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.

पवनउर्जा क्षेत्रातील ‘वेस्टाज’ या डेन्मार्कस्थित कंपनीने भारतासारख्या वाऱ्याचा वेग कमी असणाऱ्या प्रदेशांत उपयुक्त ठरतील अशा पवनचक्क्यांची निर्मिती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्रिक अँडरसन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी पवनउर्जेविषयी चर्चा केली. त्यावेळी मोदी यांनी हेन्रिक यांना काही कल्पना सुचवल्या. ‘काही भागांत विशेषत: किनारपट्टीजवळ हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते आणि पाणी टंचाई भेडसावते. अशा ठिकाणी पवनचक्कीच्या माध्यमातून हवेतील पाणी वेगळे करून पिण्यायोग्य स्वच्छ पाणी उपलब्ध करून देता येईल का? शिवाय पवनचक्कीच्याच माध्यमातून हवेतील ऑक्सिजन वेगळा करून ऑक्सिजनच्या बाजारपेठेलाही प्रोत्साहन देता येईल का. तसे झाल्यास एका पवनचक्कीतून तीन फायदे होतील,’ अशा सूचना मोदी यांनी हेन्रिक यांना केल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून विनोदांना उधाण आले आहे.

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Why Nitin Gadkari said If BJP government comes will some be sent to Pakistan in front of Prime Minister Narendra Modi
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

मोदी यांचा उल्लेख ‘आइन्स्टाइंद्र मोदी’ असा करण्यात आला आहे. ‘मोदींचा आयक्यू आणि आइन्स्टाइनचा आयक्यू यांची बेरीज केली तर ती आइन्स्टाइनच्या आयक्यू एवढी होते’, ‘आपल्यासारखे जुनाट लोक मोदींसमोर टिकूच शकत नाहीत, ते आपल्या खूप पुढे आहेत,’ अशा आशयाच्या ट्विट्सचा खच ट्विटरवर पडला आहे. या चर्चेत पाणी शोषून घेण्याची सूचना करताना मोदी यांनी ‘हवा मों से वॉटर शक करके…’ असे म्हणत ‘सक’ या इंग्रजी शब्दाचा चुकीचा उच्चार केला आहे. त्यावर बोट ठेवायलाही नेटिझन्स विसरलेले नाहीत. ‘मुझे पहलेसेही ‘शक’ था की आप इनक्रेडिबल सायन्टिस्ट हैं.’ ‘जर आपण सीबीआय, इडीचे ऑफिस पवनचक्कीत टाकले, तर निरव, मल्या, चोक्सी यांना भारतात पुन्हा शक करून घेऊ शकतो का?’ असे प्रश्न करण्यात आले आहेत. काहींनी तर मोदी यांना आताच २०२१ चे नोबेल पारितोषिक विजेते घोषित केले आहे.

राहुल गांधी यांनीही मोदींच्या या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘खरी समस्या ही नाही की मोदी यांना कळत नाही. त्यांच्या हे लक्षात आणून देण्याची धमक त्यांच्या निकटवर्तीयांत नाही, हे वास्तव अधिक भयंकर आहे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान मोदी यांची बाजू सावरून घेण्यासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्तेही प्रयत्न करत आहेत. सर्व शोधांची सुरुवातीला अशीच खिल्ली उडवण्यात आल्याचे आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर विविध देशांत संशोधन सुरू असल्याचे दाखले देणारे ट्विट्स मोदी यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहेत.