08 April 2020

News Flash

रँडचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंचे आराध्य दैवत होते छत्रपती शिवाजी महाराज

पुण्यातील पर्वती येथे स्वतः चा चापेकर क्लब नावाची संस्था उभारली

चाफेकर बंधूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज

– कृष्णा पांचाळ

स्वातंत्र्यासाठी चापेकर बंधूंचे मोठे योगदान;रँड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला घातल्या होत्या गोळ्या

स्वातंत्र्याच्या अगोदर क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक प्रयत्न केले, तर एका रँड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा गोळ्या घालून वध देखील केला होता. दामोदर चापेकर यांचे आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्यावर अनेक पोवाडे चापेकर यांनी केलेले आहेत. हरिभाऊ चापेकर या कीर्तनकाराच्या घरी दामोदर चापेकर यांचा जन्म झाला. त्यांना इंग्रजी भाषेचा तिरस्कार होता. त्यामुळेच ते इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दुध नसून पुतना मावशीचे दूध असल्याचे म्हणत.

दामोदर चापेकर यांना इंग्रजी भाषा शिकलो, त्यांची संस्कृती अवगत केली तर त्यांचे आपण गुलाम बनू असे नेहमी वाटायचे. त्यावेळी लहुजी वस्ताद साळवे यांनी चापेकर बंधूंना प्रेरणा दिली. ते आई वडिलांसह बैलगाडीमधून काशी यात्रा गेले होते. तेव्हा, देशातील खरी परिस्थिती त्यांच्या डोळ्या समोर दिसली. देशाची किती दयनीय अवस्था आहे हे त्यांच्या लक्षात आले. आपला देश यातून मुक्त झाला पाहिजे तेव्हाच आपण काहीतरी करू असे ते म्हणायचे. येन तारुण्यात त्यांनी शाहू महाराज, चित्तोड चे महाराजा, नेपाळ नरेषांकडे सैन्यातभर्ती होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तेव्हा तेथील व्यक्तींवर ब्रिटिशांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांना कोणी सैन्यात घेतले नाही. अखेर पुण्यातील पर्वती येथे स्वतः चा चापेकर क्लब नावाची संस्था उभारली. त्यात ३०० युवकांना पिस्तुल चालविणे, मल्ल, धनुर्विद्या, गलोर चालवणे असे प्रशिक्षण दिले.

देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यासाठी ते लोकांना तयार करत. पुण्यात प्लेग ने थैमान घातले होते. आणि तेव्हा अत्यंत कठोर, निष्ठर ब्रिटिश अधिकारी रँड हा पुण्यातील महिलांना तपासण्याच्या बहाण्याने स्त्रियांवर अत्याचार करत होता. अत्याचाराचा बदला आणि स्वातंत्र्याची धरपड यामुळे त्यांनी रँड ला मारण्याचा कट रचला. गणेश खिंड येथे एका कार्यक्रमहून परतत असताना रँड ला गोयंद्या आला रे आला म्हणताच गोळ्या घालून वध करण्यात आला. त्यांच्यासोबत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला देखील मारण्यात आले. घटनेनंतर ते चिंचवडमधील चापेकर वाड्यात येऊन सहा महिने राहिले, रँड ला मारण्यासाठी वापरलेले शस्त्रे चापेकर वाड्यात असलेल्या विहिरीत टाकून दिली होती.

मात्र द्रविड बंधूनी चापेकर यांना पकडवून दिले. त्यानंतर त्यांना येरवडा येथे फाशी देण्यात आली. फाशी रद्द व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 9:36 am

Web Title: shivaji maharaj was the inspiration for chapekar brothers who assassinated rand scsg 91
Next Stories
1 “फरासखाना बॉम्बस्फोटामागे ब्राह्मण्यवादी नाहीत तर ‘सिमी’च, मुश्रिफांच्या पुस्तकातील आरोप निराधार”
2 BLOG : अस्तित्वाचे ‘राज’कारण विसरले?
3 Blog : तहान भागवणारं पाणी आज जीवघेणं ठरतंय
Just Now!
X