– रजनीश कुमार

२७ जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन अर्थात लघु, छोटे व मध्यम उद्योजक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकीकडे कोविड-१९ विषाणूमुळे या उद्योजकांपुढे नवनवीन आव्हाने उभी ठाकत आहेत आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून नवी सुवर्ण किनारही त्यांना खुणावत आहे. याचा उहापोह करणारा हा लेख.

ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

कोव्हिड–१९ ने व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत आणि मुळातच टिकून राहण्यासाठी कशा प्रकारचे बिझनेस मॉडेल आवश्यक आहे, याचा फेरविचार करण्यासाठी जगभरातील उद्योगांना या आजाराने खाद्य पुरवले आहे. अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांवर या संकटाने गहिरा परिणाम केला आहे, परंतु सर्वाधिक फटका मध्यम, लहान व सूक्ष्म उद्योगांना (एमएसएमई) बसला असून नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून एमएसएमईंना पाठबळ देऊन मदत करण्याचा सरकारने केलेला प्रयत्न याचेच निदर्शक आहे. एमएसएमई क्षेत्र हे अर्थव्यवस्थेला भरारी घेण्याची मदत करणारे पंख असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३० टक्के योगदान देणारे हे क्षेत्र लक्षावधी लोकांना रोजगार देते. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यात आणि मोठ्या कंपन्यांना आवश्यक कच्चा माल पुरवण्यात हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते.

या क्षेत्राला मजबुती देण्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढवता यावी, यासाठी सरकारने एमएसएमईंची व्याख्या बदलली आहे, विनातारण ऑटोमॅटिक कर्जाची तरतूद केली आहे, तसेच दबावाखालील कर्जे आणि भांडवल उभारणीसाठी आपत्कालीन क्रेडिट लाइनसह सबऑर्डिनेट डेट मेकॅनिझम उभे केले आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे व्यापार मेळावे आणि प्रदर्शनांचे आयोजन शक्य नसल्याने या ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीत पर्याय म्हणून एमएसएमईंना ई–मार्केट जोडणी देण्यावर सरकार भर देत आहे.

या ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीशी जुळवून घेण्यात वेगवान तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर मदत होत असून यामुळे लॉकडाउनचे परिणाम पचवून दैनंदिन आयुष्य काहीसे सुलभ झाले आहे. एमएसएमईंसाठी देखील या बदलांच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञानच आहे. ई–कॉमर्सचंच उदाहरण घ्या. लॉकडाउनच्या काळात मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यात ई–कॉमर्सने मध्यवर्ती भूमिका बजावली. दैनंदिन जीवन आणि उपजीविकेच्या बाबतीत विचार करत असताना ई–कॉमर्सचे हे केंद्रस्थान आणि डिजिटल फोकस या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ राहाणार आहेत.

लॉकडाउनच्या काळात भारतात फ्लिपकार्ट व त्यांच्यासारख्या अन्य ई–कॉमर्स कंपन्यांनी वितरण करणाऱ्या व्यक्तींपासून गोदामांपर्यंत आरोग्याची संपूर्ण काळजी घेत जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे घरपोच वितरण करत नागरिकांना घरी राहण्यास मदत केली. अनेक बंधने आता हटत आहेत. ई–कॉमर्स कंपन्यांनी त्यांची सुरक्षित पुरवठा साखळी आणि ठोस एसओपींचा वापर करून बिगर–जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणालाही सुरुवात केली आहे. एमएसएमईजनी आता या यंत्रणेचा लाभ घेऊन आपल्या मालाचा साठा मोकळा करून पुन्हा व्यवसायाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबरोबरच कंपन्यांची पुर्नरचना, कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे यातही ई–कॉमर्स मोलाची भूमिका बजावू शकतात. विपणन, साठवणूक आणि बाजारपेठेची उपलब्धता यात मदत करून ई–कॉमर्स या एमएसएमईंना स्त्रोतांचा पुरेपूर वापर करण्यासाठीही मदत करू शकतात. यामुळे प्रत्यक्ष निर्मितीसारख्या मुख्य कामासाठी एमएसएमईंना अधिक स्त्रोत उपलब्ध होतील. तसेच, पुरवठा–साखळी अधिक कार्यक्षम करून एमएसएमईंना नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठीही ई–कॉमर्समुळे अधिक शक्यता खुल्या होतात. सध्यासारख्या अभूतपूर्व आर्थिक परिस्थितीमुळे ग्राहकांना मूल्याचा अधिक परतावा हवा असतो. एक बाजारपेठ म्हणून फ्लिपकार्ट ही अत्यंत महत्त्वाची बाब एमएसएमईंपर्यंत घेऊन येते, जेणेकरून त्यांना आपल्या उत्पादनात अनुषंगिक बदल करणे शक्य होते. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देणे आणि कन्झम्प्शन इंजिन गतिमान ठेवण्यासाठी ही भागिदारी मोलाची भूमिका बजावू शकते.

सध्याच्या काळात अल्प कालावधीपुरते बोलायचे झाल्यास ई–कॉमर्समुळे एमएसएमईंना बाजारपेठेची उपलब्धता होण्याबरोबरच व्यक्तीसंपर्क टाळून पुरवठा साखळी सुरू ठेवण्यास मदत होते. मध्यम ते दीर्घ कालावधीत ई–कॉमर्स जागतिक व्यासपीठाच्या माध्यमातून एमएसएमईंना राज्यांच्या आणि देशांच्या सीमांच्या पलिकडे देखील व्यवहार करण्यास मदत करेल. खरेदीदार आणि उत्पादकांकडे असलेली रोखीची टंचाई आणि आर्थिक क्षमतेवर झालेला परिणाम या पार्श्वभूमीवर बाजारपेठेची ही उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे.

सर्व प्रकारच्या व्यवसायांना कोव्हिड–१९ पूर्व काळातील सामान्य परिस्थितीत परतण्यास वेळ लागणार आहे, हे लक्षात घेता टिकून राहणे महत्त्वाचे आहे. याचा विचार करता डिजिटल तंत्रज्ञान अधिक वेगाने स्वीकारण्यासाठी एमएसएमई क्षेत्रासाठी हीच वेळ योग्य आहे. एमएसएमईला क्षेत्राला एकसंध करण्याची क्षमता ई–कॉमर्समध्ये आहे. काळाची पावले ओळखत डिजिटल होण्याची तयारी दाखवणे छोट्या कंपन्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

(लेखक फ्लिपकार्ट समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य कंपनी व्यवहार अधिकारी आहेत.)