समीर जावळे

मीना किश्वर कमाल या प्रसिद्ध अफगाणी कवयित्री होत्या. तसेच अफगाणी महिला क्रांतीकारी मोर्चाची स्थापनाही त्यांनी केली होती. 1977 ते 1987 च्या कालावधीत त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्याचा त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न झाला. मात्र त्यांनी कुणालाही न जुमानता खंबीरपणे लढा देत ही संघटना सुरु ठेवली. त्यांचे विचार परखड आणि प्रखरही होते.

Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
How names of two lions Sita and Akbar
सिंहाचं नाव अकबर अन् सिंहिणीचं नाव सीता ठेवल्याच्या वादात मोठी कारवाई; त्रिपुराच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला केले निलंबित
The Wadhawan brothers in DHFL fraud
‘डीएचएफएल’च्या वाधवान बंधूंच्या बँक, डीमॅट खात्यांवर टाच 
haj Pilgrims
हजयात्रेकरूंना त्यांचे पैसे परत मिळणार! ‘हे’ आहेत आदेश…

1981 मध्ये त्यांनी महिलांना सक्रिय करण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी पयाम-ए-जान हे मासिक सुरु केले. तर अफगाणिस्ताना शरण येणाऱ्या मुलांसाठी ‘वतन’ या नावाने काही शाळाही सुरु केल्या. 1987 या वर्षी म्हणजेच त्या जेव्हा अवघ्या 30 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानातील क्वेटा या ठिकाणी 4 फेब्रुवारी 1987 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. Afghanistan Liberation Organization चे नेते फैझ अहमद यांच्याशी मीना यांनी विवाह केला. मात्र 1986 मध्ये फैझ अहमद यांचीही हत्या करण्यात आली.

मीना किश्वर कमाल यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1956 ला झाला होता. अफगाणिस्तानातील एक क्रांतीकारी महिला, स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणारी स्त्री अशी त्यांची ओळख होती. त्यांनी महिलांसाठी Revolutionary Association of the Women of Afghanistan (RAWA) ही संघटनाही सुरु केली होती. मीना या महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी ही संघटना सुरु केली होती. अफगाणिस्तानातील अन्याय सहन करत शांत बसलेल्या प्रत्येक महिलेने बोललं पाहिजे. अन्यायाविरोधात पेटून उठलं पाहिजे असे त्यांचे विचार होते. कथित धर्मरक्षकांनी बुरखा प्रथा त्यांना मान्य करायला लावली. मात्र बुरखा परिधान करुनही त्यांचे क्रांतीकारी विचार कधीही लपले नाहीत. त्यांना ‘नापाक’ ‘बदकार’ अशी अनेक दुषणं लावण्यात आली. मात्र कशाचीही पर्वा न करता त्या त्यांची लढाई लढत राहिल्या.

2006 मध्ये TIME मॅगझीननेही मीना किश्वर कमाल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली. 60 Asian Heros या लेखात मीना किश्वर कमाल यांच्या नावाचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला होता. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला मात्र स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या चळवळीचे बीज त्या जाताना रोवून गेल्या. RAWA ही संघटना त्यांनी 12 वर्षे चालवली. मात्र अफगाणी स्त्रियांच्या चळवळीसाठी ही संघटना महत्त्वाची ठरली. स्त्रियांबाबत, त्यांच्या हक्कांबाबत, शिक्षणाबाबत मीना आवाज उठवत होत्या म्हणून त्यांची हत्या कऱण्यात आली. मात्र त्यांनी मांडलेला क्रांतीकारी विचार मेला नाही. त्यांचे विचार किती क्रांतीकारी होते याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. जे त्यांनी पाहिलं, अनुभवलं ज्यासाठी त्या लढल्या तेच विचार त्यांच्या कवितेतून कागदावर उतरले.

 

मैं कभी पीछे नहीं लौटूंगी

मैं वह औरत हूं जो जाग उठी है
अपने भस्म कर दिए गए बच्चों की राख से
मैं उठ खड़ी हुई हूं और
बन गई हूं एक झंझावात
मैं उठ खड़ी हुई हूं
अपने भाइयों की रक्तधाराओं से
मेरे देश के आक्रोश ने मुझे अधिकार-समर्थ बनाया है
मेरे तबाह और भस्म कर दिए गए गांवों ने
दुश्मन के खिलाफ नफरत से भर दिया है।
मैं वह औरत हूं
जो जाग उठी है।
मुझे अपनी राह मिल गई है
और कभी पीछे नहीं लौटूंगी
मैने अज्ञानता के
बंद दरवाजों को खोल दिया है
मैंने सोने की हथकड़ियों को
अलविदा कह दिया है
ऐ मेरे देश के लोगों,
मैं अब वह नहीं, जो हुआ करती थी
मुझे अपनी राह मिल गई है
और कभी पीछे नहीं लौटूंगी।
मैंने देखा है नंगे पांव,
मारे-मारे फिरते बेघर बच्चों को
मैंने मेहंदी रचे हाथों वाली दुल्हनों को देखा है
मातमी लिबास में
मैंने जेल की ऊंची दीवारों को देखा है
निगलते हुए आजादी को अपने मरभुक्खे पेट में
मेरा पुनर्जन्म हुआ है
आजादी और साहस के महाकाव्यों के बीच
मैंने सीखे हैं आजादी के तराने
आखिरी सांसों के बीच,
लहू की लहरों और विजय के बीच
ऐ मेरे देश के लोगों, मेरे भाई
अब मुझे कमजोर और नाकारा न समझना
अपनी पूरी ताकत के साथ मैं तुम्हारे साथ हूं
अपनी धरती की आजादी की राह पर
मेरी आवाज घुल-मिल गई है
हजारों जाग उठी औरतों के साथ
मेरी मुट्ठियां तनी हुई हैं
हजारों अपने देश के लोगों के साथ
तुम्हारे साथ मैंने अपने देश की ओर
कूच कर दिया है
तमाम मुसीबतों की, गुलामी की
तमाम बेड़ियों को
तोड़ डालने के लिए
ऐ मेरे देश के लोगों, ऐ भाई
मैं अब वह नहीं, जो हुआ करती थी
मैं वह औरत हूं, जो जाग उठी है
मुझे अपनी राह मिल गई है
और मैं अब कभी पीछे नहीं लौटूंगी।

मीना किश्वर कमाल

मी कधीही मागे हटणार नाही असं आपल्या कवितेतून मांडणाऱ्या, स्त्रियांची समाजाची वेदना कवितेतून व्यक्त करणाऱ्या मीना किश्वर कमाल यांना ठार करण्यात आलं. मात्र त्यांचे विचार, त्यांच्या कविता या आजही प्रेरणा देणाऱ्या ठरत आहेत यात काहीही शंका नाही.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpres.com