प्रसाद काळे

मी स्वतः ला trekker समजत नाही, पण फिरस्तीचा स्वभाव आणि भटकायची प्रचंड आवड ही पीढीजात आली आहे. माझे आजोबा कै.मोरेश्वर गो.काळे यांनी काश्मीर,म्हैसूर पायी प्रवास केला आहे. आमच्या रोहा या गावातील पंचक्रोशीत ‘प्रवासी काळे’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी प्रवास वर्णनाची चार पुस्तकंही लिहिली आहेत. माझे बाबा काळे गुरुजी यांनी तर संपूर्ण भारत भ्रमण केलं आहे. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात मुंबई-पुणे आणि पुढे कोल्हापूर अशी सायकल स्वारीही केली आहे.

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजे किल्ले रायगड. या रायगड जिल्ह्यातील रोहा गावात अवचितगडाच्या सानिध्यात रम्य बालपण गेलं. या गोष्टीचा मला रास्त अभिमान आहे. लहानपणी दिवाळीची सुट्टीत दर वर्षी आवर्जून मातीचे किल्ले तयार करणं, मे महिन्याची सुट्टी असली व घरी पाहुणे आले की त्यांना गिरीदुर्ग दर्शन करायचं असेल तर ‘किल्ले रायगड’ व जलदुर्ग दर्शन करायचं असेल तर ‘किल्ले जंजिरा ए मेहरुब’ दाखवायची जबाबदारी माझ्यावर असे.

थोडक्यात अशा या सर्व ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायचे संस्कार लहानपणापासूनच होत होते. त्यामुळे रायगड व जंजिरा ह्या दुर्गाना अगणित वेळा भेटी झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची ३०० वी पुण्यतिथी किल्ले रायगड येथे झाली तेव्हा स्व.इंदिरा गांधी उपस्थित राहिल्या होत्या व मला माझे बाबा खासकरून तो समारंभ दाखवायला घेऊन गेले होते.

पुढे शिक्षणासाठी रत्नागिरी रत्नदुर्गच्या सानिध्यात व नोकरीच्या निमित्ताने डोंबिवली मध्ये स्थायिक झालो. चार ते पाच वर्षांपूर्वी डोक्यात एक विचार आला की आपण छत्रपती शिवरायांना आपण आपले आदर्श मानतो व छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो आणि त्यांचा जयजयकार आपसूकच होतो. आपण स्वतःला महाराजांचे मावळे समजतो. अशा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले आपण नक्कीच पाहिले पाहिजेत. कमीतकमी आपल्या वयाएवढे किल्ले तरी बघितले पाहिजेत हा विचार मनात घेऊन सुरवात केलेला प्रवास असे अनेक मैलाचे दगड पार करत माझ्या पन्नाशीत २०० किल्ले ह्या टप्प्यावर पोहचला आहे.

साधारणतः किल्ल्यांचे चार प्रकार पडतात १.गिरीदुर्ग २.जलदुर्ग ३.भुईकोट ४.गढी

दुर्गभ्रमण व पर्यटन सहल ह्या मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्गभ्रमण हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील श्रद्धेचा विषय आहे.आपल्या पूर्वजांनी अपार कष्ट करून घाम गाळून व वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावत हे किल्ले राखले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अनुचित कृत्य करणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

सह्याद्रीवर कोठेही उभे राहून नजर फिरवली तर दर चार-दोन शिखरांआड एखादा गड-किल्ला दिमाखात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यातील बहुतेक दुर्गांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. या भक्कम गड- किल्ल्यांच्या आधारेच शिवरायांनी परकीय आक्रमण पचवून धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केले होते.

महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा पाहून आपल्याला महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख अधिक अधोरेखित होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे राहिलेले गड असोत अथवा समुद्रकिनारी लाटांचा समर्थपणे सामना करत उभे असलेले हे गड-किल्ले असोत. खंदक आणि चिलखती बुरुजांमुळे अभेद्य झालेले भुईकोट व जनतेला संरक्षण व आधार देणाऱ्या मराठा सरदारांच्या गढ्या.

या सर्व किल्ल्यांना संरक्षण व संवर्धन याची प्रकर्षाने गरज आहे. आपल्या पिढीने हे कार्य आपल्या कुवतीप्रमाणे प्रामाणिकपणे केलं तरच भावी पिढीला हा जाज्वल्य इतिहास सांगता येईल व ते सुद्धा यातून प्रेरणा घेत राहतील.
सध्या खूप संस्था किल्ले संवर्धन करत आहेत. आपल्याला पण आपला वेळ, श्रम, पैसा याद्वारे मदत करता येईल व अतिशय प्राथमिक  स्वरूपात खालीलप्रमाणे गोष्टी करता येतील.

संवर्धनासाठी काय करता येईल?

  •  गड किल्ले स्वच्छता मोहीम
  • शाळा कॉलेज च्या मुलामुलींचे,आणि तरुण तरुणींचे इतिहासकार / दुर्गाभ्यासक ह्याच्या बरोबर मोहिमा अथवा अभ्यास दौरे ज्या मुळे भावी पिढीला गड किल्ल्यांची आवड निर्माण होईल.
  •  आपल्या जवळील भागात असलेल्या गड किल्ल्यांवर वृक्षारोपण चळवळ.
  • गड किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता व संरक्षण
  • गड किल्ल्यांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातून मार्गदर्शक फलक
  • गडकिल्ल्यांवरील ऐतिहासिक वास्तू चे जतन व नामनिर्देशन फलक
  • गड किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करण्यासाठी सागवानी लाकडापासून महाद्वारासाठी बनवलेले दरवाजे आणि बेवारस पणे पडलेल्या तोफांना बनवलेले तोफगाडे ह्याचा प्रत्यारोपण सोहळा.

मी वय वर्षे ४५ ला नियमितपणे मोहिमा करायला सुरुवात केली तेव्हा खूप मित्रांनी ‘नको त्या वयात नको ते छंद करू नको’ असे सल्ले दिले. मात्र दुर्गभ्रमंती हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असलेल्या श्रद्धेचा विषय असल्याने मला त्या मस्करीतून प्रेरणा मिळत गेली. सह्याद्रीत फिरताना माझ्यासारखे असंख्य भटके व सह्याद्रीचे शिलेदार भेटले आणि आयुष्य भरचे जिवाभावाचे मैतर झाले.

सुरवातीला ४५ किल्ले तर बघता बघता पूर्ण झाले.पण तोपर्यंत दुर्गभ्रमंती व गिरिभ्रमण याच वेड अंगी चांगलंच भिनलेलं होतं. त्यानंतर माझा स्वतःला विचारायचा आवडता प्रश्न “What Next” मला शांत बसून देत नव्हता. तळोजा MIDC मलंगगडाच्या सानिध्यामधील नोकरी व कौटुंबिक आघाडी सांभाळत माझं पुढचं ध्येय “दुर्गभ्रमंती चे शतक “हे मी मनोमनी ठरवलं.

मला आसपासचे सर्व किल्ले ओळखू यायला लागले होते. ते माझे जणू सगे सोयरे व सोबतीच झाले होते.  मी किल्ल्यांसमोरून वाहनाने प्रवास करत असीन तर मला खुणवायला व साद घालायला लागले होते. मग मी माझे लक्ष छत्रपती महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्या कडे वळवले. मला फक्त रविवारी सुट्टी असल्याने मी रविवारची चातकासारखी वाट बघायला लागलो. एक आठवडा आड गृहमंत्र्यांची परवानगी घेण्यात यशस्वी होऊ लागलो. मग काय मला परवानगी मिळाली की एक एक किल्ला पादाक्रांत करायला सुरुवात केली. ट्रेकला मी माझ्या मित्र मंडळींना विचारायचो व ते पण मला खूप सपोर्ट करायचे. विशेष करून मला माझा भटक्या मित्र राहुल किणीकर व मावसभाऊ प्रशांत लेले हे माझे ठरलेले सह्य सोबती असतात. पण माझा एक मंत्र आहे की ” आलात तर सहित नाही तर शिवाय ओम नमः शिवाय”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून काही किल्ल्यांची साखळी बनवलेली असायची व त्याचा उपयोग होळीच्या माळावर होळी पेटवून संदेश वहन साठी होत असे.उदा.जंजिऱ्याच्या सिद्दीचे आक्रमण होत असेल तर राजधानीला सावध करण्यासाठी सामराज गड, घोसाळगड ,तळागड,चांभार गड ते रायगड अशी ती किल्ल्यांची साखळी असे. पनवेल जवळील माणिकगड, इर्शाळ गड, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग असे किल्ले करत  नव्वद किल्ले कधी पार झाले ते कळलंच नाही. आता मी इतर संस्थाबरोबर पण ट्रेक करायला सुरुवात केली होती. रेंज ट्रेक करायची नवीन कल्पना मला मनापासून आवडू लागली होती. कारण कमी वेळात व त्या परिसरातील जास्तीत जास्त किल्ले बघायला मिळायचे. डोंबिवलीच्या ट्रेक क्षितिज या संस्थेबरोबर हरिश्चंद्रगड रेंज मधील कुंजरगड, कलाडगड, भैरवगड नावाचे दोन किल्ले करतांच माझे दुर्गभ्रमंती चे शतक हे स्वप्न डिसेंबर २०१७ मध्ये साकार झालं

आता थोडे गढ्यांविषयी  पेशवाईच्या कालखंडात अनेक शूर आणि मातब्बर सरदार उदयास आले. हे सर्व सरदार घाट माथ्यावरील जहागिरी मध्ये वास्तव्यास होते. या सरदारांनी त्यांच्या कुटुंब कबिलत्याच्या व स्थानिक जनतेच्या संरक्षणार्थ छोटे भुईकोट किल्ले उर्फ गढ्या बांधल्या. मराठेशाहीतील हे शूर सरदार प्रामुख्याने बडोद्याचे गायकवाड , ग्वाल्हेरचे शिंदे, धारचे पवार, इंदोरचे होळकर पुढे राजे झाले. या सर्व सरदारांच्या मूळ गढ्या बघण्याचा योग मला माझ्या भटकंती मुळे आला.

बहादूर सरदार ‘दमाजी राव गायकवाड’ यांची दावडी ह्या गावात मूळ गढी आहे. हेच गायकवाड घराणे बडोद्याचे राजे गायकवाड म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाले. माझ्या सुरतेवर स्वारी या मोहिमेत सुंदर आणि भव्य रॉयल पॅलेस बघायची संधी मिळाली व एक महिन्याच्या कालावधीत गायकवाड घराण्याचे मूळ व वैभव बघण्याचे भाग्य मला लाभले. या राजघराण्यातील राजांना २१ तोफांच्या सलामीचा मान होता.

त्याचप्रमाणे मल्हारराव होळकर हे पराक्रमी आणि ऐतिहासिक पुरुष ह्यांचे जहागिरीचे गाव पुणे जिल्ह्यातील मंचर जवळील वाफगाव इथे अतिशय प्रशस्त अशी गढी आहे. हेच यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान आहे. सध्या या वास्तू मध्ये सरदार यशवंतराव होळकर यांच्या नावाचे विद्यालय आहे.

पारनेर तालुक्यातील जामगाव इथे महादजी शिंदे यांचे थोरले बंधू दत्ताजी शिंदे यांनी ही गढी उर्फ भुईकोट किल्ला बांधला. सध्या या किल्ल्याच्या आतील वाड्यात डी. एड. काॅलेज व शेजारी मोठी विहीर आहे. किल्ल्यात राम मंदिर छान आहे. हेच सरदार घराणे पुढे ग्वाल्हेर चे सिंधिया राजघराणे म्हणून प्रसिद्ध झाले.

आता आपण पवार घराण्याकडे वळूयात
श्रीमंत महाराज संभाजी पवार यांना दोन मुले उदाजीराव आणि आनंदराव पवार हे दोन रत्ने होती. श्रीमंत उदाजीराव पवार यांनी मलठण या ठाणी भव्यदिव्य राजवाड्यात, बारा कमानींची विहीर बांधली आणि कवठे यमाई येथील गढी आनंदराव पवार यांनी बांधण्यासाठी सुरूवात केली आणि तिच गढी सवाई राजा यशवंतराव पवार यांनी पुर्ण केली .
मलठण राजवाडा १६५० साली पवार घराण्याने बांधला होता त्यातील तळकोठीत एक तळघर होते. छञपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यावर मोगल सेनेपासून बचाव व्हावा म्हणून काही दिवस या तळघरात काही दिवस मुक्कामी होते. या राजवाड्यास छञपतींच्या सहवासात राहिलेले श्रीमंत राजे पवार घराणे मलठणकर होय. १७०९ धारची गादी श्रीमंत उदाजी पवार यांनी मांडवगड ,धार काबीज करून घेतले आणि मराठा साम्राज्याची पहिली मुहूर्तमेढ राज्याबाहेर रोवली गेली.  धारचे पवार राजे म्हणून प्रसिद्ध झाले. मलठण हे संस्थान धार गादीचे मूळ संस्थान आहे

मी केलेल्या काही महत्वाच्या मोहिमांमध्ये राजगड तोरणा,मुंबई ते गोवा कोकण किनारपट्टी वरील सर्व सागरी किल्ले,जुन्नर माळशेज रेंज,कोल्हापूर,बेळगाव ही दक्षिण दिग्विजय मोहीम,मुंबईतील सर्व किल्ले,सप्तश्रृंगी रेंज नाशिक,व मराठवाडा भागातील सर्व किल्ले यांचा समावेश आहे.

पुढे किल्ले बघायचे वेड एवढे वाढले की मी एखाद्या भागात काही कार्यक्रम असेल उदा.मित्राचे लग्न असेल तर आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग …. या न्यायाने जवळपासच्या किल्ल्यांचे दर्शन घेऊन मगच लग्नाला जातो. कौटुंबिक सहल असली की आता घरच्यांनी पण या गोष्टीची सवय करून घेतली आहे. उदा.जेव्हा गोवा दर्शन करायचे ठरले तेव्हा पहिल्यांदा गोव्याला तीन दिवस कुटुंबाबरोबर मजेत घालवल्यावर गोव्यापासून थेट  रत्नागिरीपर्यंत सगळे किल्ले पाहिले. त्यात प्रामुख्याने आग्वाद फोर्ट, तेरेखोलचा किल्ला, यशवंतगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, आंबोळ गड, पुर्णगड, रत्नदुर्ग, जयगड, गोपाळगड असे अनेक सागरी किल्ले पाहिले.

गुजरात मधील “statue of unity” हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बघण्यासाठी गेलो असताना सुरतेची मोहीम म्हणजे गुजरात मधील नानी दमण, मोटी दमण,सुरतचा किल्ला, डाभोईचा किल्ला व अहमदाबादचा भद्रा फोर्ट ह्या किल्ल्याची मोहीम यशस्वी केली. याच युक्ती प्रमाणे मराठवाड्यात ही आंबेजोगाई तुळजापूर पंढरपूर ह्या धार्मिक सहलीत देवदर्शनाच्या नावा खाली त्या भागातील पळशी चा किल्ला , कंधार , परांडा,धर्मपुरी, धारूर, औसा, उदगीर, अडस गावची गढी व “नळदुर्ग”असे सर्व दुर्गदर्शन मनोभावे केले. या मोहिमेतील “नळदुर्ग “हा अतिशय मोठा व सुंदर असा भुईकोट किल्ला आहे. याच किल्ल्याच्या दर्शनाने मला दुर्गांचे द्विशतक हे स्वप्न डिसेंबर २०१९ मध्ये साकार करण्याचा आनंद दिला.

 

नवनवीन किल्ले बघण्याच्या वेडामुळे मला त्या किल्ल्याच्या इतिहास संकलन करून वाचायची आवड निर्माण झाली.किल्ला बघायला जाण्याआधी त्या किल्ल्याची सर्व माहिती गोळा करायची. उदा.त्या किल्ल्याचे पायथ्याचे गाव कोणते? सोलो ट्रेक करायचा असेल तर त्या ट्रेकमधील धोक्याची ठिकाणं कोणती?  त्यासाठी कोणती काळजी घ्यायची? टेक्निकल क्लाइम्ब ची गरज आहे का ? गावातील स्थनिक वाटाड्याची गरज आहे का? रेंज ट्रेक करायचे असेल तर वास्तव्यास सुरक्षित जागा आहे का? या सारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. सामान्यतः चढाईच्या दृष्टीने अवघड असणारे किल्ले लिंगाणा,प्रचितगड,AMK (अलंग,मदन,कुलंग) करायचे असतील तर अतिशय चांगले टेक्निकल टीम असलेल्या ग्रुपसोबतच करावे.

हल्ली ट्रेकिंग ही युवा पिढी मध्ये fashion झाली आहे. खूपशा मुलांना इतिहासाची माहिती नसते. त्यामुळे त्यांच्याकडून अक्षम्य अशा चुका होतात. गड-किल्ल्यांचे पावित्र्यही जपलं जात नाहीत. माझं निरीक्षण असं आहे. मोठया आवाजात गाणी लावणे, उग्र वासाचे सेंट अथवा डिओ वापरून ट्रेकला जाणे त्या मुळे मधमाश्या विचलित होऊन हल्ला करायची शक्यता असते. तर काही वेळेस मधमाश्याच्या पोळ्यावर दगड मारणारे महाभाग पण असतात.अश्लील चाळे करणे,दारू,सिगरेट पिणे, तोफांवर बसून फोटो काढणे, अवघड जागी सेल्फी काढणे असे अनेक प्रकार ही मंडळी करतात.

अशा मंडळींसोबत कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे अनेक ट्रेकिंगच्या संस्था सुरू झालेल्या आहेत. या संस्थांकडे काही ही अनुभव नसतो व वारेमाप शुल्क आकारून या संस्था अवघड जागी ट्रेकला घेऊन जातात व नूतन गिर्यारोहकांचे जीव धोक्यात घालतात. असो!

पण काही संस्था खरंच अनुभवी ट्रेकर्स, इतिहास संशोधक यांच्या बरोबर नवनवीन ठिकाणी ट्रेकला घेऊन जातात. छानसं जीवन समृद्ध करणारा अनुभव देऊन जातात यामध्ये आमच्या डोंबिवलीची ‘ट्रेक क्षितिज’ संस्था व ‘बा रायगड’ यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
मी व माझ्या सहकाऱ्यांनी एक छोटीशी “दुर्गभ्रमंती”ही संस्था स्थापन केली आहे. या ग्रुपची कन्सेप्ट च मुळी ‘नो एक्सपर्टी चार्जेस’ अशी आहे. त्यामुळे आम्ही ‘नो लॉस नो प्रॉफिट’ या तत्त्वाने मोहिमा आयोजित करतो. याच ग्रुपने बुलेट राईड हा पण उपक्रम चालू केला आहे. त्याची सुरवात आम्ही कोकण किनाऱ्यावरील किल्ले कोस्टल राईड ह्या माध्यमातून केली. सर्व मित्रांनी एक सुंदर स्वप्न पाहिले ते म्हणजे लेह लडाख बुलेट राईड चे  आपली स्वतःची रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन खारडुंगला पास पार करायचा तो १७९८२ फुटावर असून जगातील सर्वात उंच वाहतुकीचा रस्ता आहे.हे जीवनसमृद्ध करणारी अनुभव संपन्न मोहीम यशस्वी करून साकार केले

असे नवनवीन उपक्रम अमलात आणताना मला सामाजिक बांधीलकी जपण्याची संधी मिळाली  ज्ञानप्रबोधिनी सारख्या मातब्बर संस्थेच्या ४० ते ५० विद्यार्थी व विद्यार्थिनींबरोबर किल्ले कोरीगडला मार्गदर्शक म्हणून जाण्याचा योग आला. मला जो अनुभव मिळाला आहे तो सर्व वयोगटातील भटक्यांना उपयोगी पडावा यासाठी मी माझ्या दुर्ग, ढाकोबा आणि दऱ्या घाट या रेंज ट्रेकचा ब्लॉग लिहिला आहे.

मला हे माझे दुर्गभ्रमंतीचे द्विशतक हे स्वप्न साकार करण्यासाठी माझी बायको प्रियांका, माझी मुले प्रथमेश व अथर्व तसेच माझ्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. माझा मुलगा अथर्व पण आता मला दुर्गमोहिमाना साथ संगत करतो. म्हणजे नवीन पिढीने वारसा घेतल्याचा खूप मोठा आनंद आहे.