सुनीता कुलकर्णी

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने पडणारी भर मनोरंजनाच्या दुनियेतील नवनव्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवून आपल्याला ताजंतवानं ठेवत असते. त्यासाठी डिसेंबर महिन्यात ओटीटीवर काय काय पहायला मिळणार आहे ते आपल्याला माहित असायला हवं.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
Weather Forecast
भारतात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

नेटफ्लिक्सवर या महिन्यात ४ डिसेंबरला भाग बनी भाग हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्यात स्वरा भास्कर स्टॅण्ड अप कॉमेडियनच्या प्रमुख भूमिकेत आहे. त्याशिवाय वरूण ठाकूर, डॉली सिंग, गिरीश कुलकर्णी यांनीही त्यात भूमिका साकारल्या आहेत.

डेव्हिड फिंचर यांनी दिग्दर्शित केलेला मंक, गीतांजली राव यांनी बॉम्बे रोज ही अॅनिमेटेड फिल्मही याच दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच निवर्तलेल्या चॅडविक बोसमनचा मा रेनीज ब्लॅक बॉटम हा सिनेमा ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय गिरीश मलिक यांनी दिग्दर्शित केलेल्या टोर्बाज या सिनेमात संजय दत्तसह राहुल देव, नर्गिस फक्री यांच्या भूमिका आहेत. १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या पवा कडैगल या सिनेमात या तमीळ सिनेमात कल्की कोचलीन, प्रकाश राज, सई पल्लवी यांच्या भूमिका आहेत.

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्या प्रमुख भूमिका असलेला एके व्हर्सेस व्हीके हा सिनेमा प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

अॅमेझॉन प्राइमवर या महिन्यात भागमती या तेलुगु हॉरर सिनेमाचा दुर्गामती हा हिंदी रिमेक प्रदर्शित केला जाणार असून त्यात भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका आहे. अशोक यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अर्शद वारसी, माही गिल, करण कापडिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राइमवर या महिन्यात सन्स ऑफ सॉइल ही डॉक्यु मालिका कबड्डी प्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे. यात अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्स या प्रो कबड्डी टीमचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
१९९५ मधल्या कूली नंबर वन या डेव्हिड धवनच्या सिनेमाचा सिनेमाचा त्यानेच केलेल्या रिमेकमध्ये वरूण धवन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डेव्हिड धवनचा हा ४५ वा सिनेमा आहे. एखाद्याने आपल्याच मूळ सिनेमाचा आपणच रिमेक करायचा हा प्रकार कूली नंबर वन च्या निमित्ताने बहुधा पहिल्यांदाच होताना दिसतो आहे.

याशिवाय प्राइमवर माधवनची प्रमुख भूमिका असलेला मारा हा तमीळ सिनेमा प्रदर्शित होतो आहे. तो चार्ली या गाजलेल्या मल्याळम सिनेमाचा रिमेक असून मूळ सिनेमात डुलकर सलमान आणि पार्वती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
झी फाईव्हवर या महिन्यात बिपीन नाडकर्णी यांचा दरबान हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यात शरद केळकर, रसिका दुग्गल, शरीब हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या खोकाबाहूर प्रत्यबर्तन या कथेवर हा सिनेमा आधारित आहे.

कुणाल कोहली यांनी दिग्दर्शित केलेला लाहोर कॉन्फिडेन्शल या ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात रिचा चढ्ढाची मुख्य भूमिका आहे.  अल्ट बालाजीवर पौराषपूर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्यात अन्नू कपूर, मिलिंद सोमण, शिल्पा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

समाप्त