News Flash

UP पोलिसांनी दिली ‘शोले’तल्या गब्बरसिंगला शिक्षा 

सिनेमातल्या खलनायकाला, गब्बरसिंगला त्याच्या काही गुन्ह्यांसाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी आत्ता शिक्षा दिली

– सुनीता कुलकर्णी

भारतीय सिनेमाच्या विश्वात इतिहास घडवणारा रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ सिनेमा प्रदर्शित झाला १९७५ मध्ये. आजही त्या सिनेमाचं सिनेरसिकांच्या मनावर गारुड आहे. पण या सिनेमातल्या खलनायकाला, गब्बरसिंगला त्याच्या काही गुन्ह्यांसाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी आत्ता शिक्षा दिली आणि समाजमाध्यमांवर तो चर्चेचा विषय ठरला आहे. हे कसं शक्य आहे हे प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

पण हे शक्य आहे… सध्याच्या काळात सोशल मीडियावर सगळं काही शक्य आहे. आणि मुख्य म्हणजे युपी पोलिसांनी ते शक्य करून दाखवलं आहे.

उठणं, बसणं, हसणं, रडणं, भांडणं, सगळं सोशल मीडियावरच करायच्या सध्याच्या जमान्यात स्मार्टफोनबरोबर फक्त जन्ताच स्मार्ट झाली आहे, असं नाही तर पोलीसही स्मार्ट झाले आहेत. ठिकठिकाणच्या पोलिसांचा सोशल मीडिया बघणारा विभाग अतिशय कल्पकतेने लोकांना आवडतील, त्यांचे लक्ष वेधलं जाईल अशा गोष्टींचा वापर करून आपल्याला द्यायचा तो संदेश द्यायचा, आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.

तर उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिशय कल्पकपणे ‘शोले’मधल्या तीन दृश्यांचा वापर करत लोकांना एक संदेश दिला आहे. आणि या संदेशापेक्षाही त्यांच्या कल्पकतेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.  त्यांनी ‘शोले’मधली तीन दृश्य ट्वीटरवर प्रदर्शित केली आहेत. एका दृश्यात गब्बर सिंग काहीतरी बोलत थुंकतो. आणि त्याला जोडून असलेल्या दुसऱ्या दृश्यात गब्बर सिंग सुसाट धावत सुटला आहे आणि ठाकूर घोड्यावरून त्याचा पाठलाग करतो आहे. तिसऱ्या दृश्यात ठाकूरने गब्बरला पकडलं आहे आणि तो त्याची गर्दन जणू पिरगळतो आहे. त्यानंतर पडद्यावर शब्द येतात, सार्वजनिक स्थानों पर थुकना मना है…

लोकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये हे सांगण्यासाठी सिनेमाचा, त्यातही ‘शोले’सारख्या लोकप्रिय सिनेमाचा आणि गब्बरसिंग सारख्या लोकप्रिय व्यक्तिरेखेचा इतका कल्पक वापर आजवर कुणी केला नसेल. उत्तर प्रदेशच्या पोलिसांची ही ट्वीटर कल्पकता नेटिझन्सना जाम आवडली आणि त्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. या कल्पकतेवर खुद्द गब्बरने कशी प्रतिक्रिया दिली असती, ठाकूर काय म्हणाला असता आणि मुख्य म्हणजे जय वीरू कसे व्यक्त झाले असते असं सांगत नेटिझन्सनी आपलीही विनोदबुद्धीला तेवढ्यात परजून घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:06 pm

Web Title: why was gabbar punished up police gives covid 19 twist to sholay scene nck 90
Next Stories
1 भारताचा विजय आणि epicaricacy…. पण म्हणजे काय ?
2 नोबिताच्या लग्नाची धामधूम!
3 ‘द टर्मिनल’ खरंच घडतो तेव्हा…
Just Now!
X