जय पाटील
जगातील सर्वांत जुनी गुंफाचित्रे इंडोनेशियात सापडल्याचा दावा पुरातत्त्व संशोधकांनी केला आहे. हे एका मोठ्या डुकराचे चित्र असून ते ४५ हजार ५०० वर्षे जुने असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

इंडोनेशियातील साउथ सुलावेसी प्रांतात हे चित्र आढळले. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या मासिकात या संदर्भातील संशोधन प्र्रसिद्ध झाले आहे. आधुनिक मानवाने साकारलेल्या अगदी सुरुवातीच्या काही कलाकृतींपैकी ही एक असल्याचे पुरावे त्यात देण्यात आले असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. ‘सुलावेसी प्रांतात आढळलेले हे चित्र चुनखडकात साकारण्यात आले आहे. मानवाने साकारलेले आणि आपल्याला ज्ञात असलेले हे सर्वांत जुने चित्र आहे,’ अशी माहिती ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठाचे प्रा. अ‍ॅडम ब्रम यांनी दिली.

ही गुंफा एका दरीत असून या दरीभोवती चुनखडकाचे निसरडे कडे आहेत. तिथे पोहोचण्यासाठी एकच चिंचोळा मार्ग असून त्या मार्गाने केवळ उन्हाळ्यातच जाता येते. पूर्ण पावसाळाभर ही दरी जलमय असते. पाश्चात्य देशातील कोणतीही व्यक्ती त्या भागात आजवर आलेली नव्हती, असे त्या दुर्गम भागात राहणाºया बगी जमातीच्या व्यक्तींचे म्हणणे आहे. वराहाचे हे चित्र हे रॉक पॅनलचा एक भाग असावा, असा संशोधकांचा कयास आहे. यापूर्वी ४३ हजार ९०० वर्षांपूर्वीचे गुंफाचित्र हे मानवाने चितारलेले सर्वांत जुने चित्र असल्याची नोंद होती. त्या चित्रात प्राण्यांसारखी दिसणारी माणसे सुलावेसी डुक्कर आणि ड्वार्फ (जादुई शक्ती असलेली लहान आकाराची माणसे.)