आज जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) जशी सोने, दागिने, मालमत्ता ही जशी संपत्ती असते, त्याचप्रमाणे स्वतःची बुद्धिमत्ता हीदेखील संपत्ती म्हणून ओळखली जाते. जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त वाङ्मयचौर्याच्या इतिहासाविषयी काही गोष्टी जाणून घेऊया.
वाङ्मयचौर्य म्हणजेच प्लॅजेरिझम. प्लॅजेरिझम हा शब्द प्रथमतः पहिल्या शतकामध्ये आलेला आढळतो. मूळ लॅटिन असणारा plagiarius हा शब्द आहे. याचा अर्थ अपहरणकर्ता असा होतो. एखाद्याच्या सृजनात्मक कामाचे अपहरण करणे म्हणजे ‘प्लॅजेरिझम’ होय. ‘प्लेजिअम’ म्हणजे चोरी करणे. इंडो-युरोपियन भाषांमध्ये ‘प्लेज’चा अर्थ जाळे किंवा सापळा असा होतो. एखाद्याला नकळतपणे जाळ्यात पकडले जाते. या अर्थाने ‘प्लेजिअरिअस’ हे परिष्कृत रूप बनले गेले आणि तसे करण्याची वहिवाट म्हणून ‘प्लेजिअरिझम’ ही संज्ञा आली असावी. ग्रीक, लॅटीननंतर नंतर १६०१ साली बेन जॉन्सन या नाटककार-समीक्षकाने साहित्यचोराला उद्देशून ‘प्लेजिअरी’ हा शब्द उपयोगात आणला. इंग्रजीमध्ये ‘प्लेजिअरिझम’ ही संज्ञा १६२० च्या दरम्यान स्वीकारण्यात आली. सॅम्यूएल जॉन्सनने त्याच्या १७५५ साली प्रकाशित झालेल्या शब्दकोशात ‘प्लेजिअरी’च्या “A thief in literature, one who steals the thoughts or writings of another”, “The crime of literary theft” अशा व्याख्या दिल्या आहेत. ऑक्सफर्ड शब्दकोशात लॅटीन ‘प्लेजिअरिअस’ हा शब्द सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात आल्याचे म्हटले आहे.

वाङ्मयचौर्य, प्रक्षिप्त वाङ्मय आणि श्रेयचौर्य

वाङ्मयचौर्य म्हणजे एखाद्याचे साहित्य, त्याची सृजनकृती त्याची परवानगी न घेता, त्याच्या न कळत आपल्या स्वतःच्या नावावर करणे वा त्याचे श्रेय स्वतःला देणे म्हणजे वाङ्मयचौर्य होय. आज ऑनलाईनच्या काळात या घटना सर्रास घडताना दिसतात. अनेक लोक इतरांच्या कविता स्वतःच्या नावावर खपवताना दिसतात. याला शेक्सपियरदेखील अपवाद नाही. शेक्सपियरच्या नाटकातील अनेक उतारे हे भूतपूर्व साहित्यिकांच्या नाटकात दिसतात. तसेचतसेच त्याच्याही कल्पना अनेकांनी उचलेल्या दिसतात. शेक्सपियरच्या ‘द टेंपेस्ट’ नाटकातही फ्रेंच लेखक मॉन्तेन याचे अनेक उतारे जसेच्या तसे आढळतात, असे अभ्यासकांचे मत आहे. अशाप्रकारे एखाद्याची कृती, शैली, साहित्य मूळ साहित्यिकाला श्रेय न देता स्वतःच्या नावावर लिहिणे याला वाङ्मयचौर्य असे म्हणतात.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
girlfriend boyfriend conversation makeup joke
हास्यतरंग : फसवणूक…
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

प्रक्षिप्त वाङ्मय म्हणजे लेखक स्वतः लेखन करून ते दुसऱ्याच्या नावावर खपवतो. उदा. स्वतःचे विचार क्रांतिकारक किंवा अन्य विचारवंतांची वचने म्हणून देणे हे प्रक्षिप्त वाङ्मय आहे. यातून चुकीचे साहित्य निर्माण होते. पाठभेद निर्माण होण्याची शक्यता असते. श्रेयचौर्य हीसुद्धा आजच्या काळातील महत्त्वाची समस्या आहे. केवळ लिखित साहित्य नव्हे, तर चित्र, छायाचित्र, शैली यांचेही चौर्य केले जाते. विविध सृजन कल्पनांचे श्रेय हे स्वतःच्या नावावर घेतले जाते, याला श्रेयचौर्य असे म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीने निर्माण केलेल्या कलाकृती, साहित्य, कल्पना याचे श्रेय स्वतःच्या नावावर घेणे, याला श्रेयचौर्य असे म्हणतात.

हे वाचा >> आद्य शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान आणि आजचे जीवन!

ऐतिहासिक वाङ्मयचौर्याच्या घटना

१६२० साली प्रथम रोमन साहित्यिक मार्शल याच्या काव्याची फिडेन्टीअस या साहित्यिकाने चोरी केलेली. तेव्हा ‘प्लॅजेरिझम’ हा शब्दप्रयोग प्रथम करण्यात आला. पूर्वीच्या काळात विशेष असा वाङ्मयचौर्य असा प्रकार अस्तित्वात नव्हता किंवा साहित्याची चोरी केली असा कोणी दावा करत नव्हते. १७ व्या शतकापर्यंत भारतापेक्षा पश्र्चिमात्य देशांमध्ये वाङ्मयचौर्याच्या घटना अधिक असल्याच्या दिसतात. भारतामध्ये पूर्वसुरींच्या म्हणजेच पूर्वी होऊन गेलेल्या लेखकांचा उल्लेख करून आधीच ऋण व्यक्त करत, यामुळे वाङ्मयचौर्याचा ठपका त्यांना लागत नाही. पाश्चिमात्य साहित्यात मात्र हे आढळत नाही. लिव्हज ऑफ द इमिनेंट फिलॉसॉफर्स या ग्रीक ग्रंथामध्ये तत्कालीन काही लेखकांवर साहित्याची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कायदेशीर बाबी

प्राचीन काळापासून साहित्यिक वाङ्मयचौर्य करत असले तरी अठराव्या शतकापर्यंत त्याची दाद घेतली जात नव्हती. जगातील पहिला “प्रताधिकार कायदा” इंग्लंडमध्ये दि. १० एप्रिल, १७१० रोजी पारीत झाला आणि ‘बौद्धिक संपदा हक्क’ ही गोष्ट प्रस्थापित झाली. या कायद्याचे नाव ‘द स्टॅट्यूट ऑफ ॲन’ (The Statute of Anne) असे होते. हा कायदा एका अर्थाने बेकायदेशीर प्रकाशक आणि प्रकाशक मंडळींबाबत होता. ‘लेखकाची परवानगी न घेता लेखकाच्या नावासह त्याच्या पुस्तकांची छपाई करून ती विकण्याला प्रतिबंध करणे’ हाच मुद्दा या कायद्यामागे होता. त्यामुळे पूर्वी वाङ्‌मयचोरी हा गुन्हाच नव्हता. अलेक्झांडर लिंडे या संशोधकाने संकल्पना या कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या होऊ शकत नाही, असे मत मांडले होते. बौद्धिक संपदा हक्क व संरक्षण या संदर्भात अमेरिकन कायदे अत्यंत काटेकोर असून त्यांची अंमलबजावणी अतिशय कडक रीतीने केली जाते.

२६ एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन

‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ दरवर्षी दि. २६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) द्वारे २००० मध्ये पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि रचना यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि नक्कल करण्यापेक्षा सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. १९७० मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करणार्‍या अधिवेशनाची अंमलबजावणी झाल्याची तारीख २६ एप्रिल होती. त्यामुळे २६ एप्रिल ही जागतिक बौद्धिक संपदा दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली. त्यामुळे स्वनिर्मिती, सृजनतेला प्रोत्साहन देणारा आणि वाङ्मयचौर्याला प्रतिबंधित करणारा हा जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो.

Story img Loader