Blog : ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणेच ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेताना सध्या बघायला मिळत आहे. मुळात कसलाही गाजावाजा न करता अगदी गुपचूप प्रदर्शित केलेल्या या एका ट्रेलरमुळे पुन्हा सोशल मीडियावर आपल्याला दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच कशाला तर बाहेरही तीच परिस्थिती आहे. काही धार्मिक संघटना या चित्रपटासाठी खास शो आयोजित करीत असून फुकट जनतेला हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे तर काही ठिकाणी अगदी सामान्य लोकसुद्धा या चित्रपटाकडे धर्माच्या चष्म्यातूनच बघत आहेत. पण या चित्रपटाचा मूळ मुद्दा हा खूप मोठा आहे ज्याबद्दल क्वचितच कोणाला ठाऊक असेल. ‘द काश्मीर फाइल्स’ अन् या चित्रपटात बरेच अंतर आहे आणि हे अजूनही बऱ्याच लोकांच्या ध्यानात येत नाहीये. याविषयीच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

चित्रपट काय सांगू पाहतो?

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

‘द केरळ स्टोरी’च्या टीझर ट्रेलरमधून एका हिंदू मुलीची कथा मांडण्यात आली आहे जिचे जबरदस्ती धर्मपरिवर्तन करून ISIS या आतंकवादी संघटनेत सामील करण्यात आले. त्यानंतर तिला अफगाणिस्तान, इराक, सीरिया येथे नेण्यात आले आणि आता तिच्या घरवापसीबद्दल हा चित्रपट भाष्य करणार असल्याचे दिसत आहे. याबरोबरच चित्रपटातून लव्ह जिहाद, केरळ राज्याबद्दलचे बरेच तर्क-वितर्क, धार्मिक टिप्पणी आणि द्वेष आणि इतर आंतरराष्ट्रीय राजकारण पाहायला मिळत आहे. ही झाली चित्रपटाची गोष्ट, पण सत्य परिस्थिती यापेक्षा थोडी वेगळी आहे.

आणखी वाचा : बहुचर्चित ‘टिपू’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; हजारो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या, लाखों हिंदूंना बाटवणाऱ्या विक्षिप्त राजाची भयावह कहाणी

नेमके सत्य काय?

खरे तर हा चित्रपट ‘आयसीस ब्राइड्स’वर बेतलेला आहे. २०१४ ते २०१७ या कालखंडात केवळ भारतातूनच नव्हे तर काही युरोपियन देश आणि साऱ्या जगभरातून बऱ्याच महिलांनी ‘आयसीस’मध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी स्वतःच्या मर्जीने घेतला होता. याचे कित्येक पुरावे लिखित आणि व्हिडीओ स्वरूपात जगभरातील कित्येक सुरक्षा संस्थांकडे उपलब्ध आहेत. या महिलांचे धर्मपरिवर्तन करून त्यांना नंतर अफगाणिस्तान, सीरिया, इराक, इराण अशा ठिकाणी नेण्यात आले. या स्त्रियांना नंतर तिथेच मुलेदेखील झाली. २०१९ मध्ये जेव्हा बगदादीसह इतर प्रमुख अतिरेक्यांना जेव्हा मारण्यात यश आले तेव्हा या अतिरेक्यांच्या पत्नी ‘आयसीस ब्राइड्स’ म्हणून ज्यांना ओळखले जाते त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरण पत्करली अन् तेव्हाच्या तिथल्या सरकारने त्यांना तुरुंगात टाकले.

यानंतर जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला त्या वेळी त्यांनी तुरुंगातील सगळ्या कैद्यांना सोडून दिल्याचे आपल्या लक्षात असेलच. त्यामध्ये या महिलादेखील होत्या अन् त्यानंतर त्यांनी आपापल्या देशात परतायचा प्रयत्न सुरू केला. आजही भारतात अशा बऱ्याच केसेस सुरू आहेत, ज्याची माहिती वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून मिळत असते. भारतीय आणि खासकरून केरळमधील काही महिलांनी पुन्हा भारतात यायचा प्रयत्न केला. त्या वेळी आपल्या सुरक्षा संस्थांनी त्यांची कसून चौकशी केली आणि त्या चौकशीदरम्यान असे लक्षात आले की या महिला या कट्टर विचारांनी ग्रासलेल्या आहेत, त्यामुळे यांना पुन्हा आपल्या देशात घेणे हे सुरक्षेसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे या अशा बऱ्याच केसेस अजूनही कोर्टात सुरू आहेत. अद्याप आपल्या सरकारचा निर्णय तोच आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतरही बऱ्याच देशांमधील सुरक्षा संस्थांनी या महिलांना पुन्हा आपल्या देशात परत घेण्यास नकार दिला आहे.

या एकूणच प्रकरणावर एक स्वीडिश वेब सीरिज ‘कॅलिफेट’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, जी या विषयावर अत्यंत विस्तृतपणे भाष्य करते, पण ‘द केरळ स्टोरी’मधून याच कट्टरपंथी, आयसीसशी जोडलेल्या महिलांप्रति सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न होत आहे, असे किमान याच्या टीझर ट्रेलरवरून तरी स्पष्ट झाले आहे. अर्थात हे सगळे तर्क आहेत, चित्रपट नेमका कसा असेल, त्यात काय दाखवणार आहेत हे पाहिल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही.

त्या कालावधीत केरळमधून बऱ्याच महिलांनी धर्मांतर करून आयसीसमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला होता, पण तो त्यांनी स्वतःच्या मर्जीने घेतला होता की बळजबरी याबाबतीत चित्रपटात कितपत सत्य दाखवण्यात येईल याबाबत मला शंका वाटते. या चित्रपटाच्या कहाणीमागचा हा संपूर्ण इतिहास माहीत करून न घेता आपल्या देशातील बरीच लोक हा चित्रपट आधीपासूनच डोक्यावर घेत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणे यालाही एक धार्मिक रंग दिला जात आहे. किमान या चित्रपटामुळे या विषयावर भाष्य होत आहे ही गोष्ट स्तुत्यच आहे पण कसलाही आगापिछा न जाणून घेता केवळ धर्माची पट्टी डोळ्यांवर बांधून एखाद्या चित्रपटाला डोक्यावर घेणे हे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे.