दिलीप ठाकूर

आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिकांना कदाचित कल्पना नसेल पण फार पूर्वी चित्रपटाची होर्डिंग्स चक्क हाताने तासनतास रंगवली जात. इतकेच नव्हे तर रंगवलेली पोस्टर छापली जाऊन ती रस्तोरस्ती/बस स्टॉप/रेल्वे स्टेशन इतकेच नव्हे तर सिंगल स्क्रीन थिएटरवरही लावली जात. पर्यायच नव्हता हो. त्या काळातील प्रेक्षकांची फक्त इतकीच अपेक्षा असे की, आपल्या आवडत्या कलाकाराचा चेहरा बराचसा चांगला दिसावा. दिलीपकुमार हे राजेंद्रकुमार दिसू नये अशी अपेक्षा असे. कोणत्याही कलाकाराचा चेहरा शंभर टक्के हुबेहूब दिसणार नाही याची त्यांना खात्रीही असे. सिनेमाला शक्य तितके सांभाळून घेणे, त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असणे हे तेव्हाच्या चित्रपटप्रेमींचे वैशिष्ट्य. इतके की, सुरुवातीच्या काळातील वृत्तपत्रातील जाहिरातीच्या काळापाठोपाठ जेव्हा पहिल्यांदा सिनेमाचे भले मोठे पोस्टर रंगवले गेले तेव्हा काय झाले माहितीये? बाबूराव पेंटर दिग्दर्शित ‘सैरंध्री ‘ या चित्रपटाचे धोबीतलावच्या कॉर्नरवर लागलेले भले मोठे पोस्टर पाहायला गर्दी व्हायची. ते एक वेगळेच आकर्षण ठरले.

Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Clean stained sheets without a washing machine
वॉशिंग मशिनशिवाय मळलेल्या चादरी कशा कराव्या साफ, जाणून घ्या सोप्या टिप्स
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

‘रंगवलेली पोस्टर’ ही संस्कृती तेव्हापासून आली आणि मग हळूहळू रुजली. (तेव्हा जगण्याचा वेगही संथ होता) आणि या कलेत अनेकांना आपली कला दाखवायची एक उत्तम संधी मिळाली. त्यात काही महाराष्ट्रीय नावे आघाडीवर होती. जी. कांबळे, नाना लोंढे, एन. आर. भोसले (सुदेश भोसलेचे हे वडिल), जय आर्ट, गुरुजी बंधु, जी. कांबळे वगैरे. ते हाती आलेल्या फोटोना व्यवस्थित न्याहाळत आणि मग त्यांची कल्पनाशक्ती वापरत. एकनिष्ठपणे काम करीत. यात पुन्हा काही वैशिष्ट्ये असत. व्ही. शांताराम, मेहबूब खान, के. असिफ, कमाल अमरोही, राज कपूर अशा दिग्दर्शकांचे आपल्या चित्रपटाच्या पोस्टरवर विशेष लक्ष असे. या पोस्टरच्या माध्यमातून आपला चित्रपट रसिकांपर्यंत व्यवस्थित पोहचतोय ना, ही पोस्टर वा होर्डिंग्स नेमकी कुठे लागणार आहेत, असे करता करता ते आपल्या चित्रपटाच्या मेन थिएटरवरील पोस्टर डिझाईनही कसे असावे यावर विशेष लक्ष देत. व्ही. शांताराम तर आपल्या चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे स्वतः थिएटरमध्ये पब्लिकसोबत चित्रपट पाहून आजमावत. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असेच कौतुकाने म्हणायला हवे आणि ही पोस्टर जेथे रंगवली जात ते पाहायलाही सामान्य माणसाची गर्दी होई. त्याला ही प्रक्रियाही पाहायला आवडे.

काळ बराच पुढे जात राहिला. फोटोग्राफी प्रगत झाली. शूटिंगच्या वेळेस काढलेल्या फोटोंचा उपयोग करीत पोस्टर तयार होऊ लागली आणि हळूहळू हाताने रंगवलेली पोस्टर हा कला प्रकार मागे पडत गेला. हा बदल काहींसाठी भावनिक होता तर पुढील पिढीतील फिल्मवाल्याना हे म्हणजे कामाला गती मिळाली असे होते. असा बदल झाला तरी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सवरील भव्य पोस्टर डेकोरेशन पाहायचा रसिकांचा रस कायम होता. रसिकांच्या एका पिढीने मराठा मंदिर थिएटरवरील ‘मुगल ए आझम ‘चे भव्य डेकोरेशन पुन्हा पुन्हा पाहिले तर एका पिढीची मिनर्व्हा थिएटरवरील ‘शोले ‘चे असेच भारी डेकोरेशन पाहायला गर्दी व्हायची. विशेष म्हणजे हे फॅड या चित्रपटांच्या नशिबी अनेक आठवडे आले. मी गिरगावात राहिल्याने मेट्रो, ऑपेरा हाऊस, मॅजेस्टीक, इंपिरियल या थिएटरवरचे डेकोरेशन पाहणे म्हणजे एक प्रकारचे फिल्मी पर्यटन होते म्हणा. त्या पोस्टरवरुन त्या चित्रपटातील गोष्टीचा अंदाज घेण्यातही चित्रपट प्रेमीना आवडे आणि त्यात कल्पकताही असे. विशेषतः मॅजेस्टीक थिएटरवरचे ‘बलराम श्रीकृष्ण’ या पौराणिक चित्रपटाचे डेकोरेशन पाहताना त्यावरच्या श्रीकृष्णाला नमस्कार करणारे फिल्मी भक्त होते. तर सत्तरच्या दशकात राजेश खन्ना अनेकदा तरी आपल्या चित्रपटाच्या पोस्टरवरचे आपले महत्व स्वतः तपासून घ्यायचे असेही काही किस्से गाजले. यावरून ‘पोस्टर संस्कृती ‘चे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते.

नव्वदच्या दशकात कॅम्युटर युगात आणखीन एक पोस्टर कल्चर आले. ते म्हणजे, आतापर्यंत चित्रपटातील दृश्यांना पोस्टरवर स्थान दिले जाई, आता खास पोस्टरसाठी स्वतंत्र ग्लॉसी फोटो सेशन केले जाऊ लागले. राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘हम आपके है कौन’ ( १९९४) ला त्याचे श्रेय जाते. आणि आता नामांकित फोटोग्राफर यात आपले स्कील दाखवू लागले. विशेषतः यशराज फिल्म , धर्मा प्रॉडक्शन्स, फिल्म क्राफ्ट अशा मोठ्या बॅनरच्या चित्रपटांसाठी असे ‘पोस्टरसाठी खास फोटो सेशन ‘ करणे खर्चिक तरी प्रतिष्ठेचे झाले. पोस्टरच्या माध्यमातून रसिकांपर्यंत चित्रपट पोहचतो यावरचा विश्वास त्यात असे.

सिनेमाचे तंत्र विकसित झाले तसेच पोस्टर कल्चरही प्रगत झाले. कॅम्युटरवर हव्या तशा करामती होऊ लागल्या. त्यातील एक आवर्जून सांगावेसे वाटते. ‘नफरत’ अथवा अशाच एखाद्या बोल्ड स्टोरीच्या पटकथेत नायिका आपल्या व्यक्तिरेखेची गरज म्हणून ‘उघड्या पाठी ‘चे अथवा असेच एखादे धाडसी दृश्य दिल्याचा फोटो पोस्टरवर यायचा आणि अधूनमधून अशा पोस्टरवर संस्कृतीरक्षक आंदोलन करतात, भले मोठे पोस्टर फाडून टाकतात वगैरे बरेच काही आपणास माहित आहेच. पण यात एक ‘व्यावसायिक चलाखी’ असते. चित्रपटाचे प्रत्येक पोस्टर सेन्सॉर संमत करुन घ्यावे लागते. ते करताना सेन्सॉरला छोट्या साईजचे पोस्टर डिझाईन दाखवले जाते. त्यावरची ‘बोल्ड इमेज’ अर्थात छोटी असते. पण जेव्हा तेच पोस्टर भले मोठे ब्लो अप होते तेव्हा त्यावर बोल्ड प्रतिमा केवढी तरी दिसते. मरीन लाईन्सवरचे असेच संजय दत्त व टीना मुनिमचे मोटार सायकलवरचे ओलेत्या रोमॅन्टीक दृश्याचे भले मोठे पोस्टर तेव्हा पोलिसांनीच काढायला लावले.

आज आपण डिजिटल पिढीत आहोत. मोबाईलवर जगभरातील माहिती आणि मनोरंजनाचा साठा उपलब्ध झालाय. आता हातगाडीवर सिनेमाची पोस्टर लावून ती शहरभर फिरवायचे गरजेचे नाही. अथवा मोक्याच्या ठिकाणी भली मोठी होर्डिंग्स लावायची गरज नाही. इतकेच नव्हे तर मल्टीप्लेक्सवर पोस्टर डिझाईन संस्कृती नाही. एकाच वेळेस तेथे सहा चित्रपटांचे पोस्टर असते. त्यावरचे दृश्य अथवा चेहरे आपण पाहिलेले असतात. मग आता चित्रपट प्रसिद्धीत महत्वाचे आहे ते डिजिटल स्कोर. एकाच क्लिकमध्ये लाखो करोडो रसिकांपर्यंत नवीन चित्रपटाचे डिझाइन पोहोचतेय आणि ते क्षणात लाइक्स अथवा डिक्सलाइक्स केले जातेय. या सगळ्यात भरपूर मोकळेपण आहे. पूर्वी ‘चेतना ‘ अथवा ‘बुनियाद ‘ अशा ‘फक्त प्रौढांसाठी’च्या चित्रपटाचे पोस्टर आपल्या पाल्याने कुठेही पाहू नये असे जागरूक पालकांना वाटे. अशा चित्रपटाचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावू नये असे वृत्तपत्रात जाणकार वाचक पत्र लेखन करीत. यावरून ‘सिनेमा पोस्टर’वरची सामाजिक सजगता आणि सावधानता दिसे. पण आता सार्वजनिक स्थळी नवीन मॉडेलच्या गाड्या, उंचच उंच इमारती, एखाद्या चॅनलवरचा रिअॅलिटी शो यांच्या जाहिराती असतात. आणि इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर सिनेमाची पोस्टर डिझाइन असते. सोशल मिडिया हा यंगस्टर्सचा आहे, तेथे त्यांच्या टेस्टचे काय ते द्यायला हवेच. अन्यथा ते क्षणात पुढे जातात. हा जणू काही सेकंदाचा शो अथवा खेळ आहे, तर मग पोस्टर फंडाही तसाच आकर्षक आणि नजर खिळवणारा हवा. आणि कधी त्यात भारी बिनधास्तपणा आलाय (टकाटक, गर्ल्स या मराठी चित्रपटाचे डिजिटल माइंड पोस्टर), तर कधी त्यात सिक्वल पिक्चरची खेळी आलीय (दबंग 3). एका झटक्यात फिल्मचे नाव फॅन्सच्या डोक्यात आणि डोळ्यात फिट बसायला हवेच. सगळे कसे फास्ट लाईफ चाललंय, त्या वेगात आपले डिजिटल मास्टर माइंड पोस्टर शक्य तितके स्थिर राह्यला हवेच. त्याच दिशेने/दृष्टीने सही पावले टाकायला हवीतच आणि काही चित्रपटांची अशी डिजिटल मिडियाचा विचार केलेली पोस्टर आपण पाहतो आणि लाइक्स करतो आहोतच.