नेटफ्लिक्सवरची गुन्हेगारीवर आधारित लोकप्रिय वेब सीरिज म्हणजे ‘मनी हाईस्ट’. या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच या सीरिजच्या ५ व्या सीजनचा टीजर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २ ऑगस्टला या सीरिजचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी प्रेक्षकांनी तर्क लावायला सुरवात केले आहे. या सीरिजचा शेवट कसा होणार? याचा अंदाज लावताना दिसत आहेत.
‘मनी हाईस्ट’च्या ४थ्या सीजनच्या शेवटी अलिसियाला प्रोफेसर कुठे लपून बसला आहे तो सापडतो. यानंतर आता अलिसिया प्रोफेसर सोबत काय करणार? त्यांच्या सोबत सामील होणार? की प्रोफेसरला मारणार? असे बरेच तर्क प्रेक्षक लावताना दिसत आहेत.




अलिसिया आणि प्रोफेसर एकत्र येतील.
काही दिवसांपूर्वी ‘मनी हाईस्ट’ने रिलीज केलेल्या टीजरमध्ये दाखवण्यात आले की, ‘मनी हाईस्ट’चा मास्टर माइंड म्हणजे प्रोफेसर हताश बसला आहे. त्याच्या हातात बेड्या असून अलिसियाने त्याच्यावर बंदूक रोखली आहे. मात्र प्रेक्षकांना असं वाटते आहे की दिग्दर्शकाने उत्सुकता वाढवण्यासाठी मुद्दामून असे केले आहे. ४थ्या सीजनच्या शेवटी अलिसियाची भूमिका साकारणारी नज्वा निम्री ‘बेला चैओ’ जे या सीरिजच थीम सोंग आहे. ते गाताना दिसली आहे. जर का या दोन गोष्टींचा संबंध जोडला तर अलिसिया आणि प्रोफेसर एकत्र येऊन पोलिसांच्या विरोधात लढताना दिसतील.
लिस्बन मरणार का ?
प्रोफेसरच्या वडीलांना एक चोरी करताना पोलिसांनी मारले होते. नंतर त्याच्या मोठा भाऊ बर्लिनला देखील चोरीच्या दरम्यान निधन होतं. आता या सगळ्याकडे बघता प्रोफेसरचा एकमेव साहारा, म्हणजे त्याचं प्रेम लिस्बन देखील मरणार. बँक ऑफ स्पेनची चोरी संपताना पोलिसांच्या हाते लिस्बन मरणार असा अंदाज फॅन्स लावताना दिसत आहेत.
अलिसियाच तटिना आहे
अजून एक थिअरी चर्चेत आहे. अलिसिया आणि तटिनाचे रिलेशन. तटिना ही बर्लिनची बायको दाखवली आहे. बऱ्याच प्रेक्षकांन असं वाटते की त्या दोघी एकाच आहेत. करण तटिना ही एकमेव बाहेरची व्यक्ति होती जिला बँक ऑफ स्पेनच्या प्लानबद्दल माहिती होती. आधीच्या सीजनमध्ये अस दाखवले आहे की अलिसिया नेहमीच प्रोफेसरच्या एक पाऊल पुढे असते. एका एपिसोडमध्ये ती लिस्बन म्हणजेच राकेलला सांगताना दिसली आहे की तिच्या पतीचे जर्मनीमध्ये निधन झाले. जर्मनीची राजधानी बर्लिन आहे. म्हणुन कदाचित अलिसियाच तटिना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सगळे मरतील फक्त टोकियो जिवंत राहील
संपूर्ण सीरिजमध्ये टोकियो कथा सांगताना दिसली आहे. त्यामुळे उर्सुला को्ब्रो म्हणजेच टोकियोचे फॅन्स असा अंदाज लावत आहेत की या चोरीच्या शेवटी टोकियो सोडून सगळे मरतील. टोकियो, नैरोबीच्या मुलाला ही संपूर्ण चोरीची गोष्ट सांगताना दिसेल.
मनी हाईस्ट यशस्वी पणे संपन्न होईल.
सर्वसामान्यांमध्ये खळबळ निर्माण करण्यासाठी ही टोळी सोन्याच्या गोळ्या हवेत उधळून देईल. त्यानंतर दाली मास्क- जी त्यांची ओळख आहे ते घालून तिथून सटकतील. दुसरीकडे, अलिसियाच्या तावडीतून बाहेर येण्यासाठी प्रोफेसरकडे एक प्लान तयार असेल. दुसऱ्या सीजनच्या शेवटी, जेव्हा ही टोळी आंतरराष्ट्रीय जलहद्दीत असते तेव्हा प्रोफेसर (सर्जिओ) जहाजावरील एका पात्राला “कॅप्टन” असे संबोधित करतो? लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा हे ‘मनी हाईस्ट’च्या ४थ्या सीजन मध्ये प्रोफेसर “कॅप्टन” म्हणून एका माणसाला संबोधले होते. जर का या दोघांचा संबंध लावला तर हा “कॅप्टन” प्रोफेसरला वाचवून ही चोरी यशस्वी रित्या पार पडेतील.
हे होते मनी हाईस्टच्या फॅन्सने केलेले काही तर्क. वेब सीरिजचा टीजरवरूनच एवढे अनुषंग लावले जात आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता २ ऑगस्टची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘मनी हाईस्ट’चा ५ वा सीजन २ भागात प्रदर्शित होइल. पहिले ५ एपिसोड ३ सप्टेंबरला रिलीज होतील तर बाकीचे एपिसोड ३ डिसेंबरला रिलीज होतील.