scorecardresearch

Premium

Shardiya Navaratri 2023: गोव्याच्या सात बहिणी आणि त्यांचा धाकटा भाऊ खेतोबा!

गोव्याच्या या सात बहिणींमध्ये केळबाई, महामाया, मोरजाई, शीतला देवी, मीराबाई उर्फ मिलाग्रीस, अजादीपा, लैराई या सात प्रसिद्ध देवींचा समावेश होतो. तर खेतोबा हा त्यांचा धाकटा भाऊ म्हणून पूजला जातो.

Lairai Devi, Goa
लईराई देवी, गोवा

भारत हा देश अनेकविध भाषा- परंपरांसाठी ओळखला जातो. आपल्या देशातील प्रत्येक भागाचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. तसेच वैशिष्ट्ये गोव्याचेही आहे. जगभरातील पर्यटक गोव्यात समुद्राचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येतात, किंबहुना याच गोष्टीमुळे गोवा अधिक प्रसिद्ध आहे. असे असले तरी गोव्याला परंपरा आणि संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा लाभलेला आहे. याच परंपरा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी, अतोनात यातनाही गोवेकरांनी सहन केल्या आहेत, गोव्यावर पोर्तुगीजांनी केलेला अन्याय, अत्याचार विसरता येणार नाही. पोर्तुगीजांनी अनेक मंदिरे नष्ट केली, यामुळेच आपल्या देवतांच्या आणि आपल्या रक्षणार्थ स्थानिक रहिवासी त्यांच्या देवतांसह सुरक्षित क्षेत्रांमध्ये स्थलांतरीत झाले, अशा नोंदी इतिहासात सापडतात. त्यामुळे अनेक परंपरांचा बचाव झाला, परंतु दुर्दैवाने धर्मांतराच्या नावाखाली अनेक गोष्टी नामशेषही झाल्या तर आताही काळाच्या ओघात काही प्रथा, परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याच परंपरेतील एक परंपरा म्हणजे सात बहिणी आणि त्यांच्या भावाच्या पूजनाची परंपरा आजही स्थानिक कथांच्या रूपात तग धरून आहे. 

कोण आहेत या सात बहिणी आणि त्यांचा भाऊ? 

गोव्याच्या या सात बहिणींमध्ये केळबाई, महामाया, मोरजाई, शीतला देवी, मीराबाई उर्फ मिलाग्रीस, अजादीपा, लैराई या सात प्रसिद्ध देवींचा समावेश होतो. तर खेतोबा हा त्यांचा धाकटा भाऊ म्हणून पूजला जातो. या आठही देवता मूळच्या गोव्याच्या नसून कदंब काळात गोव्यात आल्याच्या स्थानिक आख्यायिका उपलब्ध आहेत. या भावंडांचे गोव्यातील आगमन साधेसुधे नव्हते हत्तीवर स्वार होवून, पश्चिम घाटाच्या चोर्ला खिंडीतून ही भावंडे आली. या भावंडांचे पालक कोण?, ही भावंडे गोव्यात का आली?, कुठून आली याविषयी कोणालाच काही कल्पना नाही. पारंपरिक मान्यतेनुसार ही भावंडे ऋषी अपत्ये होती, संकटाच्या काळात, सुरक्षित निवाऱ्याचा शोधार्थ गोव्यात आली, असे काही अभ्यासक सांगतात. 

Sanjay Gaikwad hunted tiger
“मी वाघाची शिकार करून त्याचा दात…”, संजय गायकवाडांचा अजब दावा; म्हणाले, “बिबट्यांना मी सहज…”
Manohar Joshi, ex chief minister, art, good connections, akola, special connections bond, love,
मनोहर जोशी यांचे कलेवर होते विशेष प्रेम; अकोल्याशी राहिले ऋणानुबंध
rain in Kailash Khers program the audience flees by covering chairs as umbrellas
वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब
maharshi dayanand saraswati marathi article, swami dayanand saraswati marathi news
वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!

आणखी वाचा: Shardiya Navaratri 2023: दुर्गा पूजा इंग्रजांच्या काळात लोकप्रिय का झाली?

भावंडांचा प्रवास 

गोव्यातील ही प्रसिद्ध भावंडे चोर्लेम, मोर्लेम, मौलिंगी, बोर्डे, महाराष्ट्रातील गिरोडा या गावांतून प्रवास करत एका संध्याकाळी बिचोलीमला (डिचोलीला) येथे पोहचली होती. आख्यायिकेनुसार, बिचोलीमच्या ग्रामदेवी शांतादुर्गाने त्यांचे स्वागत केले होते. तिने त्यांचा पाहुणचार केला होता. अंधार पडल्याने आणि घनदाट जंगल प्रदेश असल्याने तिने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाला निघण्यास विनंती केली आणि त्या रात्री आपल्याकडे आसरा दिला; दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केल्यावर ते मायेम् येथे वडणे (वडनेर) नावाच्या ठिकाणी जेवण आणि विश्रांतीसाठी थांबले. येथे त्यांनी पुढील प्रवासाचा मार्ग निश्चित केला. हे ठिकाण ‘सात बहिणीचा बस्ता’ या नावाने देखील लोकप्रिय आहे, इथे सात बहिणी थांबल्या होत्या असे मानले जाते. इथे टेकडीच्या उतारावर एक दगडी हत्ती कोरलेला आहे, असे मानले जाते की हा तोच हत्ती आहे, ज्यावर स्वार होऊन त्यांनी प्रवास केला होता आणि नंतर त्याचे दगडात रूपांतर झाले. याच बहिणींनी स्वयंपाक करण्याची तयारी केली पण, लाकूड जाळण्यासाठी आग नव्हती. त्यामुळे त्यांनी खेतोबास अग्नी आणण्यासाठी पाठवले. सरपण शोधत तो वाइंगणी गावात पोहोचला. इथे त्याला मुले खेळतान दिसली. तोही लहान असल्याने, तो आपल्याला दिलेले काम विसरला आणि खेळ बघण्यात दंग झाला. त्याला वेळेचे भान राहिले नाही. मये येथे, थोरली बहीण केळबाई चिंताग्रस्त झाली आणि तिने लईराईला त्याच्या शोधात पाठवले. लईराईला, खेतोबाला उशीर होण्याचे कारण कळल्यानंतर ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही. 

लईराईचा राग 

एका आख्यायिकेनुसार, संतप्त लईराईने, “खेतल्या, अशी मोठ्याने हाक मारली! हा आवाज ऐकताच खेतोबा घाबरला. लईराई रागाने त्याला लाथ मारायला पुढे सरसावली, तिचा वार चुकविण्यासाठी खेतोबा किंचित कंबरेत वाकला. तर दुसऱ्या एका कथेनुसार परोपकारी असलेली लईराई देवी तिच्या प्रिय लहान भावाला लाथ मारणे हे कसे शक्य आहे?, तिने केवळ रागा भरला, त्यामुळे घाबरलेला खेतोबा तिथेच स्तब्ध झाला. याच कथेनुसार भावा-बहिणीमधील वाद सुरु असताना इतर बहिणी त्यांच्या शोधात वाइंगणीला आल्या. खेतोबाला फटकारल्याबद्दल सर्व बहिणी लईराईला ओरडू लागल्या. यामुळे क्षुब्ध झालेल्या लईराईन, तिच्या पाचशे (अनुयायांसह) भक्तांसह ती अग्नीतून चालत अग्निदिव्य करेल आणि आपले निर्दोषत्त्व सिद्ध करेल असे सांगितले. तिच्या अनुयायांना धोंड म्हणतात. तेव्हापासून दरवर्षी तिच्या वार्षिक जत्रेत अग्निदिव्य करण्याची प्रथा आहे.

आणखी वाचा: इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज !

लईराईच्या अग्निदिव्याने केळबाईला वाईट वाटले, आपल्या अज्ञानामुळे आणि निष्काळजीपणामुळे हे घडले म्हणून ती लईराईच्या वार्षिक जत्रेत सातशे अनुयायी, धोंडांसह ‘माले’  नावाचा मोठा दिवा (आग) डोक्यावर घेऊन नाचते. यानंतर खेतोबाने वाइंगणी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. येथून तो आपल्या बहिणींसह परत जाणार नाही असा निर्णय त्याने घेतला. हे ऐकून सर्व बहिणी गडबडल्या आणि सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लईराईने सांगितले की, ती आता शिरगाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिरोग्राम गावात राहील.

मोरजाईने मोरजीममध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर मीराबाई दक्षिणेकडे मापुसा येथे, तर अजादीपाने सध्याच्या कर्नाटकच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या अंजद्वीप बेटावर आपले वास्तव्य केले. शीतलाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या बहिणीने पाताळ -लोकमध्ये प्रवेश केला, विशेष म्हणजे तिच्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. काहींच्या मते तिने या प्रदेशातून स्थलांतर केले. लईरईच्या जत्रेत गायले जाणारे प्रेरणागीत वगळता, गोव्यात तिच्या पूजेचा पुरावा नाही. 

गोव्यातील मये येथे एका लहान देवळी व्यतिरिक्त इतरत्र तिचे कुठेही स्थान नाही. देवी मीराबाईचे पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तन केल्यामुळे ती आत्ता मिलाग्रिस- लेडी आफ मिरॅकल्स म्हणून म्हापसा येथील  सेंट जेरोमी चर्चमधे स्थापित आहे. मिलाग्रिसचे भक्त हिंदू तसेच ख्रिस्ती असे दोन्ही समाजातले आहेत. अग्निरूप असलेल्या अशा ह्या सातही बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहेत.

लेखिका- सुचिता चोडणकर-कामत (पुरातत्त्व अभ्यासक)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shardiya navaratri 2023 seven sisters of goa and their younger brother khetoba history and hindu culture of goa svs

First published on: 22-10-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×