– चंदन हायगुंडे

एल्गार परिषद गुन्ह्यात प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली पुणे शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी वर्नन गोंसालवेस, अरुण फरेरा व सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान न्यायाधीश सारंग कोतवाल यांनी गोंसालवेसकडून पोलिसांनी जप्त केलेल्या “War And Peace in Junglemahal:People, State and Maoists (लेखक – बिस्वजीत रॉय)” व अन्य साहित्याचा उल्लेख केला. मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढून न्यायाधीशांनी गोंसालवेसला लिओ टॉल्स्टॉयचे “War And Peace” पुस्तक घरात का बाळगले? असे विचारल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांचा आधार घेऊन काही लोकांनी न्यायाधीशांविषयी व एल्गार परिषद प्रकरणाबाबत गैरसमज निर्मण होतील असा प्रचार सोशल मीडियावर सुरु केला.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?

यानिमित्ताने आरोपींकडून जप्त केलेल्या संशयास्पद साहित्याचे व त्यातून उघड होणाऱ्या त्यांच्या चालूगिरीचे उदाहरण पाहू. २००७ मध्ये गोंसालवेसला त्याचा निकटवर्ती श्रीधर श्रीनिवासनसह दहशतवाद विरोधी पथकाने बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, प्रतिबंधित माओवादी संघटनेसाठी सक्रियपणे काम करणे अशा आरोपांखाली अटक केली. आपण निर्दोष आहोत असे दोघेही न्यायालयात सांगत राहिले. मात्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून सहा वर्ष कारावासाची शिक्षा दिली. शिक्षा भोगून दोघे २०१३मध्ये तुरुंगातून सुटले. पुढे ऑगस्ट २०१५ मध्ये श्रीधरचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

न्यालयात आपण दोषी नाही असे सांगणाऱ्या श्रीधरच्या मृत्यनंतर मात्र भारतीय कम्युनिस्ट पार्टी – भाकपा (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने “प्रेस स्टेटमेंट” काढून त्याच्या माओवादी कार्याबद्दल माहिती जाहीर केली. त्यातून श्रीधर प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी मेंबर असल्याचे व अनेक वर्ष या माओवादी चळवळीत सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.

 

पुढे सप्टेंबर २०१६ मध्ये श्रीधरच्या मृत्यूस एक वर्ष पूर्ण होताना मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे वार्तांकन द इंडियन एक्सप्रेस ने केले आहे.

Mumbai: On Maoist’s death anniversary, call for ‘struggle in streets’

“फ्रेंड्स ऑफ श्रीधर” आयोजित सदर कार्यक्रमात श्रीधरबद्दल लिहिलेल्या लेखांचा संग्रह असणारे “S Sridhar – Portrait of the revolutionary as a warrior intellectual” हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. हे पुस्तक गोंसालवेसकडूनही जप्त करण्यात आले आहे.

अटक झाल्यावर न्यायालयात आपण दोषी नाही असे श्रीधर व गोंसालवेस सांगत होते. मात्र या पुस्तकात गोंसालवेसचा एक लेख असून त्यात त्यानेच श्रीधर प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी मेंबर होता व त्याच्या शहरी भागातील कामासह जंगलातील “Guerilla Life” बाबतही स्पष्ट उल्लेख केला आहे. यातुन श्रीधर व गोंसालवेस दोघांचीही चालूगिरी उघड होते.

एक लेख अरुण फरेराचाही आहे. त्यात अरुणने श्रीधरविषयी भाकपा (माओवादी) संघटनेने काढलेल्या पत्रकातील विधानांचा आधार घेत त्याच्या माओवादी कार्याचा उल्लेख केला आहे. “The CPI (Maoist) in its statement correctly sees Comrade Shridhar’s martyrdom as a major blow of the movement,” असे अरुण आपल्या लेखात म्हणतो.

इतकेच नव्हे तर विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचाही लेख या पुस्तकात आहे. त्यात तेलतुंबडे म्हणतात,“….Every era has its Bhagatsinghs and Sridhar like Maoists are indeed Bhagatsinghs of our times. They cannot die;they will keep coming unless the humans are liberated in real terms. Sridhar also will live on…in the hearts of millions fighting his battle…..My red salute to this dear friend.” म्हणजे श्रीधर सारखे माओवादी आपल्या काळातील भगतसिंग असून ते कधीच मरणार नाहीत… तर मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा येत राहतील अशा आशयाची मांडणी तेलतुंबडेंनी केली आहे. प्रतिबंधित माओवादी चळवळ देशासमोरील मोठी समस्या आहे असे मानले तर या चळवळीच्या नेत्याची तुलना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रातींकारी भगतसिंग यांच्याशी करणे संशयास्पद नाही का?

श्रीधर संबंधित पुस्तक प्रसिद्ध झाले तेंव्हा “रॅडिकल आंबेडकर” नावाने चळवळ चालविणारे “रिपब्लिकन पॅन्थर जातीअंताची चळवळ” संघटनेचे सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार व त्यांचे सहकारी या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाले होते. श्रीधर माओवादी नेता आहे हे माहिती असूनही स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या मंडळीनी कार्यक्रमात क्रांतीगीतेही सादर केली. याला चालूगिरी का म्हणू नये? सुधीर ढवळे व हर्षाली पोतदारही एल्गार परिषद गुन्हयात आरोपी आहेत. दोघेही एल्गार परिषदेच्या मुख्य आयोजकांपैकी आहेत. एल्गार परिषद प्रतिबंधित भाकपा (माओवादी) संघटनेच्या ध्येय धोरणानुसार व पैसे वापरून आयोजित केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचार झाला. त्याच्या एक दिवस आधी ३१ डिसेंबर,२०१७ रोजी पुण्यात शनिवार वाडा येथे एल्गार परिषद पार पडली. त्यापूर्वी सुधीर ढवळे, कबीर कला मंच कलाकार या संशयित मंडळींनी महाराष्ट्रभर एल्गार परिषदेचा प्रचार केला. त्यासाठी “भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान” अंतर्गत “भीमा कोरेगाव ने दिलाय धडा नवी पेशवाई मसनात गाडा” ही पुस्तिका काढली. या पुस्तिकेतही बरीच माहिती निराधार व संशयास्पद आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत निमंत्रकांची एक यादी छापलेली असून त्यात पहिलेच नाव सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे आहे. मात्र द इंडियन एक्सप्रेसला न्यायमूर्ती सावंतानी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे नाव या पुस्तिकेत कसे छापून आले याबाबत त्यांना काही कल्पनाच नव्हती .

Not aware of my name in pamphlet of Bhima Koregaon Shauryadin Prerna Abhiyaan: Justice Sawant

न्यायमूर्ती सावंत एल्गार परिषदेचे अध्यक्ष असल्याचे घोषित करण्यात आले होते. म्हणजे एल्गार परिषद अध्यक्षांनाच न सांगता त्यांचे नाव संशयास्पद पुस्तिकेत निमंत्रक म्हणून छापण्याची चालूगिरी केल्याची शंका निर्माण होते.

एल्गार परिषद गुन्ह्यात बरीच पुस्तके, डिजिटल माहिती, कागदपत्र व अन्य साहित्य जप्त केले आहे कि ज्यामध्ये संशयास्पद वाटावा असा मजकूर आहे. केवळ संशयास्पद आणि माओवादी चळवळीचे समर्थन करणारे साहित्य जवळ बाळगले एवढाच आरोप पोलिसांनी केलेला नाही. तर या आरोपींनी प्रतिबंधित भाकपा (माओवादी) संघटनेसाठी प्रत्यक्ष काम केल्याचे पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे संशयास्पद साहित्य निर्माण करणे, बाळगणे, त्याचा प्रचार प्रसार करणे गुन्हा ठरतो कि नाही, गुन्हयातील सर्व आरोपी दोषी आहेत कि नाही ते न्यायालय ठरवेल. परंतु या सर्वांच्या घातकी चालूगिरी पासून सर्व समाजाने सावध राहण्याची गरज आहे.

 

Story img Loader