News Flash

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ३ दिवसांमध्ये १३ उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना, भाजपकडून अद्याप उमेदवार यादी जाहीर नाही

BMC , Election 2017 , Bmc election 2017,Bmc 2017,Bmc election result ,Bmc election 2017 date,Bmc election 2017,Bmc mumbai,Annual budget of bmc mumbai,BMC election in mumbai, BMC ward list,BMC poll results 2017, BMC election live ,BMC election 2017 news, BMC election news in Marathi,BMC election live 2017,BMC election 2017 ward list,Latest news of BMC election in Marathi , BMC, Election, BMC employees , leaves , January, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसांत १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २७ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चार तर तिसऱ्या दिवशी (रविवारी) ९ अर्ज दाखल झाले.

मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण २२७ प्रभाग आहेत. या प्रभागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. यासाठी २७ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी दाखल झालेल्या ९ अर्जापैकी पश्चिम उपनगरातील प्रभाग क्रमांक १२ मधून १, प्रभाग क्रमांक ७९ मधून १, प्रभाग क्रमांक ८१ मधून १, असे ३ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. तर पूर्व उपनगरातून प्रभाग क्रमांक १०६ मधून १, प्रभाग क्रमांक १३३ मधून २ असे तीन तर शहरामध्ये प्रभाग क्रमांक १७६ मधून १, १७९ मध्ये १ असे एकूण २ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. अर्ज भरण्याची मुदत ३ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 11:29 pm

Web Title: 13 nomination forms in 3 days for mumbai municipal corporation election
Next Stories
1 माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत
2 शिवसेनेसोबत युती करण्यास मनसे उत्सुक; बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर
3 उमेदवार निवडीसाठी भाजपची बैठक; रणनिती ठरवण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
Just Now!
X