News Flash

मुंबईत एमआयएमच्या ६२ उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल

मुस्लिमबहुल भागात काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर आव्हान

एमआयएम मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रथमच उतरलेल्या एमआयएमच्या ६२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यांमध्ये दलित, मराठी व उतर भारतीय अशा १२ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. गोवंडी, वांद्रे, शिवडी, भायखळा आदी मुस्लीम बहुल भागातल्या जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सांगितले.

मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील भायखळामधून एक आमदार निवडून आल्यानंतर एमआयएम मुंबई महापालिका निवडणुकही लढवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आतापर्यंत मुस्लीम मतांवर अवलंबून असलेले काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच काही प्रमाणात राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता एमआयएमनेही महत्त्वाच्या ६२ जागांवर उमेदवार उभे करून या तिन्ही पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. ६२ जागांमध्ये दलित, मराठी उमेदवारांनाही संधी देऊन काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाणारी मतेही खेचण्याचा विचार केला आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाने प्रचारालाही सुरुवात केली असून निवडणूक प्रचारासाठी ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत १३ ते १५ सभा घेतल्या जाणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 9:25 pm

Web Title: 62 candidates from mim files nomination form for mumbai municipal corporation election
Next Stories
1 बंडखोरांच्या आव्हानामुळे मातोश्रीच्या चिंतेत वाढ
2 मुंबईत भाजप-रिपाइं गट्टी जमली; पिंपरी-चिंचवडमध्ये तुटली!
3 Pune Mahanagar Palika Election: पुण्यात पत्नीला उमेदवारी नाकारल्याने भाजप कार्यकर्त्याची गांधीगिरी!
Just Now!
X