मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने ७२ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केल्याचे सूत्रांकडून समजते. पहिल्या यादीत खासदार, आमदार पुत्रांसह ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनाही यादीत स्थान देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याला प्रभाग क्रमांक १०८ मधून तर आमदार राज पुरोहित यांचा मुलगा अवकाश पुरोहित याला प्रभाग क्रमांक २२१ मधून उमेदवारी निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर मनसेतून आलेल्या सुखदा पवार यांना प्रभाग क्र. ९३ मधून तर मंगेश सांगळे यांना प्रभाग क्र. ११८, मकरंद नार्वेकर प्रभाग क्र. २२७, हर्षिदा नार्वेकर यांना २२६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
कंसात प्रभाग क्रमांक
माजी उपमहापौर अलका केरकर (९८) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. राजश्री शिरवाडकर (१७२), भाजप गटनेते मनोज कोटक (१०३), सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे (१०४), विनोद शेलार (५१), उज्वला मोडक (७४), नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रूक्मिणी खरटमोल (१४८), भाजप प्रवक्ते अतुल शहा (२२०) यांच्यासह ७२ जणांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जाते.