25 November 2020

News Flash

महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर नियमबाह्यरित्या घर घेतल्याचा आरोप

महाडेश्वरांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

रुग्णांचे हाल होत आहेत तातडीने हजर व्हा असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केले आहे

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शिवसेनेसमोरील संकटं काही कमी होताना दिसत नाही. शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर हेच आता अडचणीत आले आहेत. महाडेश्वर यांनी साईप्रसाद हौसिंग सोसायटीतील घर नियमबाह्यरित्या विकत घेतल्याचा आरोप महेंद्र पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्याची लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाडेश्वर गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, महाडेश्वर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून आपण तिथे भाड्याने राहत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. महेंद्र पवार यांनी वॉर्ड क्र. ८७ मधून विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

साईप्रसाद हौसिंग सोसायटी ही महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आहे. येथे बाहेरील व्यक्तींना घर विकत घेता येत नाही. परंतु, महाडेश्वर यांनी हे घर विकत घेतल्याची तक्रार पवार यांनी महापालिका व न्यायालयात केली आहे. पालिकेने दखल न घेतल्याने आपण उच्च न्यायालयात गेल्याचे पवार यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच याच सोसायटीत माजी नगरसेविका पुजा महाडेश्वर यांच्याही नावाने एक फ्लॅट असल्याचा आरोप पवार यांनी केला. बाहेरच्या व्यक्तीने येथे घुसखोरी करून नियमबाह्यरित्या हे घर खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र, महाडेश्वरांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी आपण राहत असलेले घर हे गजानन पंडित यांच्या नावाने असल्याचे त्यांनी सांगितले. पंडित हे सेवानिवृत्त असून त्यांच्या घरात आपण भाड्याने राहत असल्याचा खुलासा त्यांनी केला. या वादामुळे आता मुंबई पालिकेच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2017 8:41 pm

Web Title: bmc election 2017 shivsena mayor candidate vishwanath mahadeshwar blame of illegal possession of house
Next Stories
1 एमआयएमची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त
2 महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेणा-या विरोधकांचे आभार: उद्धव ठाकरे
3 बारावीचा आणखी एक पेपर फुटला; गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवर व्हायरल
Just Now!
X