२२७ सदस्य असलेल्या मुंबई महानगर पालिकेमध्ये १७१ इतकी भरघोस मते पडून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौर झाले. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असताना त्यांना १७१  सदस्यांनी मतदान केले. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेला मिळालेली भारतीय जनता पक्षाची साथ. भारतीय जनता पक्षाच्या ८२ नगरसेवकांनी त्यांना आपले मत दिले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मतदानाला येण्यापूर्वीच इतके उत्साही होते की त्यांनी भगवे फेटे घातले होते. त्यांच्या पेहरावाकडे पाहून असे वाटत होते की भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मनापासून साथ दिली आहे. परंतु काही वेळातच भाजप नगरसेवकांनी मोदी मोदी असा जयघोष सुरू केला. त्यांच्या या कृत्यामुळे सभागृहात काय सुरू आहे हे काही वेळ समजलेच नाही. विश्वनाथ महाडेश्वर यांचा मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजय मेहता सत्कार करत होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मोदी-मोदी असा जयघोष सुरू केला. त्यांच्या या जयघोषामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. कुठलिही अट न ठेवता महापौर निवडणुकीला शिवसेनेला मतदान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला हा आपलाच विजय वाटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनाचा विजय हा आपलाच नव्हे तर मोदींचा विजय आहे असे भारतीय जनता पक्षाला वाटत आहे.

निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती तुटली. ही युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका केली. एकमेकांची उणीदुणी काढली. निकालाच्या दिवशी दोन्ही पक्षांनी आपला विजय झाला असे म्हटले. महापौर भारतीय जनता पक्षाचा होईल की शिवसेनेचा होईल या विषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली. दोन्ही पक्षांनी आपलाच महापौर व्हावा यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली. शिवसेना काँग्रेससोबत जाणार की मनसेची मदत घेणार याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले होते. शिवसेनेचे अनिल परब आणि भाजपचे आशिष शेलार हे म्हणू लागले होते की महापौर हा आमचाच होणार. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर राज्यातील राजकारणाची दिशाच बदलली. आपण शिवसेनेला विरोध करणार नाही अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. इतकेच नव्हे तर गरज पडल्यास आपण शिवसेनेला मतदानही करू असे त्यांनी म्हटले. त्यांनी ही अचानक माघार का घेतली याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले होते. काहींनी या गोष्टीला फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक म्हटले तर काहींच्या मते मोदींच्या आदेशानुसार फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींच्या महानगर पालिकेतील जयघोषामुळे भाजप नगरसेवकांच्या मनात काय चालले आहे याची एक झलकच पाहायला मिळाली.

narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
Congress strongly criticized Prime Minister Narendra Modi for destroying the country reputation and democracy
मोदींकडून लोकशाहीच्या चिंध्या! काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?