निवडणूक अजेंडय़ात मराठी भवन उभारण्याचे आश्वासन; रात्र बाजाराचा आग्रह धरणार

अल्पसंख्याक समाजाचा पक्ष म्हणून टीका होत असलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रकाशित केलेल्या चाळीस कलमी जाहीरनाम्यात मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुंबईत उर्दूबरोबरच मराठी भवन बांधण्याची ग्वाही त्यात देण्यात आली आहे.

मुंबईत रात्र बाजार भरविण्याचा पक्षाचा आग्रह राहील. मुंबईतील लहान व्यापारी व दुकानदारांना खुश करण्यासाठी एमआयएमने हा विषय त्यांच्या जाहीरनाम्यात आणला आहे. रात्र बाजारामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असा त्यांचा दावा आहे. जुन्या मुंबईच्या विकासासाठी स्वंतत्र प्राधिकरण स्थापन करण्याचे आश्वासन त्यात आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण व रोजगारासाठी २० टक्के तरतूदची मागणी करणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी मुलांबरोबरच हिंदूी, उर्दू, तमिळ, अशी अन्य भाषिक मुलांसाठी अथसंकल्पातील तरतूद वाढवून, या शाळांच्या इमारतींचा पुनर्विकासाचे एमआयएमने आश्वासन दिले आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

* एमएमआयच्या जाहीरनाम्यातून अल्पसंख्याक, दलित, गरीब वर्गाच्या प्रश्नांना हात

* शासकीय सेवेत खास करुन पोलीस दलात दुर्बल घटकातील व अल्पसंख्याक समाजातील युवकांना नोकरीची संधी

* नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबर मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सरकारकडे मागणी.

* मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शक कारभाराच्या मुद्यावरुन भाजप व शिवसेना या दोन पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे, आतापर्यंत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आणि पालिकेच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी प्रयत्नशील,