पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेला पाटणा महापालिकेइतके गुण मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबईला पाटणा शहराच्या बरोबरीला आणून दाखवले आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राज्य सरकारमुळे मुंबई किमान तिसऱ्या स्थानावर आहे. अन्यथा मुंबई महापालिका केंद्राच्या सर्वेक्षणात तळाला असती,’ अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

‘केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचा शिवसेनेने विपर्यास केला. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती. अर्धवट वाचले की तोंडघशी पडायला होते. राज्य सरकारमुळेच मुंबई आर्थिक सर्वेक्षण अहवालात तिसरी आहे. पारदर्शक कारभारात हैदराबाद प्रथम आहे. शिवसेनेने मुंबई शहर पाटणा शहराच्या बरोबरीला आणून ठेवले आहे,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

‘विकास आणि पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा आहे. पारदर्शक कारभाराचा मुद्दा आम्ही मांडतच राहणार आणि तुमचा भ्रष्टाचार समोर आणत राहणार. पारदर्शक कारभारात मुंबई महापालिकेला केंद्राने भोपाळा दिला आहे. गेल्या ७ वर्षांमध्ये मुंबईमध्ये इंटरनल ऑडिट झालेले नाही. जनतेचा पैसा हा जनतेसाठीच खर्च व्हायला हवा. तो पैसा कंत्राटदारांसाठी खर्च व्हायला नको,’ असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली.

‘मी कलगीतुऱ्यासाठी भाषण करत नाही. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास शहरातील वाहतूक सुसह्य होईल. चर्चगेट-विरार उन्नत मार्ग तयार करण्यात येईल. एकच तिकीट रेल्वे, मोनो, मेट्रो आणि जल वाहतुकीसाठी वापरता येईल. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास मुंबई शहर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होईल,’ असेही फडणवीस प्रचारसभेतील भाषणात म्हणाले.

Live Updates
19:59 (IST) 8 Feb 2017
एकहाती सत्ता द्या, मुंबईला देशातलं पहिल्या क्रमांकाचं शहर करु- फडणवीस
19:58 (IST) 8 Feb 2017
महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाही- फडणवीस
19:57 (IST) 8 Feb 2017
जनतेचा पैसा कंत्राटदारांसाठी खर्च करता कामा नये- फडणवीस
19:55 (IST) 8 Feb 2017
मुंबईला देशातलं पहिलं वायफाय शहर करुन दाखवलं- फडणवीस
19:54 (IST) 8 Feb 2017
सिग्नल तोडल्यास थेट चालान घरपोच- फडणवीस
19:53 (IST) 8 Feb 2017
आज संपूर्ण मुंबईत सीसीटीव्हीत कॅमेरे- फडणवीस
19:52 (IST) 8 Feb 2017
एकच तिकीट रेल्वे, मोनो, मेट्रो आणि जल वाहतुकीसाठी वापरता येणार- फडणवीस
19:51 (IST) 8 Feb 2017
डम्पिंग ग्राऊंड सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदारांच्या धमक्या- फडणवीस
19:50 (IST) 8 Feb 2017
चर्चगेट-विरार उन्नत मार्ग तयार करणार- फडणवीस
19:49 (IST) 8 Feb 2017
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुसह्य करण्याला प्राधान्य- फडणवीस
19:47 (IST) 8 Feb 2017
मुलुंडचं डम्पिंग ग्राऊंड बंद करु- फडणवीस
19:47 (IST) 8 Feb 2017
कलगीतुऱ्यासाठी मी भाषण करत नाही- फडणवीस
19:43 (IST) 8 Feb 2017
अर्धवट वाचल्यावर तोंडघशी पडायला होते- फडणवीस
19:41 (IST) 8 Feb 2017
उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर इज्जत वाचली असती- मुख्यमंत्री
19:40 (IST) 8 Feb 2017
पारदर्शकतेत मुंबई महापालिकेला शून्य गुण- फडणवीस
19:39 (IST) 8 Feb 2017
केंद्र सरकारच्या अहवालाचा शिवसेनेकडून विपर्यास- फडणवीस
19:38 (IST) 8 Feb 2017
राज्य सरकारमुळेच मुंबई महापालिका देशात तिसरी- फडणवीस
19:38 (IST) 8 Feb 2017
७ वर्षांपासून इंटरनल ऑडिट केलं नाही- फडणवीस
19:37 (IST) 8 Feb 2017
पारदर्शक कारभारात मुंबई नव्हे, हैदराबाद प्रथम- फडणवीस
19:37 (IST) 8 Feb 2017
पारदर्शी कारभारात मुंबई तिसरी- फडणवीस
19:36 (IST) 8 Feb 2017
विकास आणि पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा- फडणवीस
19:35 (IST) 8 Feb 2017
पारदर्शक कारभाराचा मुद्दा मांडत राहणार- फडणवीस