15 January 2021

News Flash

नगरसेवकांपैकी ४३ जणांवर गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी

२८ (१२ टक्के) नगरसेवकांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

२८ जणांच्या विरोधात गंभीर गुन्हे

मुंबई महापालिकेवर नव्याने निवडून आलेल्या २२५ नगरसेवकांपैकी ४३ जणांनी (१९ टक्के) त्यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी दाखल असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी २८ (१२ टक्के) नगरसेवकांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी केलेल्या पाहणीतून नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेवकांच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीबाबत ही माहिती उघड झाली. दोन नगरसेवकांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली नाहीत. प्रभाग ११५ मधून शिवसेनेकडून निवडून आलेल्या उमेश माने यांच्यावर खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल आहे. तीन नगरसेवकांवर बलात्कार आणि विनयभंग किंवा स्त्रियांविरोधातील इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी (कलम ३७६ आणि कलम ३५४) दाखल आहेत.

शिवसेनेच्या ८४ पैकी २२ नगरसेवकांवर, भाजपच्या ८१ पैकी ११ नगरसेवकांवर, काँग्रेसच्या ३१ पैकी दोघा नगरसेवकांवर, मनसेच्या ७ पैकी तिघांवर, राष्ट्रवादीच्या ८ पैकी एकावर, तर सपच्या ६ पैकी दोघांवर, एमआयएमच्या दोघांपैकी एकावर, तर अपक्षांमध्ये ६ पैकी दोघांवर गुन्हे दाखल आहेत. यापैकी सेनेच्या १२, भाजपच्या ८, काँग्रेसच्या २, राष्ट्रवादी, मनसे, सप आणि एमआयएमच्या प्रत्येकी एकावर तसेच सहा अपक्षांपैकी दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

आर्थिक पाश्र्वभूमी

२२५ पैकी ११४ नगरसेवक करोडपती आहेत. प्रत्येक नगरसेवकाची सरासरी संपत्ती ६ कोटी ५६ लाख रुपये आहे. पाच नगरसेवकांनी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांपेक्षा कमी संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल केले आहे. केवळ ७ नगरसेवकांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांहून अधिक असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:35 am

Web Title: criminal corporators
Next Stories
1 युतीसाठी अटीतटी!
2 मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत राज ठाकरेंची मनसेही उतरणार? चुरस वाढली!
3 मुंबईत भाजप-शिवसेना एकत्र येतील याची २०० टक्के खात्री: चंद्रकांत पाटील
Just Now!
X