News Flash

महिलाराज!; मुंबई महापौरपद खुला प्रवर्गासाठी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे महिलांसाठी राखीव

ओबीसींसाठी सात पदे आरक्षित

राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदांसाठी आज, शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. २७ पैकी १४ महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून मुंबईचे महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुणे खुला प्रवर्ग महिला, पिंपरी चिंचवड हे सर्वसाधारण प्रवर्ग आणि नाशिक महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

सरकारच्या नियमानुसार, अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीसाठी तीन आणि त्यामध्ये १ सर्वसाधारण गटासाठी तर दोन महिलांसाठी राखीव आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) सात जागा आरक्षित आहेत. त्यात चार महिला तर तीन सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. खुल्या गटासाठी १६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी आठ महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

नाशिकचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी, पनवेल अनुसूचित जाती (महिला)साठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. नांदेड वाघाळा महापालिकेचे महापौरपदही अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित आहे. तर अमरावतीचे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) सात महापालिकांमधील महापौरपदे आरक्षित आहेत. त्यापैकी चार महिला आणि तीन सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यात मिरा-भाईंदर ओबीसी (महिला), नवी मुंबई, पिंपरी – चिंचवड सर्वसाधारण, सांगली-मिरज-कुपवडचे महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. जळगाव, चंद्रपूर महापालिकेचे महापौरपदही ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. तर औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.

खुल्या प्रवर्गासाठी १६ महापालिकांतील महापौरपदे आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यात महिलांसाठी आठ तर साधारण गटासाठी आठ पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या म्हणजेच मुंबई महापालिकेचे महापौरपद खुल्या साधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून, वसई-विरार, भिवंडी, लातूर, मालेगाव, धुळे, अकोला आणि अहमदनगर महापालिकेतील महापौरपद खुल्या साधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, उल्हासनगर, परभणी, सोलापूर आणि कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:28 pm

Web Title: maharashtra muncipal corporations mayor reservation lottery announce
Next Stories
1 मानखुर्दमध्ये शौचालयाची जमीन खचून तिघांचा मृत्यू
2 पहिल्यावहिल्या मेट्रोला थेट सूर्याकडून ऊर्जा!
3 कृत्रिम परानिशी कासवाचा मुक्त जलविहार
Just Now!
X