29 September 2020

News Flash

पंतप्रधान मोदींकडे बिनसाबणाचे फुगे सोडण्याची कला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला होती. मात्र पंतप्रधान मोदींकडे बिनसाबणाचे फुगे सोडण्याची कला आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले आहे. ‘मुंबईवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांविरोधात शिवसेना कायम उभी होती आणि ती यापुढेही उभी राहील,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अंधेरीच्या सभेत भाजपवर हल्लाबोल केला.

‘भाजप सत्तेसाठी कोणासोबतही हातमिळवणी करु शकते. सध्या सगळेच भ्रष्टाचारी भाजपमध्ये चालले आहेत. मी युती तोडली नसती, तर पप्पू कलानीसोबत माझाही फोटो लागला असता,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील गुंडांच्या प्रवेशावर जोरदार टीका केली. ‘फडणवीसांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, असे गिरीश बापट बोलता बोलता म्हणाले. बापट बोलता बोलता अतिशय खरे आणि पारदर्शक बोलून गेले,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराच्या आश्वासनाची खिल्ली उडवली.

‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रेनकोट घालून अंघोळ तरी करतात, मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची अंघोळ घातली,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडवली. ‘कल्याण डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते. अजूनपर्यंत एक पैसाही दिलेला नाही. मी आतापर्यंत खोटे बोलून एकही मत घेतलेले नाही आणि यापुढेही घेणार नाही. शिवसैनिकांना मान खाली घालावी लागेल, असे एकही काम शिवसेनेने ५० वर्षांमध्ये केलेले नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आधी भाजपच्या मंचावर लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. पूर्वी भाजपच्या मंचावर आशिर्वाद देणारे हात होते. मात्र आता आशिर्वाद देणाऱ्या हातांऐवजी गळा दाबणारेच हात आहेत,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 10:25 pm

Web Title: shivsena chief uddhav thackeray criticized pm modi bjp cm fadnavis mumbai municipal corporation election
Next Stories
1 राजीनामा खिशात घेऊन फिरणे ही फक्त स्टंटबाजी; विखेंची शिवसेनेवर टीका
2 शिवसेनेने पाठिंबा काढला तर, सरकार कोसळेल; अजित पवार यांचा दावा
3 शिवसैनिकांच्या अपघाती मृत्युमुळे उद्धव ठाकरेंची पार्ल्यातील सभा रद्द
Just Now!
X