वाघासोबत खेळण्याचा प्रयत्न करु नका. वाघ कधी पंजा मारेल समजणारही नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अंधेरीतील प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘आम्ही मुंबईत शेर आहोत आणि बाहेरदेखील आम्हीच शेर आहोत,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या गुहेत प्रत्येकजण शेर असतो, अशा शब्दांमध्ये केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

‘सर्जिकल स्ट्राईकची कारवाई भारतीय जवानांनी केली. त्या जवानांना खायला चांगल्या दर्जाचे अन्न नाही. मात्र त्या जवानांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता. मुख्यमंत्री, मला तुमची लाज वाटते,’ अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. नोटाबंदीमुळे किती काळा पैसा बुडाला, असा सवाल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. ‘मला नोटाबंदीचा फटका बसला. कारण बँकांच्या रांगांमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला, तो माझ्यासाठी मोठा फटका आहे. नोटाबंदीमुळे रांगेत उभे राहिलेल्या २०० लोकांचा मृत्यू झाला. त्याचा मला त्रास झाला. मला नोटाबंदीचा किती फटका बसला, हे तुम्हाला २३ तारखेला समजेल,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.

Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!