News Flash

‘करून दाखवलं’ नंतर ‘डिड यू नो’; शिवसेनेच्या प्रचाराची नवी टॅगलाईन

यापूर्वी शिवसेनेची 'करून दाखवलं' ही टॅगलाईन चांगलीच चर्चेत होती.

महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आल्यानंतर आता शिवसेनेने मुंबईत आक्रमक जाहिरातबाजीला सुरूवात केली आहे. यानिमित्ताने शिवसेनेच्या प्रचाराची #DidyouKnow ही नवी टॅगलाईन समोर आली आहे. शिवसेनेच्या यापूर्वीच्या ‘करून दाखवलं’ या टॅगलाईनचा उपहासात्मक वापर करून भाजपच्या अनेक नेत्यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्याला उत्तर देण्यासाठी सेनेकडून नव्या टॅगलाईनचा वापर करण्यात येणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील पोस्टरवॉर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे भाजप आता सेनेच्या या पोस्टर्सला कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.


मागील निवडणुकांच्या प्रचारावेळी शिवसेनेची ‘करून दाखवलं’ ही टॅगलाईन चांगलीच चर्चेत होती. या टॅगलाईनअंतर्गत शिवसेनेकडून पाच वर्षांमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांचा पाढा वाचण्यात आला होता. त्यासाठी शिवसेनेकडून खास पुस्तिकाही छापण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत पालिकेच्या एकुण २२७ जागांपैकी ७५ जागांवर विजय मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, आता पाच वर्षांच्या कालावधीनंतर राजकीय परिस्थितीत बराच फरक पडला आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपने आक्रमक प्रचाराच्या जोरावर लोकसभा, विधानसभा, नगरपालिका अशा सर्वच टप्प्यांवर घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे यंदा मुंबई आणि ठाण्यातील महानगरपालिका निवडणुका शिवसेनेसाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली असून जाहिरातबाजीला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांत भाजपच्या नेत्यांकडून मुंबईतील सर्व विकासकामांना भाजपमुळेच गती मिळाल्याचा आणि शिवसेना या विकासकामांना विरोध करत असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेनेही आता आपल्या प्रचाराची रणनीती बदलली आहे. त्यासाठी सेनेकडून यापूर्वी असलेल्या ‘करून दाखवलं’ टॅगलाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या दादर परिसरात ‘डिड यू नो’ या नव्या टॅगलाईनसह सेनेचे पोस्टर्स झळकत आहे. या पोस्टर्सवर शिवसेनेकडून गेल्या पाच वर्षात करण्यात आलेल्या विकासकामांचा उल्लेख करण्यात आला आहे.

c1-wpcqusaajj0d

c2hhfnpuqaizbpi

c144vfgxcaekoeq

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 2:59 pm

Web Title: shivsena new tagline on posters did you know
Next Stories
1 BMC Election 2017: मुंबईत स्वबळावर लढल्यास शिवसेना नंबर १
2 पारदर्शक कारभाराची भाषा करणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात- शिवसेना
3 युतीच्या चर्चेवर ‘संक्रांत’
Just Now!
X