माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत

मुंबई काँग्रेसला निवडणुकाच्या तोंडावर हादरा

मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत

मुंबई महानगरपालिकेत माजी विरोधी पक्षनेते तसेच गुरुदास कामतांचे खंदे समर्थक देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमधील अमराठी लोकांची हुकूमशाही व मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायामुळे काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची प्रतिक्रिया आंबेरकर यांनी दिली.

मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यातील वादामुळे काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यामुळे अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांना आपल्याला तिकीट मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी काँग्रेसला रामराम केला आहे.

काँग्रेस नेते गुरुदास कामत समर्थक देवेंद्र आंबेरकर हे पाच वर्षांपूवी अंधेरी पश्चिम येथील आंबोली हिल मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांना दोन वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद दिले गेले, तेव्हा काँग्रेसच्या दोन गटातील धुसफुस बाहेर पडली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress leader devendra amberkar joins shivsena ahead of mumbai municipal corporation election

ताज्या बातम्या