Live

मुंबई वेगळी करण्याचा डाव असेल तर पाय छाटेन; राज ठाकरेंचा इशारा

शिवसेनेसोबतच्या युतीच्या प्रस्तावावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मनसेप्रमुख राज ठाकरे

-मराठी माणसाच्या हितासाठी कुणाचेही पाय चाटायला तयार असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. मी लाचार झालो म्हणून नव्हे तर केवळ मराठी माणसाचे हित डोळ्यासमोर ठेऊन मी युतीचा हात पुढे केल्याचे राज ठाकरे यांनी दादरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये म्हटले.

मराज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना राज ठाकरेंच्या मनसेला मात्र गळती लागली आहे. नाशिकसह मुंबई, ठाण्यात मनसेमधून आऊटगोईंग जोरात आहे. त्यामुळे मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुंबईत शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटल्यावर मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. मात्र मनसेने पुढे केलेला युतीचा हात शिवसेनेने झिडकारुन लावला.

Live Updates
3:02 (IST) 1 Feb 2017
माझं अजून काय वाकडं करणार तुम्ही ?- राज ठाकरे
3:02 (IST) 1 Feb 2017
व्यक्ती महत्त्वाची नाही, पक्ष महत्त्वाचा- राज ठाकरे
3:01 (IST) 1 Feb 2017
मुंबईतील मराठी माणसासाठी हात पुढे केला, माझ्यासाठी हा विषय आज संपला- राज
3:00 (IST) 1 Feb 2017
शिवसेना, भाजपच्या थापांना बळी पडू नका- राज ठाकरे
2:59 (IST) 1 Feb 2017
मुंबईत खड्डे बुजवायला १०० कोटींचं कंत्राट निघतं- राज ठाकरे
2:58 (IST) 1 Feb 2017
नाशिक महापालिकेवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही- राज ठाकरे
2:58 (IST) 1 Feb 2017
भाजप २५ वर्षे शिवसेनेसोबतच होता, घोटाळ्यात भाजपचेही हात- राज ठाकरे
2:57 (IST) 1 Feb 2017
फेकू असं गुगल केलं की मोदींचं नाव येतं- राज ठाकरे
2:57 (IST) 1 Feb 2017
थापाला पर्यायी शब्द भाजपा आहे- राज ठाकरे
2:56 (IST) 1 Feb 2017
उद्धव ठाकरेंना सात फोन केले, एकही उचलला नाही- राज ठाकरे
2:55 (IST) 1 Feb 2017
मुंबई तोडण्याचं भाजपचं षडयंत्र- राज ठाकरे
2:55 (IST) 1 Feb 2017
मी नाशिकमध्ये जे ५ वर्षात केलं, ते शिवसेनेला २५ वर्षांमध्ये मुंबईत जमलं नाही- राज
2:54 (IST) 1 Feb 2017
मी निर्णय बदलले की मला बोल लावले जातात- राज ठाकरे
2:54 (IST) 1 Feb 2017
नोटाबंदीनंतर मोदींनी ५६ निर्णय बदलले, त्यावर कोणी बोलत नाही- राज ठाकरे
2:53 (IST) 1 Feb 2017
नोटाबंदीनंतर भाजप नेत्यांकडे पैसे आले- राज ठाकरे
2:48 (IST) 1 Feb 2017
रेल्वे भरतीसाठी दिल्लीला गेलेल्या मराठी मुलांना मारहाण- राज
2:48 (IST) 1 Feb 2017
शिवसेनेची नजर महापौर बंगल्यावर- राज
2:47 (IST) 1 Feb 2017
मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू- राज
2:43 (IST) 1 Feb 2017
मुंबई वेगळी करण्याचा डाव असेल तर पाय छाटेन- राज
2:43 (IST) 1 Feb 2017
शिवसेनेला मनसेचा हात नको; कारण प्रश्न पैशांचा आहे- राज ठाकरे
2:42 (IST) 1 Feb 2017
कल्याण डोंबिवलीत भाजप-शिवसेना भांडली, मग एकत्र आली- राज ठाकरे
2:42 (IST) 1 Feb 2017
मुंबईत भाजप नको म्हणून शिवसेनेसमोर हात पुढे केला होता- राज ठाकरे
2:41 (IST) 1 Feb 2017
मात्र मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला, तर कोणाचेही पाय छाटेल- राज ठाकरे
2:40 (IST) 1 Feb 2017
राज ठाकरे मराठी माणसासाठी कोणाचेही पाय चाटेल- राज ठाकरे
2:38 (IST) 1 Feb 2017
सर्वकाही आज पोतडीमधून बाहेर काढणार नाही- राज ठाकरे
2:38 (IST) 1 Feb 2017
राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात
2:36 (IST) 1 Feb 2017
शिवाजी मंदिरात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार
2:35 (IST) 1 Feb 2017
राज ठाकरेंच्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात

Web Title: Raj thackeray live updates mns mumbai municipal corporation election shivsena bjp