उद्धव ठाकरे आज युतीचा फैसला जाहीर करणार !

ठाकरे कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

shiv sena, Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
युतीचा पेच कायम असतानाच शिवसेनेचा निवडणूक मेळावा (आज) २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगावच्या नेस्को संकुलात होणार आहे.

युतीचा पेच कायम असतानाच शिवसेनेचा निवडणूक मेळावा (आज) २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगावच्या नेस्को संकुलात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार असून ते या मेळाव्यातच युतीचा फैसला जाहीर करणार आहेत. त्यामुळे ठाकरे कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुंबई-ठाण्यासह १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीत होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मेळाव्याचे आयोजन केले असून युतीविषयी आपली भूमिका मांडण्यात येणार आहे.
मुंबईतील गटप्रमुख, विभागप्रमुख, राज्याच्या कानाकोपऱ्यातील शाखाप्रमुखांपासून जिल्हाप्रमुखांपर्यंत आणि शिवसेना नेते, उपनेते, मंत्री, आमदार-खासदार आणि आजी-माजी पदाधिकारी यांना मेळाव्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
या मेळाव्यात शिवसेनेच्या नवीन निवडणूक गीताच्या ध्वनिचित्रफितीचेही प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता संदेश देतात, युतीबाबत काय भूमिका मांडतात, कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena chief uddhav thackeray rally bmc election 2017 yuti alliance bjp mumbai

ताज्या बातम्या