स्वत:चे स्वरूप उघडे होण्यास जर काही साहाय्यभूत होत असेल तर ते म्हणजे कोणत्याही प्रकारे स्वत:चा तिरस्कार न करता किंवा स्वत:चे तेवढे चांगले न म्हणता,  निरंतर सावध राहून स्वत:चे अवलोकन करणे होय. यात एक प्रकारची उत्स्फूर्तता असावी लागते. पदोपदी स्वत:चे विश्लेषण करणे, स्वत:ला जखडून ठेवणे, विशिष्ट वळण लावणे यांचा तेथे काही उपयोग होत नसतो.

प्रश्न : टीकेला परस्परसंबंधात कोणते स्थान आहे? विघातक टीकेत व विधायक टीकेत काय फरक आहे?

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

कृष्णमूर्ती : पहिला प्रश्न म्हणजे आपण टीका का करतो? काही तरी समजून घेण्याचा त्यामागे उद्देश असतो का? की तो फक्त  दुसऱ्यांना टोचण्याचा एक प्रकार असतो? मी जर तुमच्यावर टीका करीत राहिलो तर मला तुमचे ज्ञान होईल का? माझ्या व तुमच्या संबंधांचे महत्त्व जर मला, वरवर नव्हे तर अगदी पूर्णपणे, तळापासून, समजून घ्यायचे असेल, आकलन करायचे असेल तर मी तुमच्यावर टीका करेन का? की मी आपले संबंध शांतपणे अवलोकन करीन- त्यांचे भान ठेवीन? – माझी मते, माझी टीका, माझे निर्णय, माझे ममत्व किंवा तिरस्कार यांचा तुमच्यावर आरोप न करता – शांतपणे जे जे घडेल ते ते पाहात राहीन?

खरं तर ऊठसूट दुसऱ्यावर टीका करण्याची आपल्याला एक सवयच लागून जाते आणि त्या सवयीचे गुलाम होऊन आपण मनाने निद्रिस्तच होऊन जातो. टीका विधायक असो किंवा विघातक असो, त्याने काही फरक पडत नाही. तो मुद्दा खरोखरी अप्रस्तुत आहे. प्रश्न असा आहे की, मनाच्या व भावनांच्या कोणत्या अवस्थेत आपल्याला परस्परसंबंधाचे सम्यक् ज्ञान होईल?

तुमच्या लहान मुलांबद्दल जर तुम्हाला आस्था असेल तर त्याला कसे समजून घेता? तुम्ही त्याचे निरीक्षण करता, होय की नाही? ते खेळते कसे, त्याच्या वेगवेगळ्या लहरी व खोडय़ा कशा चालतात, त्यांचा तुम्ही अभ्यास करता. तुमचे मत तुम्ही त्याच्यावर लादत नाही. त्याने अमुक व्हावे, अमुक होऊ नये असा आग्रह तुम्ही धरीत नाही. तुम्ही लक्षपूर्वक अवलोकन करता; होय की नाही? असे केलेत तरच कदाचित तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला थोडी थोडी समजूत येऊ लागेल. पण तुम्ही त्याच्यावर चिडत राहिलात; तुमच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे दडपण त्याच्यावर घालीत राहिलात; त्याने कसे वागावे, कोण व्हावे, कोण होऊ नये, इत्यादी प्रकारे त्याच्यावर वारंवार प्रभाव पाडीत राहिलात तर तुम्ही व तो यांमध्ये एक अडसर निर्माण कराल हे उघडच आहे.

दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेक जे टीका करतात त्यात दुसऱ्याला विशिष्ट वळण देण्याचा किंवा त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा हेतू असतो. कशाला तरी, कोणाला तरी आपल्या इच्छेप्रमाणे वळण लावण्यात, आपल्याला एक प्रकारचे सुख वाटते, आत्मप्रौढी वाटते, एक प्रकारचे समाधान वाटते; मग तो संबंध पतीशी असो, पत्नीशी असो किंवा मुलाशी असो. स्वत:च्या अंगी एक प्रकारचे सामथ्र्य आहे असे त्यात तुम्हाला वाटत असते, तुम्ही कोणाचे तरी ‘साहेब’ आहात अशी ऐट तुमच्या मनात असते आणि अशा सत्तेच्या जाणिवेत विलक्षण समाधान वाटत असते. पण खरोखरी या प्रक्रियेत प्रत्यक्ष संबंधाचे खरे आकलन होत नसते, त्यात फक्त जुलूम असतो, दुसऱ्याला तुमच्या लहरीप्रमाणे, इच्छेप्रमाणे, साचेबंद वागणुकीप्रमाणे वाकविण्याचा, वळण लावण्याचाच प्रकार असतो, होय की नाही?

दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपरीक्षणाची, स्वत:बद्दल जागरूक असणे, स्वत:वर टीका करणे किंवा स्वत:चा धिक्कार किंवा समर्थन करणे, यामुळे स्वत:चे स्वत:ला ज्ञान होते का? मी जेव्हा मजवरच टीका करू लागतो तेव्हा मी माझ्या ग्रहणशक्तीला, वागण्याला मर्यादाच घालीत असतो, नाही का? स्वयंपरीक्षणाचा एक प्रकार म्हणजे ‘आत्मपरीक्षण’ होय. त्याने स्वत:चे स्वरूप खरोखरी उघड होते काय? सदोदित स्वत:ची छाननी करण्याने, विश्लेषण करण्याने, स्वत:ला भिण्याने किंवा कुशंका काढत बसण्याने किंवा चिकित्सा करीत बसण्याने स्वत:ला पूर्ण ओळखण्यास नक्कीच मदत होत नाही. स्वत:चे स्वरूप उघडे होण्यास जर काही साहाय्यभूत होत असेल तर ते म्हणजे कोणत्याही प्रकारे स्वत:चा तिरस्कार न करता किंवा स्वत:चे तेवढे चांगले न म्हणता, निरंतर सावध राहून स्वत:चे अवलोकन करणेच होय. यात एक प्रकारची उत्स्फूर्तता असावी लागते. पदोपदी स्वत:चे विश्लेषण करणे, स्वत:ला जखडून ठेवणे, विशिष्ट वळण लावणे यांचा तेथे काही उपयोग होत नसतो. स्वत:च्या स्वभावाचे आकलन होण्यासाठी ही उत्स्फूर्तता आवश्यक असते. मी जर स्वत:वर केवळ अंकुश ठेवीत राहिलो, स्वत:ला मर्यादा घालीत राहिलो, स्वत:चा धिक्कार करीत राहिलो तर मी माझ्या विचारांच्या व भावनांच्या गतीला अटकावच करीन, होय की नाही?

आणि जेव्हा आपल्याला आपले सत्य स्वरूप उघडकीस येते तेव्हा आपण त्याबद्दल काय उपाय करायचा हे ठरवणे फार महत्त्वाचे असते. मी जर विशिष्ट कल्पनेप्रमाणे, आदर्शानुसार काही उपाय करीन तर मी स्वत:ला कोणत्या तरी साच्यात जुलमाने दडपून बसवीन, त्यात आकलन करणे किंवा समजून घेऊन ती अवस्था ओलांडणेही नसते. कोणताही तिरस्कार किंवा समर्थन न करता मी जर स्वत:चे निखळपणे अवलोकन केले तरच त्यापलीकडे जाणे शक्य आहे. म्हणूनच स्वत:ला कोणत्याही आदर्श रचनेशी जुंपून घेणे हे अगदी एकदम चुकीचे असते. आदर्श हे घरगुती बनावटीचे देव असतात आणि स्वत:च निर्मिलेल्या प्रतिमांच्या साच्यात स्वत:ला बसविणे म्हणजे मुक्ती तर नक्कीच नव्हे.

म्हणूनच मन जेव्हा सावध असते, निरीक्षणशील असते तेव्हाच खरा बोध होतो – पण हेच फार अवघड असते, सतत अस्वस्थ राहाणे, नेहमी टीका करीत राहाणे, बरेवाईट शेरे मारीत राहाणे, यात आपल्याला फार रस असतो. आपला हा स्वभावच बनून गेलेला आहे. आणि त्याच कल्पनांच्या पडद्यातून, पूर्वग्रह, मते, अनुभव, आठवणी यांच्या चष्म्यातून, आपण जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हे सारे पडदे टाकून देऊन सत्याचे सरळ आकलन करणे शक्य आहे का? तुम्ही जर माझे बोलणे ऐकत असाल आणि मनाला फार ताण न देता सुलभतेने माझ्या म्हणण्यातील तात्पर्य समजून घेत असलात, तर आपण एकमेकांनाही समजून घेणे शक्य आहे. पण जर तुम्ही सदोदित टीका केलीत, तुमची मते, तुमचे पुस्तकी ज्ञान व ऐकीव माहिती ताबडतोब बोलून दाखवीत राहिलात तर आपल्या दोघांमध्ये याचाच आडपडदा येत असल्यामुळे, तुमचा व माझा सरळ संपर्क येणारच नाही.  म्हणूनच तुमचे मन विलक्षण गतिमान असले पाहिजे. तुमच्या निर्णयांशी, तुमच्या विशिष्ट अनुभवांतून बनविलेल्या ठाम मताशी ते जखडलेले असता कामा नये. ज्या वेळी चित्त स्वस्थ असूनही तरल सावधानता असते  तेव्हाच खरोखरी बोध उदयास येत असतो. मग ते मन ग्रहणक्षम असते, संवेदनक्षम असते. पण मनात जर कल्पना, पूर्वग्रह वगैरेंची आणि उलटसुलट मतांची गर्दी झालेली असेल तर ते मन संवेदनक्षम असू शकत नाही.

परस्परसंबंध आकलन होण्यासाठी स्वस्थचित्त अशी सावधानता असलीच पाहिजे – स्वस्थ राहिल्याने परस्परसंबंध नष्ट होतात अशातला काही भाग नाही. याउलट त्यामुळे परस्परसंबंध जास्त जिवाभावाचे आणि फार अर्थपूर्ण होतात, मग त्यात आपुलकी आणि जिव्हाळा खरोखरीच असू शकतो. त्यात जवळीक असते, सहवासाचे सौहार्द असते, प्रेमाची ऊब असते, पण उथळ भावावेश किंवा अनाठायी हळवेपणा नसतो. आपण जर वस्तुमात्राशी अशा जिव्हाळ्याने संबंधित राहिलो, सलगीने वागलो, तर आपले प्रश्न सहज सुटू शकतील – मालमत्तेचे प्रश्न, तंटे-बखेडे सुटतील; कारण आपले जे संचित आहे तेच आपण असतो. आपल्यापैकी बहुतेक जण नाना गोष्टींचा संग्रह करून त्या जवळ बाळगतात, आपण जर माया जमविली नाही, आपले जीवन फर्निचरने भरून टाकले नाही, संगतीने भरून टाकले नाही, माहितीने गच्च भरून ठेवले नाही किंवा या ना त्या गोष्टींच्या संग्रहाने व्याप्त करून ठेवले नाही तर आपण म्हणजे पोकळ डबडय़ासारखे होऊन राहून आणि ती डबडी जो भला मोठा आवाज करतात त्यालाच आपण आपले जीवन समजतो आणि त्यातच संतुष्ट राहातो. आणि जेव्हा ही डबडी तुटतात फुटतात, तेव्हा मात्र तुम्ही धाय मोकलून रडारड करता. कारण त्या फटक्यासरशी तुमची झापड पार उडून जाते व आपले खरे स्वरूप, पोकळ डबडय़ासारखे क्षुद्र व निर्थक असलेले आपले जिणे, त्यांचे सत्य स्वरूप, तुम्हाला उघड दिसते. पण परस्परसंबंधाचे अवधान प्रस्थापित झाले तर त्यातील गहन रहस्य व सौंदर्य यांची प्रचीती येऊ शकते आणि प्रीतीचा दिव्य स्पर्शही जाणिवेला होऊ शकतो.

 

जे कृष्णमूर्ती 

(‘केशव भिकाजी ढवळे प्रकाशन’च्या जे. कृष्णमूर्ती लिखित ‘प्रथम अर्थात अंतिम मुक्ती’ या पुस्तकातून साभार.)