तुम्हाला जर नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आत्ताच नवा स्मार्टफोन विकत घ्या. कारण नवे आर्थिक वर्ष सुरू होताच स्मार्टफोनच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. मोबाईलच्या निर्मितीत अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या प्रिंटेड सर्किट बोर्ड्सवर (पीसीबी) अतिरिक्त कर आकारला जाणार असल्याने स्मार्टफोन महागणार आहेत. यामुळे स्मार्टफोनच्या किमतींमध्ये २५ ते ३० टक्क्यांची वाढ होणार आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रिंटेड सर्किट बोर्ड्सवर २ टक्क्यांचा विशेष अतिरिक्त कर आकारणार असल्याची घोषणा केली आहे. प्रिंटेड सर्किट बोर्ड्स परदेशातून भारतात आयात केले जातात. त्यामुळे स्मार्टफोनच्या किमतींमध्ये येत्या आर्थिक वर्षात मोठी वाढ होणार आहे.

देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी प्रिंटेड सर्किट बोर्ड्सवर २ टक्क्यांचा विशेष अतिरिक्त कर लावण्यात येत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. यामुळे देशात प्रिंटेड सर्किट बोर्ड्सची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना फायदा होईल, असे जेटली यांनी म्हटले आहे.

प्रिंटेड सर्किट बोर्ड्सवर २ टक्क्यांचा विशेष अतिरिक्त कर आकारला जाणार आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या करणाऱ्या भारतीय आणि परदेशी कंपन्यांना भारतात स्मार्टफोनची निर्मिती करणे महागडे ठरणार आहे. सरकारकडून प्रिंटेड सर्किट बोर्ड्सच्या आयातीवर २ टक्क्यांचा विशेष अतिरिक्त कर आकारला जाणार असल्याने देशामध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड्सचे उत्पादन करणाऱ्यांना अच्छे दिन येतील, असे विश्लेषकांनी सांगितले आहे. यामुळे परदेशी कंपन्या भारतात प्रिंटेड सर्किट बोर्ड्सचे उत्पादन करण्यास प्राधान्य देतील, अशी शक्यता विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते आहे.