आज केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला संसदेत सुरूवात होईल. पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलीआर्थिक पाहणी संसदेसमोर सादर करतील. दोन्ही सभागृहांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद मार्दगर्शन करतील. आज 29 जानेवारी रोजी सुरू झालेलं बजेट अधिवेशन 9 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर पुन्हा संसदेचं अधिवेशन 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत भरेल.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील महत्त्वाचे 10 मुद्दे:

– या अधिवेशनापूर्वी सत्तारूढ पक्षाचे तसेच विरोधी पक्षांचे नेते नवी दिल्लीत भेटले आणि त्यांनी प्रस्तावित अधिवेशनासंदर्भात चर्चा केली.
– सत्तारूढ पक्षाने बजेट सेशनमध्ये तिहेरी तलाकसंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी द्यावी अशी ठाम भूमिका मांडली. या विषयावर सार्वमत होण्याच्या दृष्टीने संबंधितांशी बोलण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.
– लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले की, बजेट अधिवेशनाच्या पहिला टप्पा 8 बैठकांचा असेल. एकूण 36 चासांपैकी 19 तास अध्यक्षांच्या भाषणानंतरच्या आभारप्रदर्शनासाठी व 2018 – 19 च्या अर्थसंकल्पासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
– 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली बजेट सादर करतील. भाजपाप्रणीत रालोआचं संपूर्ण असं हे शेवटचं बजेट असेल, कारण पुढील वर्षी निवडणुका आहेत.
– कृषि क्षेत्र, गरीब अशांना या बजेटमध्ये महत्त्वाचे स्थान मिळेल असा अंदाज आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बजेट लोकानुनय करणारे असेल असा तज्ज्ञांचा कयास आहे.
– तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या आणि अन्य मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक मान्यता देणाऱ्या विधेयकांना मंजुरी मिळवणे मोदी सरकारचे मुख्य लक्ष्य असण्याची शक्यता.
– बजेटचा पहिवा टप्पा जानेवारी 29 ते फेब्रुवारी 9 या कालावधीत होईल तर दुसरा टप्पा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत पार पडेल.
– पहिल्या दिवसी आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेची एकूण परिस्थिती काय आहे याचा अंदाज या अहवालाच्या माध्यमातून नमूद होईल.
– मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी तयार केलेल्या या आर्थिक पाहणी अहवालातून सरकारचे अग्रक्रम व बजेटमध्ये काय महत्त्वाचे असू शकेल यावर प्रकाश पडेल.
– राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 फेब्रुवारी रोजी संसदेला मार्गदर्शन करणार असून राष्ट्रपती झाल्यानंतरचं त्यांचं हे पहिलंच भाषण असेल जे संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर होईल.