केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी संसदेत मोदी सरकारचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकींचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणून याकडे उद्योगविश्व आणि सामान्यांचे लक्ष लागले होते. जेटली यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात शेती, गरीबी आणि शिक्षण या तीन मुख्य मुद्यांवर जास्तीत जास्त भर देण्यात आला. देशातील युवकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याबरोबर त्यांना रोजगाराभिमुख बनवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील शिक्षणाचा दर्जा चिंतेची बाब असून , दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याची घोषणा जेटली यांनी केली. यासोबतच शिक्षकांनाही योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल असेही ते म्हणाले. देशातील शिक्षणाचा दर्जा चिंतेची बाब असून , दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याची घोषणा जेटली यांनी केली. यासोबतच शिक्षकांनाही योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल असेही ते म्हणाले.

काही महत्वपूर्ण तरतुदी पुढीलप्रमाणे…

⦁ शिक्षणाचा दर्जा चिंतेची बाब, दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार

⦁ देशभरात १ लाख कोटी रुपयांचा निधी शिक्षणाच्या क्षेत्रात खर्च करण्याची जेटलींची घोषणा

⦁ दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणार

⦁ डिजीटल शिक्षणावर अधिक भर

⦁ प्री- नर्सरी ते बारावीपर्यंतच धोरण एकच राहील याची काळजी घेणार

⦁ आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी एकलव्य स्कूल उभारणार

⦁ बडोद्यात रेल्वे विद्यापीठ तयार करणार

⦁ २४ नवीन मेडिकल कॉलेज देशभरात उभारणार, आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी १२०० कोटी

⦁ पंतप्रधान रिसर्च फेलो स्कीम १००० विद्यार्थ्यांना रिसर्चची संधी

⦁ आर्किटेक्चरसाठी नवीन कॉलेज

⦁ ५६ हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर