केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून सादर करण्यात आलेल्या वित्तीय तुटीच्या आकडेवारीत नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची शंका, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली. गुरुवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी दि इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. यावेळी मनमोहन सिंह यांनी म्हटले की, आगामी निवडणुकांमध्ये फायदा मिळवण्याच्यादृष्टीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला, असा आरोप मी करत नाही. मात्र, अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेल्या वित्तीय तुटीच्या आकडेवारीत नक्कीच काहीतरी घोळ आहे, असे मनमोहन सिंह यांनी म्हटले.

यावेळी त्यांना आजचा अर्थसंकल्प सुधारणावादी होता का असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर मनमोहन सिंह म्हणाले की, ‘सुधारणा’ या शब्दाचा अनेकदा गैरवापर केला जातो. त्यामुळे मला त्याविषयी भाष्य करायचे नाही. अर्थसंकल्पातील विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की, कृषी क्षेत्रातील सर्व समस्या संपल्या आहेत का? तसे नसेल तर मग त्या समस्यांशी सामना करण्यासाठी कोणती रणनीती आखण्यात आली आहे?, असा सवालही त्यांनी विचारला.

Budget 2018 : जेटलींचा अर्थसंकल्प, नेटकऱ्यांचा ‘हास्यसंकल्प’!

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम हमीभाव देण्याची घोषणा केली. येत्या खरीप हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे कशाप्रकारे साध्य होणार? यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट कसे होणार, असे सवाल मनमोहन सिंह यांनी उपस्थित केले.

Budget 2018 : राष्ट्रपतींसह खासदार होणार मालामाल