News Flash

दुखस कुटे, शेकस कुटे?

समभाग, फंडांवर दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ कराची मात्रा

share market
प्रतिकात्मक छायाचित्र

समभाग, फंडांवर दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ कराची मात्रा

भांडवली बाजारात गेले काही दिवस भीतीयुक्त साशंकता व्यक्त केली जात होती, त्याप्रमाणे अर्थसंकल्पातून समभाग तसेच म्युच्युअल फंडांच्या विक्री व्यवहारावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर लागू करीत असल्याची घोषणा केली. या घोषणेसरशी बाजारात सेन्सेक्समध्ये तब्बल ४०० अंशांच्या घसरणीचे पडसाद उमटताना दिसले. तथापि, एक लाखांपेक्षा अधिक रकमेच्या लाभावर हा कर लागू होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर बाजार पडझडीतून सावरतानाही दिसला. अहिराणी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे दुखस कुटे, शेकस कुटे, असे एकूण चित्र दिसते आहे.

भांडवली बाजारातून मिळणारा परतावा खूपच आकर्षक पातळीवर असून, त्याला दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभाच्या करकक्षेत आणले गेले पाहिजे, असे नमूद करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या तरतुदीची घोषणा केली. कर लावला गेला तरी या बाजाराच्या परताव्याचे आकर्षण कमी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र अर्थवृद्धीसाठी भांडवली बाजारात रसरशीत उत्साहही गरजेचा असल्याने काही क्षुल्लक बदलासाठी कराचे हे पर्व सुरू करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१२ महिने समभागांची धारणा केल्यानंतर होणाऱ्या विक्रीवर जर एक लाख रुपयांपेक्षा अधिक भांडवली नफा झाला असल्यास त्यावर १० टक्के दराने कर आकारला जाईल, असे जेटली यांनी आपल्या भाषणात सोदाहरण समजावून सांगितले.

सध्याच्या प्रथेप्रमाणे, १२ महिने अर्थात एक वर्षांनंतर होणाऱ्या समभागांच्या विक्रीवर कोणतीही कर आकारणी केली जात नाही. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर आता त्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर १ फेब्रुवारी २०१८ पासून लागू होईल. एक वर्षांआधी होणाऱ्या समभागांच्या विक्रीवरील १५ टक्के दराने अल्पमुदतीचा भांडवली लाभ कर सध्या सारखाच कायम राहणार आहे.

  • सध्याच्या प्रथेप्रमाणे, १२ महिने अर्थात एक वर्षांनंतर होणाऱ्या समभागांच्या विक्रीवर कोणतीही कर आकारणी केली जात नाही.
  • अर्थसंकल्पातील घोषणेनंतर आता त्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर १ फेब्रुवारी २०१८ पासून लागू होईल.
  • एक वर्षांआधी होणाऱ्या समभागांच्या विक्रीवरील १५ टक्के दराने अल्पमुदतीचा भांडवली लाभ कर सध्या सारखाच कायम राहणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 1:14 am

Web Title: union budget highlight 2018 reviews part 13
Next Stories
1 भांडवली लाभावरील करवाढीची बाजाराला धास्ती
2 वित्तीय गणित नेमके जुळविणारा दिशानिर्देश
3 तोच गुल, तीच काडी!
Just Now!
X