Budget 2018 : देशातील ९९ टक्के कंपन्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा

मध्यम उद्योगक्षेत्रातील कंपन्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

25% corporate tax rate , Union Budget 2018 Live Updates, Sensex, Nifty, Union Budget 2018 Live,union budget 2018,union budget 2018 news in marathi,union budget 2018-19,union budget,union budget 2018-19 latest news,budget in marathi,Union budget in marathi,Union budget 2018 in marathi,Indian Budget 2018,Indian Budget 2018 news in Marathi,budget 2018,budget news in Marathi
corporate tax : आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना २५ टक्के कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागत होता. तर त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना २९ टक्के कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागत होता.

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या शेवटच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने उद्योगांना मोठा दिलासा दिला. यावेळी कॉर्पोरेट टॅक्ससाठीच्या करमर्यादेत मोठी वाढ करण्यात आली. आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना २५ टक्के कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागत होता. तर त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना २९ टक्के कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागत होता. ही सवलत यंदा वाढवण्यात आली असून आता २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना २५ टक्के म्हणजे आधीच्यापेक्षा चार टक्के कमी कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागणार आहे. भारतातील एकूण कंपन्यांमध्ये ९९ टक्के कंपन्यांची उलाढाल २५० कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे या सगळ्यांना या कमी कररचनेचा लाभ होईल असे जेटली म्हणाले.

लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातील कंपन्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जेटली यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशातील ९९ टक्के उद्योगांची उलाढाल २५० कोटींपर्यंत आहेत. उर्वरित एक टक्काच कंपन्यांची उलाढाल २५० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याच कंपन्यांना २९ टक्के इतका कॉर्पोरेट कर भरावा लागणार आहे. तर अन्य ९९ टक्के कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात ४ टक्के इतकी बचत होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union budget 2018 25 corporate tax rate to companies with revenue up to rs 250 crore

Next Story
Budget 2018 – हाय एंड स्मार्ट फोन्स महागण्याची शक्यता
ताज्या बातम्या