15 August 2020

News Flash

सोन्याच्या खरेदीस आळा घालण्यासाठी पर्यायी आकर्षक योजना

सोन्याच्या मागणीस आळा घालण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी चलनवाढीच्या निर्देशांकाशी निगडित असलेल्या कर्जरोख्यांची घोषणा केली आहे. याखेरीज गुंतवणुकीस अधिक उत्तेजन मिळावे म्हणून ‘राजीव गांधी इक्विटी’

| March 1, 2013 05:26 am

सोन्याच्या मागणीस आळा घालण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी चलनवाढीच्या निर्देशांकाशी निगडित असलेल्या कर्जरोख्यांची घोषणा केली आहे. याखेरीज गुंतवणुकीस अधिक उत्तेजन मिळावे म्हणून ‘राजीव गांधी इक्विटी’ बचत योजनेत काही सुधारणा करण्याचीही घोषणा चिदम्बरम यांनी केली.
सर्वसामान्यांनी सोन्यापेक्षा आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करावी. त्यायोगे बचत वाढीस लागून त्यामधील निधी उत्पादनवाढीसाठी उपयोगात आणता येईल आणि अंतिमत: आर्थिक वाढीसाठीही ही बाब उपयुक्त ठरेल, असे अर्थमंत्री म्हणाले.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत मालमत्तेत गुंतवणूक करून पहिल्यांदाच घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एक लाख रुपयांपर्यंतची करसवलत देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ‘राजीव गांधी इक्विटी’ बचत योजनेत पहिल्यांदा गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची मर्यादा आता १० लाख रुपयांवरून १२ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे चिदम्बरम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2013 5:26 am

Web Title: budget 2013 eyes attractive schemes to axe gold buying
टॅग Gold,Union Budget
Next Stories
1 अर्थसंकल्प २०१३ : सामाजिक क्षेत्र (शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण)
2 शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा !
3 महिला, बाल कल्याण आरोग्य, शिक्षणावर भर
Just Now!
X