scorecardresearch

Budget 2022: मानसिक आरोग्याचा विचार करणारा अर्थसंकल्प! या आहेत नव्या तरतुदी

करोनामुळे अनेक नागरिकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ही तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात असा दावा केला की हा अर्थसंकल्प स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षासाठी भारताची पायाभरणी करेल.

या भाषणात महामारीमुळे निर्माण झालेल्या मानसिक आरोग्य आव्हानांना संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाले की केंद्र सरकार एक ‘राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य कार्यक्रम’ सुरू करणार आहे. ज्यामुळे मानसिक समस्यांना सामोरे जाणाऱ्यांना फोनवरून समुपदेशन मिळेल. “साथीच्या रोगाने सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढवल्या आहेत. मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करण्यासाठी, एक राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल,” असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

अर्थसंकल्पासंदर्भातल्या ताज्या आणि लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

कार्यक्रमाबद्दल पुढे स्पष्टीकरण देताना, निर्मला सीतारामन म्हणाल्या, 23 टेली मेडी मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क चालवले जाईल, ज्यामध्ये NIMHANS हे नोडल केंद्र असेल. तिने पुढे सांगितले की इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बेंगळुरू (IIIT) तंत्रज्ञान सुविधा प्रदान करेल.

मराठीतील सर्व Budget 2022 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budget 2022 mental health 23 tele calling centers in india vsk