India Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून टीका सुरू आहे, तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. Union Budget 2023 Live Updates: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन, म्हणाले…! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” हेही वाचा - Union Budget 2023 : अर्थसंकल्पावर शिवसेनेच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांना एकच आकडा समजतो तो…” याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय. त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे. याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, ग्रीन बजेट म्हणता येईल, याला पायाभूत सविधांचं बजेट म्हणता येईल, याला मध्यमवर्गीयांचं बजेट म्हणता येईल, याला शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारं बजेट म्हणता येईल. अशा सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या माध्यामातून मोठ्याप्रमाणात मदत मिळते आहे.” असंही फडणवीसांनी सांगितलं. विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार? याशिवाय “दहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही देशात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती करणारी आहे. २७ कोटी लोक ईपीएफओच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या आठ वर्षात औपचारिक क्षेत्रात वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतो आहे. या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.