केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अनेक घोषणा यामध्ये करण्यात आला. तर टॅक्स स्लॅब जैसे थे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान देशात हाय स्पिड ट्रेनसाठई सात मार्ग ठरवण्यात आले आहेत. महाराष्ट्रासाठी कुठला कॉरिडॉर आहे आपण जाणून घेऊ. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला.
सात हायस्पिड रेल्वे मार्गांची घोषणा
भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार असून तिचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाशांना काय मिळणार याकडेही देशाचे लक्ष लागले होते.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ससंदेतून देशाचं यंदाचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून देशातील सात हायस्पीड रेल्वे मार्गाची
घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी गतिमान होणार आहे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना याचा फायदा होईल. शहरांमधील विकासाला जोडणारे सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. पुढील पाच वर्षांत वीस नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू केले जातील. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
कर चुकव्यांवर सरकार करणार कारवाई
कर चुकवण्यासाठी उत्पन्न चुकीचं दाखवणाऱ्यांवर किंवा लपवणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे. जर करदात्याने त्यांचं उत्पन्न चुकीचं दाखवलं किंवा लपवलं तर त्यांना कराच्या रकमेच्या शंभर टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाईल. अघोषित संपत्तीवरही शिक्षा नाही तर थेट दंड ठोठावला जाईल. टॅक्समध्येही गडबड केल्यास थेट दंड ठोठावला जाईल. कर प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणं आणि प्रामाणिक करदात्यांचा विश्वास राखणं हे सरकारचं मुख्य ध्येय आहे. त्यामुळे इनकम टॅक्स रिटर्नमध्ये गडबड केल्यास आता शिक्षा नाही तर थेट दंड ठोठावण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी ३० टक्के टॅक्सची घोषणा केली आहे. म्हणजेच आता जो कोणी उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न करणार, त्यांना कोणतीही शिक्षा नसेल तर थेट त्यांच्यावर ३० टक्के कर आकारला जाईल, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.

