Union Budget 2026 Analysis: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील कर संबंधित तरतुदींवर सीए अनिरूद्ध राठी यांनी अगदी सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे.

अर्थसंकल्पातील मालमत्ता खरेदीबाबतच्या तरतुदींबाबत बोलताना सीए अनिरूद्ध राठी म्हणाले की, “या अर्थसंकल्पातील अजून एक खूपच महत्त्वाची घोषणा अशी की, आतापर्यंत जर आपल्याला नॉन-रेसिडेंट म्हणजे एनआरआय कडून एखादी अचल मालमत्ता, म्हणजेच इमूवेबल प्रॉपर्टी, खरेदी करायची असल्यास खूप किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागायचा. पण आता ही किचकट प्रक्रिया अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी खूप सोपी केली आहे.”