New Income Tax Slab 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प कसा असेल याकडे देशाचं लक्ष आहे. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. शिवाय या वर्षी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प रविवारी सादर होतो आहे. अर्थसंकल्पाची तारीख १ फेब्रुवारी असली पाहिजे हे मोदी सरकारने निश्चित केलं आहे. आज रविवारी १ फेब्रुवारी आल्यामुळे अर्थसंकल्प आज सादर केला जातो आहे. आज टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. तसंच इतर घोषणांकडेही लक्ष असेल.
Union Budget, Income Tax Slab 2026 | निर्मला सीतारमण यांनी सादर केला अर्थसंकल्प, कशी असेल कररचना?
कोकणातील मत्स्य उत्पादकांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत मात्र काजू उत्पादकांची नाराजी….मुल्यवर्धीत मत्स्यउत्पादन आणि निर्यातीला चालना….
कोकणातील मत्स्य उत्पादकांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत मात्र काजू उत्पादकांची नाराजी….मुल्यवर्धीत मत्स्यउत्पादन आणि निर्यातीला चालना….
कृषी उत्पादनांना बाजारपेठेचे बळ; केंद्रीय अर्थसंकल्पात कृषीला योजना निहाय मिळाला इतका निधी...
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : शेतकऱ्यांसाठी निराशजनक तर उद्योग, व्यवसायासाठी पोषक; लोकप्रतिनिधींचा संमिश्र सूर…
Budget 2026 : परदेशी टूर पॅकेजेसवरील टीसीएस दर २% पर्यंत कमी
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “मी परदेशी टूर प्रोग्राम पॅकेजेसच्या विक्रीवरील टीसीएस दर अनुक्रमे सध्याच्या ५% आणि २०% वरून २% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मांडते. शिवाय, उदारीकृत रेमिटन्स स्कीम (एलआरएस) अंतर्गत शिक्षण आणि वैद्यकीय उद्देशांसाठी टीसीएस दर सध्याच्या ५% वरून २% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.”
Union Budget : अर्थसंकल्पाबद्दल तज्ज्ञांनी काय म्हटले
२०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल, भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष राजीव मेमानी म्हणाले, “अर्थसंकल्पाला आमचा प्रतिसाद सकारात्मक आहे कारण तो उद्योगांच्या, विशेषतः एमएसएमईच्या मागण्या पूर्ण करतो. सेवा क्षेत्राकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. सरकारने कर सुलभीकरणाबाबतच्या चिंता देखील ऐकल्या आहेत. भांडवली खर्च (कॅपेक्स) देखील १०-१२% ने वाढवण्यात आला आहे.”
Central Budget 2026 : अमित शहांकडून पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार
उत्पादन ते पायाभूत सुविधांपर्यंत, आरोग्य ते पर्यटन, ग्रामीण भाग ते कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रीडा ते तीर्थस्थळे, ViksitBharatBudget हा एक असा अर्थसंकल्प आहे जो प्रत्येक गाव, शहर आणि शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना सक्षम बनवतो आणि पूर्ण करतो. पुढील २५ वर्षांचा रोडमॅप आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीची रूपरेषा देणाऱ्या या अर्थसंकल्पाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे हार्दिक अभिनंदन.
Union Budget 2026 : अर्थसंकल्पीय भाषणात खूप कमी तपशील- शशी थरूर
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हटले आहे की, “आम्हाला खूप कमी तपशील मिळाले. तीन-चार मथळे आले होते, पण आम्ही अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची वाट पाहत होतो. ते कुठे आहे? आम्हाला ते केरळमध्ये हवे होते. आमच्याकडे आयुर्वेदाची खूप जुनी परंपरा आहे. हे थोडे आश्चर्यकारक आहे. कदाचित अर्थसंकल्पीय दस्तऐवजात अधिक तपशील असतील. मी ते अजून वाचलेले नाही. भाषणात खूप कमी तपशील होते.”
Union Budget : बजेटमधील मोठ्या घोषणा काय वाचा थोडक्यात
१ एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू
टॅक्स स्लॅब जैसे थे, प्राप्ती करात बदल नाही
३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार
अपघात विमा करमुक्त असेल
सेमी कंडक्टरसाठी ४० हजार कोटी
शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त
मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर
२० नवे जलमार्ग बनवणार
बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती
भारताला मेडिकल टुरीझम केंद्र बनवणार
प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षणासाठी मुलींची वसतिगृह उभारणार
२० प्रमुख पर्यटन स्थळांवर १० हजार पर्यटन मार्गदर्शक- टूर गाईड्स
गेमिंग आणि कंटेंट क्षेत्रांच्या वाढीवर भर दिला जाईल
२०३० पर्यंत २० लाख व्यावसायिक निर्माण केले जातील
परदेशी नागरिक भारतीय शेअर खरेदी करणार
चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणार
Union Budget : कर प्रणली नेमकी कशी असणार आहे, वाचा
Union Budget : कर रचनेत बदल झालेला नाही. त्यामुळे कर प्रणाली जैसे थेच असणार आहे. कशी आहे करप्रणाली जाणून घ्या.
कर प्रणाली जैसे थे० ते ४ लाख रुपये उत्पन्न- कर नाही
४ ते ८ लाख रुपये उत्पन्न- ५ टक्के कर
८ ते १२ लाख रुपये उत्पन्न- १० टक्के कर
१६ ते २० लाख रुपये उत्पन्न- २० टक्के कर
२० ते २४ लाख रुपये किंवा त्यावरील उत्पन्न- ३० टक्के कर
Union Budget : करदात्यांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा कुठल्या?
१) आयटीआर अपडेटसाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत
२) १ एप्रिल २०२६ पासून देशात इन्कम टॅक्स अॅक्ट २०२५ अर्थात नवा प्राप्तीकर कायदा लागू होणार
३) मूळ रिटर्न भरण्यासाठी पगारदारांसाठीची मुदत ३१ जुलै असेल तर नॉन ऑडिट बिझनेस आणि ट्रस्ट यांच्यासाठी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असेल.
४) उत्पन्नाची माहिती न देणं, करचोरी करणं महागात पडणार आहे, करदात्याने जाणूनबुजून चुकीची माहिती दिली तर थकित कराच्या १०० टक्के दंड भरावा लागेल.
५) परदेशी टूर पॅकेजवर आकारला जाणारा टीसीएस ५ ते २० टक्के इतका होता, जो आता २ टक्के करण्यात आला आहे. परदेश प्रवास स्वस्त होणार असून पर्यटकांवर कराचा बोजा कमी होणार आहे.
६) नवीन कर नियमांमुळे कर प्रणाली सोपी होणार आहे. सामान्यांचा गोंधळ कमी होईल. १ एप्रिल पासून येणारे नवे नियम अशा पद्धतीने आणले आहेत की नागरिकांना कुठलीही अडचण न येता ते भरता येतील.
कर्करोग, मधुमेहाची औषधं स्वस्त होणार, बायोफार्मा सेक्टरसाठी १० हजार कोटींची घोषणा निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.
अपघात विम्यातली रक्कम ही करमुक्त असेल, ३१ ऑक्टोपर्यंत प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत. अघोषित संपत्तीवर दंड नाही तर कर भरण्याची तरतूद. क्लाऊड सेवा देणाऱ्या विदेशी कंपन्याना २०४७ पर्यंत करमुक्ती या घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत.
१ एप्रिल पासून नवा प्राप्तीकर कायदा लागू केला जाणार आहे अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तसंच प्राप्तीकर भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली जाईल असंही सीतारमण यांनी म्हटलंं आहे.
राष्ट्रीय हातमाग धोरण कारागिरांना प्रोत्साहन आणि समर्थन प्रदान करेल. शैक्षणिक संस्थांकडून तांत्रिक सहाय्य शक्य होईल. मेगा टेक्सटाइल पार्क स्थापन केले जातील.
महात्मा गांधी ग्राम स्वराज - खादीला प्रोत्साहन देण्यासाठी - उत्पादन, प्रशिक्षण आणि विपणनासाठी असेल.
एक जिल्हा, एक उत्पादन याला प्रोत्साहन दिले जाईल.
क्रीडा - उपकरणे डिझाइन आणि उत्पादन करण्याची योजना आहे.
औद्योगिक समूह - पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे.
एमएसएमईसाठी - सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाईल.
सरकारी संस्थांना अल्पकालीन मॉड्यूलर अभ्यासक्रम डिझाइन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टियर 2 आणि 3 स्तरांपर्यंत प्रशिक्षण दिले जाईल.
मालवाहतुकीसाठी मालवाहतूक कॉरिडॉर बांधले जातील
5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर-2 आणि 3 शहरांच्या विकासासाठी ₹11.2 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे. 2026-27 मध्ये ही रक्कम 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.
खासगी विकासकांसाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी तयार करण्यात आला आहे. सरकार अंशतः हमी देईल.
मालवाहतुकीसाठी एक समर्पित फ्रेट कॉरिडॉर बांधला जाईल. पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरत या बंदराला जोडण्याची योजना देखील आहे.
वाराणसी आणि पटना विकसित करून अंतर्गत जलमार्ग विकसित केले जातील.
7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
देशातील सीप्लेन उत्पादकांना पाठिंबा दिला जाईल.
मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई आणि सिलिगुडी ते वाराणसी यासह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
विकसित भारतासाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन केली जाईल.
Union Budget : पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ७ अतीजलद रेल कॉरिडॉर्स- निर्मला सीतारमण
पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ७ अतीजलद रेल कॉरिडॉर्स
मुंबई ते पुणे</p>
पुणे ते हैदराबाद
हैदराबाद ते बंगळुरू
हैदराबाद ते चेन्नई
चैन्नई ते बंगळुरू
दिल्ली ते वाराणसी
वाराणसी ते सिलिगुडी
Union Budget : ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुुविधा वाढवणार-सीतारमण
५ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. तसंच शहर विकासांसाठी १२.२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी जाहीर केलं.
Budget 2026 : अर्थसंकल्पासाठी तीन कर्तव्यं कुठली? काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?
पहिलं कर्तव्य
आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि तो वेग कायम ठेवणं. यासाठी उत्पादकता व स्पर्धात्मकता वाढवणं. जागतिक स्तराच्या सुविधा निर्माण करणं
दुसरं कर्तव्य
आपल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं, त्यांचं कौशल्य वाढवणं, त्यांच्या क्षमता वाढवणं व भारताच्या समृद्धतेच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेणं.
तिसरं कर्तव्य
सबका साथ, सबका विकास या तत्वावर आधारित विकास साध्य करणं. यातून प्रत्येक कुटुंब, समाज, प्रदेश यांना साधन-संपत्ती, सुविधा व संधी समान पद्धतीने उपलब्ध असतील.
वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला उद्योगांना चालना देणार-सीतारमण
वस्त्रोद्योग, हातमाग, हस्तकला उद्योगांना चालना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बायोफार्मा शक्तीसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सेमी कंडक्टर सेक्टरसाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget : आमची सुधारणांची एक्स्प्रेस वेगाने धावते आहे-निर्मला सीतारमण
आमची सुधारणांची एक्स्प्रेस वेगाने धावते आहे. आत्तापर्यंत आम्ही आर्थिक धोरणांमध्ये ३५० सुधारणा केल्या आहेत. त्याचा फायदाही दिसून येतो आहे असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकसभेत उपस्थित झाल्या आहेत. माघ पौर्णिमा मुहूर्तावर मी बजेट सादर करायला उभी आहे असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
Union Budget 2026 : नव्या कररचनेसाठी आरोग्य विम्यामध्ये सूट मिळणार का?
जुन्या कररचनेनुसार 80 D मध्ये आरोग्य विम्यावर कर सवलत आहे. तर नव्या टॅक्स रचनेत ही सवलत नाही. सध्याच्या घडीला रुग्णालयांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे नव्या कररचनेतही याचा समावेश होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पगारदार, निवृत्ती वेतनधारक, लघू उद्योजक यांना सवलत मिळणार का?
देशाचा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. आज होणारं भाषण हे अर्थमंत्र्यांचं सर्वाधिक चर्चेतलं भाषण असणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे टॅक्स स्लॅब. मध्यमवर्गींना जसा मोठा दिलासा मोदी सरकारने मागच्या वर्षी दिला होता तसाच आता निर्मला सीतारमण देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. पगारदार कर्मचारी, पेन्शनधारक, लघू उद्योजक यांना किती आणि कशी करसवलत मिळेल की जैसे थे स्थिती राहिल? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
जुनी आणि नवी कररचना नेमकी कशी आहे?
जुन्या कर रचनेत अडीच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तीकराची सूट मिळत होती. तर नव्या कररचनेत ही मर्यादा ४ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 87 A च्या अंतर्गत जुन्या कररचनेत ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत होती. नव्या कररचनेत 87 A च्या अंतर्गत १२ लाख रुपये उत्पन्नावर कुठलाही कर लागत नाही.
Union Budget 2026 : किसान कार्डची मर्यादा पुन्हा वाढणार का?
२०२५ च्या अर्थसंकल्पात टॅक्समध्ये मोठी सवलत देण्यात आली होती. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली होती. तसंच स्वस्त औषधं, विमा सुधारणा असे मोठे निर्णय घेण्यात आले होते. आता या वेळी काय घोषणा केल्या जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
३० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागू केला जाणार का?
२०२५ ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोदी सरकारने मोठी सवलत दिली होती. जीएसटीमधील सुधारणा, रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवर कमी केलेला टॅक्स या सगळ्या पार्श्वभूमीवर करदात्यांना आणखी सवलत दिली जाईल का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल. ३० लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर लागू केला जावा अशी सूचना करण्यात आली आहे. त्याबाबतची तरतूद किंवा घोषणा केली जाईल का? याकडेही देशाचं लक्ष लागलेलं असेल.
आज सकाळी ११ वाजता सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
आज सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या भाषणात त्या काय काय सवलती देणार, काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. तसंच करदात्यांना काय सवलती मिळतील? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प कसा असेल याकडे देशाचं लक्ष आहे. आज टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. तसंच इतर घोषणांकडेही लक्ष असेल.

